टोयोटाच्या ‘इनोव्हा हायक्रॉस’चे नाशिक मध्ये अनावरण

Feb 2, 2023

नाशिक – देशातील नामांकित वाहन कंपन्यांपैकी एक असलेल्या टोयोटा कंपनीने इनोव्हा हायक्रॉस हे हायब्रीड वाहन बाजारात उतरवले असून, या वाहनाचे अनावरण मंगळवारी (३१ जानेवारी) रोजी सकाळी ११ वाजता वासन टोयोटा शोरूम, पाथर्डी फाटा येथे उत्साहात पार पडले .

टोयोटा हायब्रीडची माहिती देण्यासाठी पाथर्डी फाटा येथील वासन टोयोटा शोरूम येथे पत्रकार परिषदेेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वासन टोयोटाचे सीओओ तेजिंदरसिंग बेदी, वासन टोयोटाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक श्रीकांत नायक, वासन टोयोटाचे विक्री व्यवस्थापक रमणदीपसिंग कलसी, विक्री व्यवस्थापक रवींद्र बैरागी, ट्रेनर मनमितसिंग सलुजा आदी उपस्थित होते.

नवीन इनोव्हा हायक्रॉस हायब्रीडची कामगिरी लक्षवेधी आहे. पेट्रोल आणि बॅटरी अशा दोन्ही प्रणालीवर चालणारे हे हायब्रीड वाहन असून, यामध्ये अत्याधुनिक पाचव्या पिढीतील अतिरिक्त सेटअप असलेली स्वचार्जिंग बॅटरी लावण्यात आली आहे. वाहनाचे ब्रेक लावल्यानंतर बॅटरीची चार्जिंग होते. इनोव्हा हायक्रॉस हायब्रीडचे २३. २४ किलोमीटर प्रतितास इतके एआरएआय सर्टिफाईड मायलेज असून, वाहनाची एक्स शोरूम किंमत २४,०१,००० रुपये आहे.

नवीन इनोव्हा हायक्रॉस हायब्रीडमध्ये क्विल्टेड लेदर पॉवर्ड ऑट्टोमन सीट्स आणि मूड लाइटिंगसह पॅनोरामिक सनरूफ नॉच आहे. यामध्ये हवेशीर फ्रंट रो सीट्स आणि मल्टी झोन एसी आहे. याद्वारे तुम्हाला पुढील आणि मागील प्रवाशांसाठी दोन भिन्न तापमान सेट करता येईल. शिवाय, 9 स्पीकर जेबीएल सिस्टीम असेल.

इनोव्हेटिव्ह मल्टीपर्पज क्रॉसओव्हर (IMX) या संकल्पनेवर विकसित केलेली नवीन इनोव्हा हायक्रॉस SUV सारखीच आहे. वाहनाच्या मागील बाजूस उत्सर्जित करणारे एलईडी टेल लॅम्प, मागील छतावरील स्पॉयलर आणि क्रोम बेल्ट लाइन इनोव्हा हायक्रॉसला एक विशिष्ट ओळख देते.

नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये TOYOTA SAFETY SENSE™ (TSS) प्रणाली वापरून नवीन सुरक्षा व्यवस्था निर्माण केली आहे. टोयोटामध्ये डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल, लेन ट्रेस असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, प्री-कोलिजन सिस्टीम (चेतावणी) आणि यासारख्या सुरक्षेचे पर्याय देण्यात आले आहेत. सहा एसआरएस एअरबॅग्स तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांना सुरक्षिततेची दुसरी श्रेणी प्रदान करतात.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News