‘ग्रँड शॉप्सी मेला’सह सणांचे स्वागत करा स्टाइलमध्ये

Sep 5, 2022

~ शॉप्सीचा हा पहिलाच असा खरेदीउत्सव आहे जो खास द्वितीय श्रेणी आणि त्यापुढील ग्राहकांसाठी आखण्यात आला आहे

~ खरेदीचा हा उत्सव ३ ते ११ सप्टेंबर २०२२ या काळात सुरू राहील, यामुळे पहिल्यांदाच या व्यासपीठावर सर्व विक्रेते एकत्र येतील

Nashik : शॉप्सी बाय फ्लिपकार्ट या भारतातील हायपर-व्हॅल्यू ई-कॉमर्स व्यासपीठाने ‘ग्रँड शॉप्सी मेला’ या आपल्या पहिल्याच भव्य खरेदी उत्सवाची घोषणा केली आहे. सणासुदीच्या काळासाठी खास ३ ते ११ सप्टेंबर २०२२ या काळात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सारा अली खान शॉप्सीचा चेहरा असेल. आकर्षक डील्स आणि ऑफर्सचा लाभ घेण्याची प्रत्येक भारतीय व्यक्तीची, विशेषत: सणासुदीच्या काळात हे लाभ मिळावेत, अशी इच्छा ती मांडेल.

या व्यासपीठावर वर्षभरच सेलच्या काळातील किमती असतात. त्यामुळे प्रत्येक भारतीय ग्राहकासाठी हे खरेदीचे हक्काचे ठिकाण ठरते, विशेषत: जे ग्राहक सेलच्या काळात खरेदी करण्यासाठी थांबलेले असतात. अर्थात, ‘ग्रँड शॉप्सी मेला’ हा शॉप्सीचा सर्वात भव्य असा उपक्रम आहे. सणासुदीच्या काळात खरेदी करण्यास ग्राहक उत्सुक आहेतच. त्यामुळे या सेलमुळे सणांचा आनंद अधिक दुणावणार आहे. या निमित्ताने शॉप्सी प्रथमच सर्व विक्रेत्यांना एकत्र आणणार आहे आणि त्याचवेळी ग्राहकांनाही १५० हून अधिक विभाग आणि जवळपास १५० दशलक्ष उत्पादनांमध्ये योग्य मूल्य मिळवून देणाऱ्या ऑफर्सही ग्राहकांना मिळतील. यात तुम्ही एखादे घड्याळ फक्त १५ रुपयांना, साडी २५ रुपयांना, कुर्ता ४० रुपयांना, टीशर्ट ३० रुपयांना आणि अशा अनेक आकर्षक खरेद्या करू शकता.

फ्लिपकार्टच्या न्यू बिझनेसेस विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन म्हणाले, “ग्रँड शॉप्सी मेळ्याचे पहिले पर्व सादर करून भारतीय ग्राहकांच्या उत्सवी काळातील खरेदीला नवे स्वरूप देताना आम्हाला फारच आनंद होत आहे. शॉप्सीवरील जवळपास ५० टक्के ग्राहक ई-कॉमर्सवर नवीन आहेत आणि आमच्या एकूण ग्राहकांपैकी ६५ टक्क्यांहून अधिक ग्राहक द्वितीय श्रेणी शहरे आणि त्यापुढील शहरांमधील आहेत. त्यामुळे या सेलमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही उपलब्ध असावे, याची खातरजमा आम्ही केली आहे. पहिल्यांदाच आमच्या व्यासपीठावर मोठ्या प्रमाणावर विक्रेते एकत्र येत आहेत आणि त्यामुळे सणासुदीच्या या काळात ग्राहकांच्या खरेदीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध विभागांमधील उत्पादनांच्या व्यापक श्रेणीवर आकर्षक, अतुलनीय अशा ऑफर्स आणि डील्सही उपलब्ध असतील. आपल्या आवडत्या उत्पादनांवरील आकर्षक डील्सचा लाभ मिळाल्याने आमचे ग्राहक या सणांचे स्वागत आनंदाने, उत्साहाने करतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.”

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News