अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये “ स्कोलियोसिस” शस्रक्रिया यशस्वी

Oct 10, 2022

नाशिक : १२ वर्षीय जान्हवीला ( नाव बदलेले आहे ) जन्मापासूनच पाठीच्या कण्यातील दोष होता, ज्याला “स्कोलियोसिस” असे म्हणतात. मात्र, वयाच्या २ ऱ्या वर्षापर्यंत अशी कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, ज्यामुळे ती या आजाराने ग्रस्त असल्याचे सूचित होत नव्हतं. जेव्हा तिच्या पालकांना तिच्या प्रमुख विकासाच्या टप्यात विसंगती आढळली.जसे कि वयानुरूप वजन व उंची न वाढणे , तिला चालताना हि त्रास जाणवणे. जान्हवीची प्रकृती दिवसगणिक बिघडत असल्याचे पाहून तिच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. तिच्या एक्स-रे मध्ये असे दिसून आले की, तिला स्कोलियोसिस आहे. पाठीच्या कण्यातील कलही हळूहळू जड होऊ लागला होता आणि त्यामुळे तिला पायात अशक्तपणा जाणवू लागला होता या सोबतच चालताना संतुलन राखण्यातही त्रास होऊ लागला होता. हे पाहता, हाडातील विकृती दुरुस्त करण्यासाठी आणि त्याचा आकार बिघडण्यापासून रोखण्यासाठी Scoliosis Deformity शस्त्रक्रिया करण्यात आली. असामान्य कोन आणि पाठीचा स्तंभ वाकल्यामुळे पाठीच्या कण्यातील विकृती सुधारण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. तथापि, न्यूरो मॉनिटरिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञाच्या साह्याने पेडिकल स्क्रू आणि रॉड 100% अचूकतेसह योग्य आणि अचूकपणे स्थित होतात. यामुळे मज्जारज्जुला इजा होत नाही तसेच पायाला अर्धांगवायू चा धोका टाळता येतो. शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली आणि आता तिला दैनंदिन कामात इतरांवर अवलूंबून राहावे लागत नाही. जान्हवी आता खऱ्या अर्थाने ताठ मानेने जगू शकते
हि शस्त्रक्रिया यशस्वीतेसाठी शल्य विशारद तज्ञ् डॉ चंदन महंती , डॉ निखिल चल्लावर , भूलतज्ञ् डॉ संदीप भंगाळे , बालरोग तज्ञ् डॉ सुशील पारख , यांच्या सहकार्यामुळे हि अवघड शास्रकीर्या करण्यात टीमला यश आले. संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

लहान मुलांमधील जन्मजात असणारी अस्थी व्यंग दूर करण्यासाठी लागणारी सर्व अत्याधुनिक उपकरणे , विशिष्ठ इन्फ्रास्टक्चर तसेच सर्जन सह इतर संपूर्ण टीम एकाच छताखाली उपलब्ध आहे. व त्यामुळे हे उपचार आपण मुंबई ,पुणे , इंदोर सारख्या शहरामध्ये उपचारासाठी जावे लागत होते. परंतु हि सुविधा नाशिक मध्ये उपलब्ध झाल्यामुळे वेळ आणि पैसा वाचणार आहे . यासोबत लहान मुलांमधील अस्थी विकार दूर होण्यासाठी ज्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा रुग्णसाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नेहमीच पुढाकार घेत असते. आणि त्याच्यासाठी आर्थिक आधार देत असतं म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल सर्वसमावेशक पर्याय म्हणून उत्तर महाराष्ट्रात पुढे आले आहे.

डॉ सुशील पारख – मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु व बालरोग तज्ञ् , अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ,नाशिक

अजून बातम्या वाचा..

मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

Nashik : मराठा समाजातील उद्योजकांच्या सक्षमीकरण, नेटवर्किंग व व्यावसायिक विकासासाठी संपूर्ण...

read more
प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचे हस्ते संपन्न

प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचे हस्ते संपन्न

नाशिक : प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांच्या - "मविप्र चे शिल्पकार ॲड.बाबुराव ठाकरे" या २४ व्या...

read more
आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – घोषणा ; इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी  ₹250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती जाहीर!

आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – घोषणा ; इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती जाहीर!

नाशिक : मागील १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत आलेल्या आकाश...

read more
क्रोमाच्या फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदाच्या गणेश चतुर्थीला ६०% पर्यंतची मोठी बचत

क्रोमाच्या फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदाच्या गणेश चतुर्थीला ६०% पर्यंतची मोठी बचत

घरी आणा पार्टी स्पीकर्सवर ६०% पर्यंत सूट,  व्हॅल्यू स्मार्टफोन्स खरेदी करा ३०,००० पेक्षा कमी...

read more
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या 5 व्या मेडिकल स्टोरचे उद्घाटन

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या 5 व्या मेडिकल स्टोरचे उद्घाटन

नाशिक : मुंबई आणि पुण्यातील विश्वसनीय फार्मसी चेन, झेनो हेल्थने आज नाशिकमध्ये त्यांच्या 5 व्या...

read more
Breaking News