जास्तीत जास्त प्रॉपर्टी ब्रोकरनी सहभागी होण्याचे आवाहन

नाशिक : प्रोफेशनल रिअल्टर्स असोसिएशन नासिक ( प्राण ) या संस्थेतर्फे ” रिअल्टर्स डे साजरा करण्याचे आयोजित केले आहे . दरवर्षाप्रमाणे सातबारा म्हणजेच ७ डिसेंबर २२ रोजी दुपारी चार वाजता यावर्षी हा कार्यक्रम नासिकच्या प्रथीतयश अशा एबीएच बिल्डर्सच्या सहयोगाने त्यांच्या ट्री लँड या गंगापूर रोड वरील भव्य प्रकल्पावर सादर होत आहे . सदर कार्यक्रमात ब्रोकर की पाठशाला चे संस्थापक श्री . विनोदजी ठक्कर मुंबई हे रिअल इस्टेट मार्केटिंग या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत . तसेच रामकृष्ण आरोग्य संस्थेचे प्रमुख स्वामी श्रीकंठानंद यांचे व्याख्यान आयोजित केले आहे व मुद्रांक जिल्हाधिकारी श्री . कैलासजी दवंगे हे स्टॅम्प ड्युटी व नाशिकचा विकास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत . या कार्यक्रमाचे मुख्य प्रयोजकत्व एबीएच डेव्हलपर्स ( ट्री ) लँड ) यांनी स्वीकारले असून सहप्रयोजक म्हणून एचडीएफसी लिमिटेड , दोस्ती रियलटर्स मुंबई , व्हीटीपी रियल्टी , पुणे , प्रॉपर ट्री रिअल्टर्स नाशिक व प्रॉपर्टी महाराष्ट्र नाशिक यांनी स्वीकारले आहे . या कार्यक्रमास रिअल इस्टेट क्षेत्रातील का म करणाऱ्या सर्व रिअल्टर्स , ब्रोकर्स , बिल्डर्स यांनी हजर राहावे व त्यांचा सहभाग नोंदवावा असे आव्हान प्राण या संस्थेचे अध्यक्ष श्री . विक्रांत आव्हाड , उपाध्यक्ष श्री . प्रदीप रणधीर , सचिव श्री . नितीन कोतकर , सह सेक्रेटरी श्री . राज तलरेजा , खजिनदार श्री कैलास कदम यांनी केले आहे . संस्थेचे सल्लागार श्री ज्ञानेश्वर धामणे व राजेंद्र कोतकर हे नियोजनासाठी मार्गदर्शन करीत आहेत . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमिटी मेंबर श्री नितीन जांगडा , संजय दुसे , अमित वाघ , श्रीरंग भदाणे , योगेश नेरकर , निलेश येवले , जगदीश बंग , यश शहा , प्रकाश कटपाल हे प्रयत्न करीत आहेत . कार्यक्रमासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे . त्यासाठी खालील सदस्यांशी संपर्क साधावा … जगदीश बंग मोबाईल नंबर 9922617447 , निलेश येवले 9922263744




