● अशाप्रकारचा मोफत विमा भारतात पहिल्यांदाच लाँच करण्यात आला असून त्याअंतर्गत अनपेक्षित परिस्थितीसाठी उदा. सामान गहाळ होणे, अपघात कवच, हॉस्पिटलायझेशन विमा कवच पुरवले जाणार आहे.
● हे विमा कवच ओयो हॉटेल्स, ओयो होम्स, ओयो टाउनहाउस कलेक्शन ओ, सिल्व्हरकी, कॅपिटल ओ आणि पॅलेट रिसॉर्ट्स येथे ओयो अप, संकेतस्थळ, मोबाइल संकेतस्थळ, थेट आरक्षण आणि वॉक इन द्वारे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना दिले जाईल.
● हे विमा कवच प्रवाशांना त्यांच्या आरक्षणाच्या पूर्ण कालावधीदरम्यान विशेषतः आरक्षणाच्या कालावधीत विशिष्ट शहरानुसार लागू होते.
नाशिक, 13 ऑगस्ट 2019 – लीझ्ड आणि फ्रँचाईझ्ड हॉटेल्स, घरे, राहाण्याच्या तसेच काम करण्याच्या जागा या क्षेत्रातील जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आणि वेगाने विकसित होणारी कंपनी असलेल्या ओयो हॉटेल्स अँड होम्स कंपनीने आज आपल्या ग्राहकांसाठी मोफत विमा कवच देण्याचे जाहीर केले असून ही अशाप्रकारची पहिलीच विमा योजना आहे. प्रवाशांना त्यांच्या वास्तव्याच्या कालावधीदरम्यान आरक्षण किंमतीचाच एक भाग म्हणून हा विमा पुरवला जाणार आहे व तो भारतातील ओयोच्या विविध प्रॉपर्टीजसाठी दिला जाणार आहे. हे विमा एसीकेओ जनरल इन्शुरन्स या भारतातील पहिल्या आणि वेगाने विकसित होत असलेल्या इन्शुरटेक कंपनीबरोबर भागिदारीमध्ये लाँच करण्यात आले असून ही कंपनी विमा खरेदी व वापर सोपा बनवण्यासाठी ओळखली जाते. सफाईदार सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट आणि ग्राहककेंद्री वृत्तीला नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा पाठिंबा देत काम करण्याचे समान तत्व अवलंबणाऱ्या ओयो आणि एसीकेओ या कंपन्यांनी ग्राहकाला पाहुणाचाराचा सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी या उद्योगातली ही अशाप्रकारची पहिलीच सेवा सुरू करण्यात आली आहे.
या मोफत विमा पॅकेजमध्ये ओयो ग्राहकांना अपघाती मृत्यूविरोधात संरक्षण म्हणून 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच (10 लाख रुपयांपर्यंतचे कवच), सामान गहाळ झाल्यास (10 हजार रुपयांपर्यंतचे कवच), अपघाती वैद्यकीय खर्च (25 हजार रुपयांपर्यंतचे कवच) तसेच विशिष्ट शहरातील त्यांच्या संपूर्ण वास्तव्यादरम्यान ओपीडी उपचार इत्यादी फायदे दिले जातात. सुरुवातीला हे विमा कवच ओयो हॉटेल्स, ओयो होम्स, ओयो टाउनहाउस कलेक्शन ओ, सिल्व्हरकी, कॅपिटल ओ आणि पॅलेट रिसॉर्ट्स येथे ओयो अप, संकेतस्थळ, मोबाइल संकेतस्थळ, थेट आरक्षण तसेच वॉक इन द्वारे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना दिले जाईल. कालांतरे इतर विभाग तसेच आरक्षणाच्या इतर माध्यमांसाठी ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
या खास योजनेविषयी ओयो हॉटेल्स अँड होम्सचे भारत आणि दक्षिण आशियाचे सीओओ म्हणाले, ‘ग्राहक अनुभवाला आमचे सर्वोच्च प्राधान्य असते आणि आम्ही सातत्याने प्रवाशांना आरामदायी अनुभव देण्यासाठी झटत असतो. विमा योजनेसह आम्ही या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अशाप्रकारची अभिनव योजना पहिल्यांदाच भारतीय हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात देण्यात येत आहे. एसीकेओबरोबर भागिदारीत तयार करण्यात आलेली ही योजना देशभरातील 100 शहरांत वास्तव्य करण्यासाठी ओयोची निवड करणारऱ्या ग्राहकांना अनपेक्षित, अचानक उद्भभवणाऱ्या परिस्थितीत संरक्षण मिळवून देईल.’
“एसीकेओने ओयोशी भागिदारी करून ओयो प्रवाशांसाठी विमा कवच उपलब्ध करून देत आणखी एक वेगळेपण तयार केले आहे. या विम्याची वितरणापासून दाव्यापर्यंतची सर्व प्रक्रिया डिजिटल असून यामुळे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्या सोडवता येतील असे आम्हाला वाटते. ओयोमध्ये आम्हाला अधिक चांगला ग्राहक अनुभव देण्यासाठी आमच्याइतक्याच तळमळीने काम करणारा भागीदार मिळाला असून पुढच्या एकत्रित प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असे एसीकेओने जनरल विमा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक वरुण दुआ म्हणाले.
ही अभिनव योजना ग्राहकांबरोबरच मालमत्ताधारकांसाठीही फायदेशीर ठरणार आहे, कारण त्याअंतर्गंत त्यांना ग्राहक अनुभव व ग्राहक समाधान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. याची परिणीती ग्राहक भेटीच्या पुनरावृत्तीमध्ये आणि पर्यायाने उत्पन्न वाढीत होणार आहे.
ओयो प्रॉपर्टीचे आरक्षण केल्यानंतर ग्राहकांना आरक्षण कन्फर्मेशन पेजवर त्यांची विमा योजना पाहाता येईल व त्यासाठी त्यांना ओयो किंवा एसीकेओच्या संकेतस्थळावर आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाने लॉग इन करावे लागेल.
विम्याचा दावा कसा करावा?
ओयो अप/संकेतस्थळावर
– ओयो अप उघडा आणि ‘माय बुकिंग्ज’वर जा.
– वास्तव्याच्या (स्टे) यादीतून तुम्हाला ज्याचा दावा करायचा आहे, त्या विशिष्ट वास्तव्याची निवड करा.
– तुमच्या वास्तव्याचे तपशील दर्शवणाऱ्या पानावर ‘इन्शुरन्स’ पर्यायावर क्लिक करा.
– दाव्याचा प्रकार निवडा. पुढील पायऱ्यांचे अनुसरण करा आणि तुमचा दावा एसीकेओकडे नोंदला जाईल.
एसीकेओ. कॉम
– www.acko.com वर जा आणि ओयोवर नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकासह लॉग इन करा.
– ‘क्लेम्स’ विभागात ओयो क्लेम्स निवडा, जे ‘माय अकाउंट्स’ पेज उघडतं.
– ‘स्टे’ फिल्टर निवडा जिथून तुमचे सर्व स्टेज उघडतं.
– विशिष्ट सहल निवडा आणि पॉलिसी डिटेल्स सेक्शनखाली असलेल्या ‘इनिशिएट क्लेम’वर क्लिक करा.
– क्लेमचा प्रकार निवडा, पुढील पायऱ्यांचे अनुसरण करा आणि तुमचा दावा एसीकेओकडे नोंदला जाईल.
–
अधिक माहितीसाठी: https://www.acko.com/oyo/knowmore/en
*************************
ओयो हॉटेल्स आणि होम्सबद्दल
ओयो ही दक्षिण आशियातील सर्वात मोठी, चीनमधील तिसऱ्या क्रमांकाची हॉटेल्स, घरे आणि व्यवस्थापित जागा व कामाच्या ठिकाणांची श्रृंखला आहे. पोर्टफोलिओमध्ये पूर्णपणे कार्यान्वित स्थावर मालमत्तेचा म्हणजेच 23 हजार हॉटेल्स व 46 हजार व्हेकेशन्स घरांचा समावेश आहे. ओयो तसेच ओयो होम्स ब्रँडअंतर्गत व्यवस्थापित केली जाणारी व्हेकेशन होम्स, बेल्व्हिला आणि डान्सेंटर ब्रँड्स 80 देशांतील 800 शहरांमध्ये कार्यरत आहे. त्यामध्ये अमेरिका, युरोप, इंग्लंड, भारत, मलेशिया, मध्यपूर्व, इंडोनेशिया, फिलीपाइन्स आणि जपान यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी https://www.oyorooms.com/
एसीकेओ जनरल विमा कंपनीबदद्ल
एसीकेओ जनरल विमा कंपनी ही भारतातील पहिली आणि वेगाने विकसित होणारी विमा योजना पुरवठादार कंपनी आहे, जिच्या सर्व सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध केल्या जातात. 2016 मध्ये वरुण दुआ या फिन- टेक सीरियल उद्योजकाने स्थापन केलेली एसीकेओ ग्राहक वर्तणूक आणि माहिती विश्लेषणाच्या मदतीने नाविन्यपूर्ण उत्पादने वैयक्तिक गरजेनुसार तयार केलेल्या किंमतीत पुरवते. एसीकेओने 107 दशलक्ष डॉलर्सचा एकूण निधी उभारला आहे. कंपनीला नारायण मूर्तींचे कॅटामारान व्हेंचर्स, अक्सेल आणि सैफ पार्टनर्स, अमेझॉन, क्रिस गोपालकृष्णन, इन्फोसिसचे सह- संस्थापक, डीएसपी ब्लॅकरॉकचे हेमेंद्र कोठारी, अतुल निशार – संस्थापक आणि अध्यक्ष, हेक्लावेयर टेक्नॉलॉजीज, राजीव गुप्ता – ज्येष्ठ इन्व्हेस्टमेंट बँकर आणि अर्पवूड कॅपिटलचे संस्थापक, वेंक कृष्णन आणि न्यूव्हेंचर्स सुब्बा राव, स्विस रे आणि ट्रान्सअमेरिका व्हेंचर्स, बिन्नी बन्सल, आरपीएस व्हेंचर्स आणि इनटॅक्ट व्हेंचर्स यांचा पाठिंबा लाभलेला आहे.
एसीकेओने नुकताच आंत्रेप्रेन्युअर इंडियाने आयोजित केलेला ‘स्टार्ट अप ऑफ द इयर’ हा पुरस्कार तसेच ‘इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस’साठीचा गोल्डन पीकॉक पुरस्कार जिंकला आहे.




