प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे, 340 रुपये ते 357 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या किंमतीचा बँड निश्चित
नाशिक: देशातील सर्वात मोठी वाइन उत्पादक आणि विक्रेती आणि भारतीय वाइन उद्योगातील विक्रीचे प्रमाण आणि मूल्याच्या बाबतीत आर्थिक वर्ष 2009 पासून बाजारपेठेत सातत्याने आघाडीवर असलेल्या सुला विनयार्ड्स लिमिटेडने, तिच्या पहिल्या सार्वजनिक ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर 340 रुपये ते 357 रुपये या किंमतीचा बँड निश्चित केला आहे. कंपनीची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (“आयपीओ” किंवा “ऑफर”) सोमवार, 12 डिसेंबर, 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुली होईल आणि बुधवारी, 14 डिसेंबर, 2022 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार, किमान 42 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 42 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. प्रति इक्विटी शेअर 2 रुपये चे दर्शनी मूल्य असलेला सार्वजनिक इश्यू ही, सध्याच्या भागधारकांद्वारे एकूण 26,900,530 इक्विटी शेअर्सची, संपूर्ण ऑफर फॉर सेल (ओएफएस) आहे.
सुलाने 1996मध्ये आपली पहिली द्राक्ष बाग लावली आणि 2000मध्ये सौविग्नॉन ब्लँक, चेनिन ब्लँक, झिन्फँडेल, रिस्लिंग, रेड स्पार्कलिंग आणि डेझर्ट वाइन ऑफरिंगसह भारतात व्हराएटल वाईन सादर करणारी ती पहिली कंपनी बनली. आथिर्क वर्ष 2005मध्ये तिने नाशिक, महाराष्ट्र येथील तिच्या वाईनरीमध्ये भारतातील पहिली वाइन टेस्टिंग रूम सुरू केली आणि त्यानंतर 2008मध्ये देशातील पहिले व्हाइनयार्ड रिसॉर्ट सुरू केले आणि त्याच वर्षी, या वाइन निर्मातीने वर्ष 2008मध्ये नाशिक सुविधेमध्ये भारतातील पहिला वाइन-थीम असलेला संगीत महोत्सव, “सुलाफेस्ट” सुरू केला. “सुलाफेस्ट” हा, भारतातील सर्वात मोठा वाइन संगीत महोत्सव आणि उपस्थितीच्या आधारावर आशियातील सर्वात मोठ्या वाइन संगीत महोत्सवांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आथिर्क वर्ष 2017मध्ये, तिने कर्नाटकातील “डोमेन सुला” सुविधेमध्ये वाईन टेस्टिंग रूम सुरू केली.
31 मार्च, 2021 रोजी, मुंबई-स्थित असलेली ही वाइन मेकर, भारतातील सर्वात वेगाने वाढणारी अल्कोहोलिक पेय कंपनी आहे आणि रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुद्या (डीआरएचपी)मध्ये किंवा मसुदा दस्तावेजामध्ये नमूद केल्यानुसार टेक्नोपाक अहवालानुसार, 2011 आणि 2022 या आर्थिक वर्षांमध्ये 13.3%च्या चक्रवाढ वार्षिक वाढ दरा (सीएजीआर)ने वाढली आहे. ऑपरेशन्सच्या एकूण कमाईच्या आधारावर, 100% ग्रेप्स वाइन श्रेणीमध्ये, 2009मधील 33% वरून 2022च्या आर्थिक वर्षात, तिचा बाजार हिस्सा 52%पर्यंत वाढला आहे. तिच्या व्यवसायाचे, वाईनचे उत्पादन, वाईन आणि स्पिरीटची आयात आणि वितरण आणि द्राक्ष बाग रिसॉर्ट आणि टेस्टिंग रूमसह, वाइन पर्यटन स्थळांच्या मालकी आणि ऑपरेशनमधून सेवांची विक्री यांच्या अंतर्गत विस्तृतपणे वर्गीकरण केले जाऊ शकते.
आर्थिक वर्ष 2021मध्ये सुलाची शिराज कॅबरनेट ही, भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी वाइन आहे, जिचे, आर्थिक वर्ष 22 मध्ये एकूण बिलिंग,91.83 कोटी रुपये होते. अलीकडेच तिने, “डेकँटर वर्ल्ड वाईन अवॉर्ड्स, 2022मध्ये पाच रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकली आणि तिच्या ब्रुट ट्रॉपिकलने, आंतरराष्ट्रीय वाइन चॅलेंज 2022मध्ये सुवर्णपदक जिंकले.
प्रामुख्याने तिच्या ब्रँड अंतर्गत उत्पादित वस्तूंच्या विक्रीत वाढ, निवडक ब्रँड्स आणि मार्केटमध्ये वाईनच्या विक्रीच्या किंमतीत वाढ, प्रीमियमकारणावर वाढीव फोकसमुळे महसुलातील वाढ, वाइन पर्यटन व्यवसायाला मिळालेला अनुकूल प्रतिसाद आणि इतर ऑपरेटिंग उत्पन्नातून (सरकारी अनुदान) महसूल वाढल्यामुळे महसूलात वाढ, या बाबींमुळे 30 सप्टेंबर, 2021 रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या 159.15 कोटी रुपयांवरून, 30 सप्टेंबर, 2022 रोजी संपलेल्या सहा महिन्यांसाठी कंपनीचा ऑपरेशन्सपासूनचा महसूल, 40.79%ने वाढून 224.07 कोटी रुपये झाला आहे, तर तिचा करानंतरचा नफा, 30 सप्टेंबर, 2021 रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या 4.53 कोटींवरून 573.19% टक्क्यांनी वाढून, 30 सप्टेंबर, 2022 रोजी संपलेल्या सहा महिन्यांसाठी 30.51 कोटी रुपये झाला आहे.






