अॅमेझॉनच्या ‘आय हॅव स्पेस’ पार्टनर्स उपक्रमाला प्रतिसाद

Nov 24, 2022

महाराष्ट्रातील सुमारे ३००० पार्टनर्सचा समावेश

नाशिक : महाराष्ट्रामध्ये आपल्या डिलिव्हरी नेटवर्कचा विस्तार करतानाच अॅमेझॉन लोकांना त्यांच्यातील उद्यमशीलतेचा शोध घेण्यासही प्रोत्साहन देत आहे व ‘आय हॅव स्पेस सारख्या आपल्या अनेक लास्ट-माईल डिलिव्हरी प्रोग्राम्सच्या माध्यमातून आपल्या कार्यकक्षांचे क्षितिज रूंदावण्याच्या संधी त्यांच्यासाठी निर्माण करत आहे. या उपक्रमात ठाण्यातील दीपाली आणि अमोल नलावडे हे दाम्पत्य ही सामील झाले असून अॅमेझॉनच्या आय हॅव स्पेस प्रोग्रामने आम्हाला स्वत:मधील उद्यमशीलता एका निश्चित दिशेने पुढे नेण्यासाठी आणि आपापला व्यवसाय आपल्या बळावर चालविण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असे अमोल सांगतात. तर या प्रोग्रामच्या विशिष्ट कार्यपद्धतीमुळे आम्हाला कमी वर्दळीच्या वेळेमध्ये पॅकेजेस घरपोच करता येतात, ज्यामुळे आम्हाला उत्पन्नाचा एक अतिरिक्त स्त्रोत सापडला आहेच, पण त्याचबरोबर आम्हाला आपले आयुष्य आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या याचा मेळ सहज साधता येत असल्याचे दीपाली यांनी सांगितले.
या प्रोग्रामच्या माध्यमातून अॅमेझॉन इंडियाकडून स्थानिक स्टोअर्स आणि व्यावसायिकांशी या स्टोअर्सच्या २ ते ४ किलोमीटर्सच्या परिघातील ग्राहकांपर्यंत वस्तू घरपोच करण्यासाठी भागीदारी केली जाते व यामुळे हे दुकानदार आपल्या नियमित मिळकतीला वरकड उत्पन्नाची जोड देऊ शकतात. २०१५ साली सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या भारतभर पसरलेल्या नेटवर्कमध्ये जवळ-जवळ ४२० शहरे आणि महानगरांमधील २८,००० हून अधिक स्थानिक व किराणा भागीदारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील ३०००‘आय हॅव स्पेस’ (IHS) स्टोअर्सचाही समावेश आहे, ज्यांच्या स्वत:च्या काही प्रेरणादायी कहाण्या आहेत.
भारतासाठीच्या अॅमेझॉन लॉजिस्टिक्स विभागाच्या डिरेक्टर डॉ. करुणा शंकर पांडे म्हणाले, “अॅमेझॉन इंडिया विविध क्षेत्रातील व्यक्तींना कामाच्या संधी पुरविण्याप्रती कटिबद्ध आहे. अमोल आणि दीपाली हे दाम्पत्य म्हणजे दोन खंबीर व्यक्ती आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व कशाप्रकारे जपू शकतात, हे करताना कुटुंबाच्या जबाबदाऱ्या एकत्रितपणे कशा सांभाळू शकतात आणि एकमेकांसाठी एक भक्कम आधार कशा ठरू शकतात याचे उत्तम उदाहरण आहेत. हा प्रोग्राम व त्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी यांचा या जोडप्याला किती मोठा फायदा होत आहे हे पाहणे समाधानकारक आहे.”

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News