शिक्षक हा समाजाच्या जडंणघडणीतला महत्वाचा घटक : सोनाली राजे पवार

Sep 5, 2022

कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

नाशिक दिनांक ५ सप्टेंबर : कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने दरवर्षी भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिना निमित्त जिल्ह्यातील सर्वोत्तम शिक्षकांचा सत्कार केला जातो. यावर्षीपासून या पुरस्काराचे स्वरूप महाराष्ट्र राज्यस्तरीय करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात भरीव भूमिका पार पडलेले आदर्श शिक्षक कै. गंगाराम गोपाळराव पाटील- कोठावळे गुरुजी यांच्या नांवाने  देण्यात आलेल्या या पुरस्कारांमध्ये  महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका सर्वोत्तम शिक्षकाची निवड करण्यात आली.  महाराष्ट्रातील  या ५० गुणवंत आदर्श शिक्षकांना शाल, श्रीफळ, आकर्षक सन्मान-चिन्ह आणि गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरगाणा संस्थांनच्या संस्थानिक सौ. सोनालीराजे पवार, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, आनंद खरे, कालिका देवी मंदिरचे खजिनदार सुभाष तळाजिया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, दत्ता पाटील, प्रतिभा मोगल, राम पाटील, भरत पाटील आणि कोठावळे परिवार आदी मान्यवरांच्या हस्ते या सर्वोत्तम शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.   यामध्ये उमेश खंदारकर – जालना, डॉ. उमेश राठी – अमरावती, डॉ. संतोषी साऊळकर – यवतमाळ, भागूराम जाधव – नंदुरबार, अमितकुमार जाधव – सोलापूर, रमेश नांदेडकर – नांदेड, केतन पवार- जळगाव,  डॉ. दिगंबर मोकाट- पुणे , सौ. सुलतान बी. कालिम खान- बुलढाणा, धनंजय वानखेडे – वाशिम, परशराम रामा अंबी – कोल्हापूर, सुनील देशमुख- परभणी, अकचहुत्राव वणवे – सिंधुदुर्ग,  डॉ. यशवंत पाटील –  नागपूर,  सचिन कुमावत- धुळे, डॉ. अमेलीया अंटोणी – ठाणे, माधव गवांदे- मुंबई उपनगर, डॉ. बल राज अवचट- वर्धा, योगेश बण – नागपूर,  राजेंद्र कोहकडे- अहमदनगर, चंद्रकांत भिसे- सातारा, सौ. उज्वला साठे – सांगली, सौ. विजेता रहाटे नवी मुंबई, सुलक्षणा देशमुख – अकोला, संजीक बांडेबूचे – भंडारा, कविता मालुसरे- जालना, सुनंदा कांगणे – सिल्वासा, नवनाथ निफाडे – नाशिक, चिन्हू रोटे- निफाड, निंबा कापडणीस – सटाणा,   प्रवीण व्यवहारे- नांदगाव, विलास शिंदे – दिडोरी , तुकाराम मांडवडे – मालेगाव, नितीन पवार – त्र्यंबक, अनिल पवार – इगतपुरी , ज्ञानेश्वर ठाकरे – चांदवड, अनिल भांडारे- निफाड, एस. पी. मोरे – कळवण, सौ. क्षितिज खटावकर – नाशिक, चंद्रकांत पठाडे – पेठ, विनायक नवसुपे – नाशिक, डॉ. जयश्री जाधव – नाशिक, हरिश्चंद्र गावंडे – दिडोरी. यांचा समावेश होता.   या राज्य पुरस्काराबरोबरच नाशिक जिल्ह्यातील १२ आदर्श शिक्षकांनाही जिल्हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.                                                   यावेळी बोलतांना सौ सोनाली राजे पवार यांनी सांगितले की शिक्षक हा समाजाच्या जडण-घडणीतला महत्वाचा घटक आहे. पूर्वी पालक शिक्षकांना सर्व अधिकार देत होते. त्यामुळे अश्या आदर्श शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवल्या. परंतु आज शिक्षकांना विद्यार्थ्यांना थोडेसेही रागवता येत नाही असा नियम  केलेला आहे. तरीही आजचे आदर्श शिक्षक आपल्या परीने चांगले नागरिक घडवत आहेत. त्यामुळे या शिक्षकाचे कौतुक होणे आवश्यक आहे, आणि कालिका देवी मंदिरच्या वतीने अश्या गुणवंत शिक्षकांचा सन्मान होत आहे याचेही कौतुक केले पाहिजे असे सांगितले. केशव अण्णा पाटील यांनीही कालिका देवी मंदिरच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांना सन्मान करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो असे सांगितले.                         या सत्काराला परशराम अंबी(कोल्हापूर) सुलताना कलीम खान (बुलढाणा), क्षितिज खटावकर(नाशिक) यांनी उत्तर देतांना कालिका देवी मंदिर आणि आयोजकांचे आभार मानले.   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद खरे यांनी केले, पाहुण्यांचे स्वागत अशोक दुधारे यांनी केले. उदय खरे यांनी पुरस्ककारर्थी शिक्षकांच्या कार्याचा आढावा सादर केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले.    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन हिंगमिरे, सुनील बिरारी, मनोज वाघचौरे, अविनाश ढोली, शशांक वझे, राम पाटील, भरत पाटील, श्याम पाटील, उदय खरे, अर्जुन वेलजाळी, दिपक पाटील, दीपक निकम आदींनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News