इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरीअर डिझाईनर्सचा पदग्रहण सोहळा २४ ऑगस्ट रोजी

Aug 22, 2019

नाशिक – इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरीअर डिझाईनर्स (आय आय आय डी) या राष्ट्रीय स्तरावरील इंटेरीअर डिझाईनर्सच्या संस्थेच्या नाशिक शाखेचा नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा दिनांक २४ ऑगस्ट रोजी संपन्न होत असून या कार्यक्रमात आर्की. तरन्नुम काद्री या अध्यक्षा म्हणून तर अतुल बोहरा हे सचिव म्हणून पदभार स्वीकारतील.

    हॉटेल एक्स्प्रेस इन येथे होणाऱ्या या कार्यक्रमास इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरीअर डिझाईनर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप जाधव व आतरराष्ट्रीय ख्यातीचे विख्यात वास्तू विशारद संजय पुरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

    वास्तू विशारद संजय पुरी यांना देश विदेशातील १५० हून अधिक विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या कामाचे सादरीकरणहि करण्यात येणार आहे अशी माहिती मावळते अध्यक्ष राकेश लोया यांनी दिली.

 

अजून बातम्या वाचा..

Breaking News