वास्तूचे डिझाईन करतांना नैसर्गिक बाबी व गरजांचा समन्वय आवश्यक – संजय पुरी

Aug 25, 2019

आय आय आय डी च्या पदग्रहण समारंभात प्रतिपादन  

 नाशिक – कोणत्याही वास्तूचे डिझाईन करतांना नैसर्गिक हवा व प्रकाश, दिशा, जमिनीचा नैसर्गिक चढ उतार, शहराचे तापमान, वापरणा-यांच्या गरजा व आवश्यकता यांचा विचार केल्यास त्या वास्तू समर्पक होतात व तसेच अमूल्य पर्यावरणाचे संवर्धन होते. त्यामुळे याचा विचार वास्तू विशारद व डिझाईनर्स यांनी करावा असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वास्तुविशारद संजय पुरी यांनी केले. ते नाशिकमधील हॉटेल एक्सप्रेस इन येथे आयोजित इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरीअर डिझाईनर्सच्या (आय आय आय डी) नाशिक शाखेच्या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  शहराच्या विकासात इमारतींच्या डिझाईनचे महत्वाचे स्थान असून सुयोग्य इमारतींमुळे शहराला ओळख मिळते. बाह्य रूप व अंतर्गत सजावटी मध्ये विविध बाबींचा अभ्यास करून वेगवेगळे प्रयोग केल्यास त्याचा लाभ हा तेथे राहणाऱ्यास होतो. यासाठी उपलब्ध जागा किती मोठी आहे त्यापेक्षा तेथील जागेचा सुयोग्य वापर कसा करता येईल याचाही विचार करावा असे आवाहनही संजय पुरी यांनी केले.   याआधी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विवा अॅल्युमिनियम कंम्पोझिटचे मुख्य कार्यकारी संचालक प्रकाश जैन, राकेश लोया, तरन्नुम काद्री, अतुल बोहरा, हकीम सिन्नरवाला हे उपस्थित होते. मावळते अध्यक्ष राकेश लोया यांनी आपल्या कार्यकाळाचा अहवाल सादर केला. या काळात अनेक ज्ञानसंवर्धनाच्या  कार्यक्रमाने सर्वच सदस्यांना लाभ झाला असल्याचे नमूद केले.        नूतन अध्यक्षा तरन्नुम काद्री यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,  इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरीअर डिझाईनर्स (आय आय आय डी) या संस्थेची स्थापना वर्ष १९७२ मध्ये करण्यात आली. निर्माण क्षेत्रात महत्वाच्या अशा आंतरिक सजावट क्षेत्रात होणारे बदल, तंत्रज्ञान  व कल्पना याबाबतच्या माहितीचे देश विदेश पातळीवर आदान प्रदान करणे हा या संस्थेचा हेतू आहे. आजमितीला देशातील २८ शाखांमधून ८००० हून अधिक याचे सदस्य आहेत.आर्कि. तरन्नुम काद्री यांनी आपल्या नवीन टीमची सर्वांना ओळख करून दिली. आर्कि .राखी टकले यांनी नवीन कार्याकारणीस शपथ दिली.  या कार्याक्रमासाठी  स्मृतिचिन्ह डिझाईन करण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्ध्येमध्ये नेहा राठोड हिने प्रथम क्रमांक पटकावला. प्राजक्ता तांबोळी व श्रद्धा तांबोळी यांनी द्वितीय तर नौंनशी सिंग व नमिता देवरे यांना तृतीय क्रमांक मिळाला. सर्व विजेत्यांना कार्यक्रमात पारितोषिक प्रदान करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरुची रणदिवे व नितीन पटेल यांनी केले. वर्ष २०१९ ची नूतन कार्यकारिणी अशी – अध्यक्षा – आर्कि. तरन्नुम काद्री, सचिव – अतुल बोहरा, प्रेसिडेंट इलेक्ट – आर्कि. वैशाली प्रधान., उपाध्यक्ष – सचिन गांग, सहसचिव- सागर काबरे, कोषाध्यक्ष – हकीमभाई सिन्नरवाला,याप्रसंगी माजी अध्यक्ष हेमंत दुगड, आर्कि. सुप्रिया नाथे, आकाश कदम, आर्कि संजय पाटील, असलम काद्री, प्रफुल्ल कारखानीस, रमेश एडवनकर, अरुण काबरे  तसेच शहरातील अन्य मान्यवर, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News