मदन जगोटा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित; बीएआय तर्फे  बिल्डर्स डे साजरा

Jan 22, 2023

नाशिक – राष्ट्र निर्माण प्रक्रियेमध्ये  सर्व पायाभूत प्रकल्प , रस्ते, धरणे , विद्युत प्रकल्प , शासकीय इमारती यांच्या उभारणी मध्ये   महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बिल्डर्स असोसिअशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) नाशिक शाखेद्वारे बिल्डर्स डे साजरा करण्यात आला .  या प्रसंगी बांधकाम व निर्माण क्षेत्रातील अर्ध्वयू तसेच  अनेक महत्वाच्या  शासकीय प्रकल्पाच्या  निर्माणामध्ये मोलाची भूमिका बजावणारया  नाशिकच्या मदन जगोटा  यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याच प्रसंगी उत्कृष्ट लेबर कंत्राटदार म्हणून बाबुभाई दंड यांचा देखील गौरव करण्यात आला.

नुकत्याच बिल्डर्स डे निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात त्यांना  पुरस्कार प्रदान करण्यात आले. .या प्रसंगी मंचावर बीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष  निमेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजेंद्र आठवले,  महाराष्ट्र बीएआयचे चे अध्यक्ष दत्तात्रय मुळे ,नाशिक बीएआय चे अध्यक्ष अभय चोकसी, सचिव विजय बाविस्कर , ,माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील व संयोजन समिती प्रमुख राजेंद्र मुथा, बीएआय युथ विंग नाशिक चे अध्यक्ष अविष्कार बिरारी  हे मान्यवर उपस्थित होते .

   कार्यक्रमाची सुरुवात अभिनव पद्दतीने म्हणजे एका रोपट्याला पाणी देऊन करण्यात  करण्यात आली. स्वागतपर भाषणात बोलताना  नाशिक बीएआय चे अध्यक्ष अभय चोकसी म्हणाले की, बीएआय हि  बांधकाम कंत्राटदार आणि व्यवसायिक यांची  देशपातळीवरील शिखर संस्था असून यांची स्थापना १९४१ या वर्षी करण्यात आली. आजमितीला १६० शाखांमधून याचे काम चालते. जीवन गौरव पुरस्कार हा दर दोन वर्षांनी देण्यात येत असून माझ्या कार्यकाळात हा पुरस्कार आमच्या क्षेत्रातील पथदर्शक अश्या व्यक्तीमत्वास  देत असल्याचा मला आनंद आहे असेही त्यांनी नमूद केले.

   त्यानंतर बीएआयच्या महिला विभाग स्फूर्ती चा  पदग्रहण समारंभ झाला यावेळी  नूतन अध्यक्षा म्हणून प्रतिभा शिरसाठ यांनी आपल्या कार्यकारिणी सोबत   पदभार स्वीकारला.

    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बीएआय चे राष्ट्रीय अध्यक्ष  निमेशभाई पटेल म्हणाले की, नाशिक शहर हे देशातील वेगाने वाढणारे शहर असून बांधकाम व्यावसायिक येथे सचोटीने  कार्य करत आहे. सर्वात जुनी संस्था असल्याने सरकारच्या अनेक धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये बीएआय महत्वाची भूमिका बजावते.  बीएआय सभासदाना भेडसावत असणार्या समस्यावर देखील संस्था सरकारशी पाठपुरावा करेल असेही त्यांनी नमूद केले.

   यानंतर संयोजन समिती प्रमुख  राजेंद्र मुथा यांनी पुरस्कार्थी यांच्या निवडी मागील संकल्पना विषद केली . बीएआय तर्फे अभियांत्रिकी विध्यार्थी  यांच्यासाठी आयोजित केलेल्या तांत्रिक सादरीकरण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देखील संपन्न झाला . बीएआय तर्फे टेक्नो लीगल सेल ची देखील स्थापना करण्यात आली असून या सेल साठी सदस्य म्हणून इंजि .अँड. सुधीर देशमुख आणि इंजि .अँड.मोहन रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  कार्यक्रमास सदस्य, वास्तू विशारद, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

Nashik : मराठा समाजातील उद्योजकांच्या सक्षमीकरण, नेटवर्किंग व व्यावसायिक विकासासाठी संपूर्ण...

read more
प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचे हस्ते संपन्न

प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचे हस्ते संपन्न

नाशिक : प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांच्या - "मविप्र चे शिल्पकार ॲड.बाबुराव ठाकरे" या २४ व्या...

read more
आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – घोषणा ; इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी  ₹250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती जाहीर!

आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – घोषणा ; इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती जाहीर!

नाशिक : मागील १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत आलेल्या आकाश...

read more
क्रोमाच्या फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदाच्या गणेश चतुर्थीला ६०% पर्यंतची मोठी बचत

क्रोमाच्या फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदाच्या गणेश चतुर्थीला ६०% पर्यंतची मोठी बचत

घरी आणा पार्टी स्पीकर्सवर ६०% पर्यंत सूट,  व्हॅल्यू स्मार्टफोन्स खरेदी करा ३०,००० पेक्षा कमी...

read more
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या 5 व्या मेडिकल स्टोरचे उद्घाटन

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या 5 व्या मेडिकल स्टोरचे उद्घाटन

नाशिक : मुंबई आणि पुण्यातील विश्वसनीय फार्मसी चेन, झेनो हेल्थने आज नाशिकमध्ये त्यांच्या 5 व्या...

read more
Breaking News