सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे सन्मान दिन उत्साहात

Feb 7, 2023

नाशिक ः सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे नाशिक विभागातील सर्व शाखांमध्ये बँकेला उत्कृष्ट सहकार्य करून योगदान दिल्याबद्दल निवृत्तिवेतनखातेधारक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ‘सन्मान दिन’ समारंभाचे गुरुवारी (ता. २) आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात बँकेतर्फे निवृत्तिवेतनखातेधारक, ज्येष्ठ नागरिक आणि बँकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने बँकेच्या नाशिक शहर शाखेत आयोजित कार्यक्रमात विभागीय प्रमुख रंजित सिंह यांनी अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ नागरिक, निवृत्तीवेतन खातेदार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. नासिक शाखेचे शाखा व्यवस्थापक दीप कुमार यांनी उपस्थितांना बँकेच्या नवीन ठेव योजनांची माहिती दिली. विशेषत: बँकेच्या “सेंट नॉन-कॉलेबल” या ठेवी योजनेबद्दल अधिक तपशील देताना, ते म्हणाले की “ही 444 दिवसांची ठेव योजना आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ट पात्रतेच्या अधीन राहून बँकेकडून 8.60% पर्यंत व्याज दिले जाईल. त्यांनी कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती केली की ते सर्व आमच्या बँकेचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्यामुळे बँकेच्या व्यवसाय विकासात आजपर्यंत जसे सहकार्य करत राहिले, तसेच सहकार्य भविष्यातही करावे. उपस्थित इतर मान्यवरांनीही बँकेबद्दल विचार व्यक्त केले आणि बँके देत असलेल्या सेवांबद्दल समाधानही व्यक्त केले. यासोबतच बँकेच्या सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्यासंदर्भात सल्लेही त्यांनी दिले. बँकेच्या नाशिक विभागातील सर्व 61 शाखांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक विभागातील सर्व शाखा व्यवस्थापकांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News