पुणे, पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने पाणलोट क्षेत्रात मोठे काम झाले आहेआणि लोकांमध्ये जनजागृती आली आहे. मात्र त्या सोबतचआता माती, गवत आणि पीक नियोजनावर काम करावेलागेल. तेव्हाच आपण दुष्काळाला पूर्णपणे हरवू शकू, असेप्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आणि पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान यांनी येथे केले. वॉटर कप स्पर्धा 2019 चे तालुका व राज्यस्तरितपारितोषिकांचे वितरण रविवारी बालेवाडी येथील शिवछत्रपतीक्रीडा संकुलात झाले. यावेळी खान बोलत होते. या कार्यक्रमाला चित्रपट व क्रीडा क्षेत्रातील अनेक नामवंतांची उपस्थिती होती. रिलायन्स फाऊंडेशनचे सचिन मर्डीकर, एच.टी. पारेख फाऊंडेशनच्या झिया लाल, पिरामल फाऊंडेशनचेआर. चंद्रशेखर, टाटा ट्रस्ट्सचे पवित्रकुमार आणि बजाजफाऊंडेशनचे अरविंद जोशी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.या स्पर्धेत जिंकणे किंवा हरणे हे महत्त्वाचे नसून गावागावांतपाणलोटाचे महत्त्व पोचले पाहिजे, हे अधोरेखित करून अमीर खानम्हणाले म्हणाले, की आमच्या दृष्टीने भागघेणारी सर्व गावे ही विजेतीच आहेत. दुष्काळाला आपणअजून हरवलेले नाही. आपण गाफील राहिलो तर दुष्काळपरत येऊ शकतो. मात्र हा मार्ग सोपा नाही. पाणलोटकामासोबतच माती, गवत आणि पीक नियोजनावर कामकरावे लागेल. तेव्हाच आपण दुष्काळाला पूर्णपणे हरवू शकू.”यावेळी बोलताना किरण राव म्हणाल्या, की राज्यात वदेशात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा विचार करून आम्ही हाकार्यक्रम साधेपणाने करण्याचा निर्णय केला.यंदाची स्पर्धा अत्यंत कठीण वातावरणात असल्याचेसांगून पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारीसत्यजीत भटकळ म्हणाले, “यंदाचे हे स्पर्धेचे चौथे वर्ष आहेमात्र आजपर्यंत एवढी खडतर परिस्थिती कधीही नव्हती.स्पर्धा घ्यावी की नाही अशी शंका यायला लागली होती कारणगेल्या वर्षी पाऊस कमी झाला होता आणि स्पर्धेच्या काळातचनिवडणुका आल्या. तरीही यंदा 4726 गावांनी प्रशिक्षणघेतले आणि त्यातील 4154 गावांनी प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागघेतला. या गावांनी दाखवून दिले, की त्यांच्याकडे दुर्दम्यइच्छाशक्ती आहे. वॅाटर कपच्या माध्यमातून गावागावांमध्येसामाजिक भांडवल तयार होत आहे. हे सामाजिक भांडवलआपण भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठीवापरूया.”स्पर्धेच्या परीक्षक समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनीशेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याची गरजअधोरेखित केली. ते म्हणाले, “गेल्या तीन वर्षांच्या तुलनेतया स्पर्धेत यावर्षी खूप चांगले काम झाले. गावागावांमध्येविजेते ठरविणे हे अवघड काम होते. मात्र यातून हे जाणवले, की आता पीक पद्धत बदलायला हवी अन्यथा भविष्यातपिण्यासाठी पाणी मिळणार नाही. आता बारमाही पाणी शक्यनाही त्यामुळे आपण आठमाही पाण्याची पद्धतअंगीकारायला हवी. बाजारपेठ आधारित पिकांची पद्धतबदलायला हवी. अन्यथा पुढील 10 वर्षांत भारत उद्ध्वस्तहोईल. डीजे व पुतळ्यांमध्ये गुंतलेल्या तरुणाईला पाणीपरिवारात सामील करून घ्यायला हवे.” पाण्याचा ताळेबंद हीसंकल्पना पाणी फाऊंडेशनमुळे पुढे गेली, या शब्दांत त्यांनीपाणी फाऊंडेशनचे कौतुक केले.
नदीजोड प्रकल्पाला गती देणार – मुख्यमंत्र
राज्यातील पूर परिस्थितीच्या संदर्भात व्यग्र असल्यामुळेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेनाहीत. मात्र त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनउपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आज महाराष्ट्रातपुराची स्थिती असली तरी दुष्काळमुक्तीचा प्रवास सुरूचठेवावा लागेल. त्या दृष्टीने नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचेनियोजन सरकारने केले आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एकीकडे दुष्काळालाहटविण्यासाठी काम करणाऱ्या जलयोद्ध्यांचा व जलमित्रांचासत्कार होत असताना अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माणझाली आहे, याचे दु:ख आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तरभारतातील अनेक भागांत हीच परिस्थिती आहे. त्यांना मदतकरण्यासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करू.”
सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी गाव प्रथम
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत यंदा सोलापूरजिल्ह्यातील सुर्डी (ता. बार्शी) या गावाने बाजी मारली आणि75 लाख रुपयांचे पहिले पारितोषिक मिळविले. रोखरकमेसह करंडक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूपआहे. दुसऱ्या क्रमांकावर अहमदनगर जिल्ह्यातील पिंपरीजलसेन (ता.. पारनेर) आणि सातारा जिल्ह्यातील शिंदीखु्र्द (ता. माण) ही गावे राहिली. त्यांना संयुक्तपणे 50 लाखरूपये व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जळगाव जिल्ह्यातील आनोरे (ता. अमळनेर), वाशिमजिल्ह्यातील बोरव्हा खुर्द (ता. मंगरूळ पीर) आणि बीडजिल्ह्यातील देवऱ्याची वाडी (ता. बी़ड) या गावांना तिसरेपारितोषिक मिळाले. संयुक्तपणे 40 लाख रूपये व प्रमाणपत्रअसे या पारितोषकाचे स्वरूप आहे.




