हॉटेल आणि रेस्टॉरंट असो चे पश्चिम विभागीय अधिवेशन 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान नाशिक मध्ये

Oct 7, 2022

दिलीप वेंगसरकर करणार उद्घाटन

नाशिक, : हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (HRAWI)  या संस्थेतर्फे7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2022 या कालावधीत नाशिकमध्ये संस्थेचे 19 वे  विभागीय अधिवेशन होणार असून या निमित्ताने पश्चिम विभागातील हॉस्पिटॅलिटी उद्योगातील अनेक नामवंत  व्यावसायिक नाशिक मध्ये येणार आहेत . या अधिवेशनाचे उद्घाटन  भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार  दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती असोसिअशन चे अध्यक्ष  प्रदीप शेट्टी यांनी दिली .सुमारे   ३ वर्षाच्या खंडानंतर हे पश्चिम विभागीय अधिवेशन होत असून  या अधिवेशनात अनेक हॉटेल व रेस्टॉरंट चे प्रतिनिधी ,  शासकीय अधिकारी , गुंतवणूकदार आणि उद्योगातील दिग्गज सहभागी होणार असून ते विविध विषयावर विचारमंथन आणि संवाद  करतील .हॉस्पिटॅलिटी  उद्योगापुढील आव्हाने  आणि असणाऱ्या संधीची माहिती, नवे तंत्रज्ञान व  नव्या उत्पादनाची माहिती तसेच  नेट्वर्किंग ची संधी या अधिवेशनामुळे मिळणार असून पर्यटन क्षेत्रात महत्वाचे शहर असणाऱ्या नाशिक ची निवड या अधिवेशनासाठी करण्यात आली असून या अधिवेशना मुळे नाशिक मधील वाईन पर्यटनासोबतच धार्मिक ,कृषी , सांस्कृतिक , साहसी  पर्यटन तसेच त्याच्याशी संबंधित  अनेक सेवांना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असेही प्रदीप शेट्टी म्हणाले ‘हियर टू विन’ या थीम वर आधारित या अधिवेशनात मोठ्या संख्येने  हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील शेट्टी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

Breaking News