आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी पॉलिसी मेकिंगची गरज- सुप्रिया सुळे

Aug 27, 2019

नाशिक,:- आर्थिक मंदीच्या सावटा मुळे देशातील उद्योग व्यवसाय संकटात सापडले असून अनेक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्रात पॉलिसी मेकिंगची गरज असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित संवाद दौऱ्यासाठी त्या नाशिकला आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आमदार दिपीका चव्हाण, नरहरी झिरवाळ,माजी आमदार दिलीप बनकर, उत्तम भालेराव, श्रीराम शेटे, नानासाहेब महाले, दिलीप खैरे, गजानन शेलार,जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड,कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने,शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,निवृत्ती अरिंगळे, पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंभळे, जिल्हा परिषद सभापती यतीन पगार, अपर्णा खोसकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, शेफाली भुजबळ, नगरसेविका सुषमा पगारे, समीना मेमन, सचिन पिंगळे, संजय खैरनार, तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संवाद दौरा नियोजित केला असून महाराष्ट्रातील सर्व शहरामध्ये जाऊन बेरोजगारीसह विविध प्रश्नासाठी हा दौरा सुरु करण्यात आला आहे. यामध्ये गाव पातळीवरील परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या की, सरकारने स्मार्ट सिटी प्रोजेक्ट राबविला खरा पण निधी अभावी कामे होतांना दिसत नाही. नाशिक मध्ये स्मार्ट सिटीसाठी केवळ ९० कोटी रुपये आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच नेमकं काय होतंय हा प्रश्न आहे. सरकारकडे पैसे नसल्याने सरकारी मालमत्ता विकण्याची वेळ सरकारवर आली आहे. त्यामुळे हे प्रोजेक्ट पूर्ण होतील की नाही का प्रश्नच आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.मंदीच्या फटक्यामुळे नाशिकमध्ये बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. महाराष्ट्रात एवढ्या नोकऱ्या असतील तर बेरोजगारांची संख्या का वाढत आहे. त्यामुळे युवकांच्या या प्रश्नावर आम्ही काम करायला तयार आहोत असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. देशातील प्रश्न बेरोजगरिसह अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रात पॉलिसी मेकिंग करण्याची गरज आहे. त्यासाठी उद्योगात जो पर्यंत स्थैर्य निर्माण होत नाही तो पर्यंत अर्थव्यवस्था वाढू शकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. असे असतांना मुख्यमंत्र्यांना राज्यातील प्रश्न दिसतंच नाही यासाठी त्यांनी अर्थमंत्र्यांना भेटण्याची गरज असल्याचे सांगितले.सरकार रिजर्व्ह बँकेचे रिझर्व्ह निधी सरकार कडून काढण्यात येत असून देशातील आर्थिक मंदीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी कोण कुठल्या पक्षात जातोय यांच्यावरच चर्चा होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राजकारणाची व्याख्याच बदलली आहे. त्याला सर्वच जबाबदार आहे.शासनाच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात असल्याची चर्चा सगळीकडे असल्याचे सांगून निवडणुका फक्त जिंकायला लढल्या जात नाही तर एक व्हिजन घेऊन काम काम करण्यासाठी लढल्या जातात असे त्यांनी यावेळी सांगितले

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News