Nashik : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाने आपल्या आदरणीय ग्राहकांसाठी “ग्राहक सेमिनार” आयोजित केले होते. सेमिनारमध्ये बँकेचे ज्येष्ठ ग्राहक तसेच नवीन ग्राहक ही उपस्थित होते. चर्चासत्रात बँकेचे पुणे विभाग प्रमुख श्री बी. बी. मुटरेज़ा उपस्थित होते. बँकेच्या नाशिक प्रादेशिक कार्यलयाचे विभागीय प्रमुख श्री रंजीत सिंह यांनी बँकेच्या आदरणीय ग्राहकांचे स्वागत करून सेमिनारला सुरुवात झाली. श्री बी. बी. मुटरेजा जी यांनी बँकेची सध्याची परिस्थिती आणि बँकेच्या व्यवस्थापनाने केलेल्या सुधारात्मक उपाययोजनांबाबत ग्राहकांबरोबर चर्चा केली. ग्राहकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सेंट्रल बँक ऑफ इंडिया भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पीसीएमधून बाहेर आली आहे. बँकेच्या ‘सेंट जीएसटी’ योजनेबाबतही मंडळ प्रमुखांनी माहिती दिली. “सेंट जीएसटी” योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान कागदपत्र आवश्यक आहेत. यासोबतच, डिसेंबर 2022 पर्यंत रिटेल योजनांवर बँकेकडून कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 1 कोटींहून अधिक कर्ज प्रकरणे प्रादेशिक स्तरावर प्रक्रिया करण्याच्या योजनेची माहिती ही दिली, जेणेकरून प्रक्रियेस विलंब होणार नाही. चर्चेदरम्यान मंडळ प्रमुखांनी बँकेच्या सेवा, कार्यालयीन तसेच शाखा स्तरावर उद्भवणाऱ्या समस्या आदींबाबत उपस्थितांकडून अभिप्राय व सूचना जाणून घेतल्या. बँक ग्राहकांनी ही बँकेशी संबंधित त्यांच्या सूचना तसेछ अभिप्राय मंडळ प्रमुखांना सांगितले। मंडळ प्रमुखांनी ग्राहकांचे अभिप्राय व समस्या नमूद करून त्वरित त्यांचे समाधान केले. बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री.सचिन डोके, विनोद वाजे, व्यवस्थापक श्री. भावेश जाधव, सहाय्यक व्यवस्थापक श्री. मोहसीन शेख, श्री. संदीप काळे, आणि श्री. अर्जुन लाल मीना, सुरक्षा अधिकारी यांनी या आयोजनासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन श्री महेशकुमार आहेर, राजभाषा अधिकारी यांनी केले.
मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो
Nashik : मराठा समाजातील उद्योजकांच्या सक्षमीकरण, नेटवर्किंग व व्यावसायिक विकासासाठी संपूर्ण...






