जागतिक स्किल्स स्पर्धेसाठी प्लम्बिंगच्या भारतीय संघासोबत नाशिकचे मिलिंद शेटे रशियाला रवाना

Aug 23, 2019

नाशिक – विविध कौशल्ये वाढीस लागावी तसेच कौशल्यांमधील माहितीचे जागतिक स्तरावर आदान प्रदान व्हावे याकरिता दर २ वर्षांनी आयोजित   होणा-या वर्ड स्किल्स स्पर्धेसाठी भारतीय संघ रवाना झाला. यावर्षी २२ ते २७ ऑगस्ट दरम्यान रशियातील कझान येथे होणा-या या स्पर्धेत सहभागी होणा-या प्लाम्बिंगच्या संघासोबत स्किल्स कॉमपिटीशन कमिटी वइंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या (आय,पी.ए.) नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलिंद शेटे हे देखील गेले आहेत.

याबाबत अधिक माहिती देतांना मिलिंद शेटे म्हणाले की, यावर्षी जगातील सुमारे ६० देशातील १३०० हून अधिक स्पर्धक ५६ विविध कौशल्य आधारित स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणार असून हे बघण्यासाठी जगभरातून २ लाखाहून अधिक दर्शक येण्याची अपेक्षा आहे. हे स्पर्धक विविध कौशल्य जसे बेकारी, क्लाउड कॉप्मुटिंग, सीएनसी कटिंग, बांधकाम, आरोग्य, ज्वेलरी, प्लंबिंग या व अशा विविध ५६ कौशल्यांमध्ये आयोजित स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवतील.

भारत सरकारचे राष्ट्रीय स्किल्स डेव्हलपमेंट कॉरपोरेशन कौशल्य वाढीस चालना देण्यासाठी २०११ पासून या स्पर्धेत भारताचा संघ पाठवत आहेत. भारताचा संघ निवडीसाठी गत वर्षी २२ राज्ये व केंद्र शासीत प्रदेशांमधून विभागवार व राज्यावार निवड फे-यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध कौशल्यातील ५०००० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

यावर्षी या स्पर्धेत सहभागी होणा-या प्लंबिंगच्या संघामध्ये नाशिकच्या मिलिंद शेटे समवेत हिमांशू बोहरा, चैतन्य दहिया, श्रीधर व वरुण टंडन यांचा समावेश आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News