ऋषभ होंडामध्ये होंडा सिटी हायब्रीडचे अनावरण

Mar 6, 2023

Nashik : नाशिक मधील ऋषभ होंडा मध्ये शुक्रवार दिनांक 03/03/2023 रोजी नवीन होंडा सिटी पेट्रोल आणि नवीन होंडा सिटी e: HEV (हायब्रीड) चे अनावरण झाले यावेळी ऋषभ होंडा मध्ये श्री. दिनेश क्षीरसागर (मुख्य शाखा व्यवस्थापक SBI), श्री. दीपक पाटील (एमपीएसटी व्यवस्थापक SBI) श्री हेमंत चोपडा (डायरेक्टर ऋषभ होंडा कार क्रिश ऑटो व्हील्स प्रा. लिमिटेड, श्री. शरद सूर्यवंशी, श्री. अमोल शिंदे, श्री झुबेर खान, श्री. समीर शेख, श्री. जावेद खान यांच्या हस्ते करण्यात आले.
होंडा सिटीच्या नव्या मॉडेलबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. कंपनीने ही गाड़ी 2 मार्च 2023 रोजी लाँच केली आहे. तत्पूर्वी कंपनीने टीझरद्वारे ग्राहकांची उत्सुकता ताणली आहे. होंडाची नवी गाडी पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक आणि स्टायलिश आहे. 9 एलईडी इनलाइन शेलसह एलईडी हेडलॅप आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट सध्याच्या मॉडेलसारखीच आहे.

झेड शेप 3डी एलईडी टेललाईट आणि 16 इंचांचे अलॉय व्हीलही दिले आहेत. मागच्या पुढच्या बंपरमध्ये काही बदल निश्चितच केले आहे. नव्या सेडानमध्ये आकर्षक फ्रंट ग्रिल असेल. त्याचबरोबर क्रोम स्लॅट पहिल्यापेक्षा अधिक स्लीक असेल. मागील रिफ्लेक्टर थोडं खाली करण्यात आलं आहे. नव्या होंडा सिटीच्या केबिनमध्ये नव्या अंबियंट लाइटिंग, फ्रेश अपहोल्स्ट्री. वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्लेसारखे फीचर्स आहेत. या व्यतिरिक्त केबिन पूर्वीसारखीच असणार आहे. होंडा सिटी फेसलिफ्ट 2 पर्यायासह भारतात लाँच केली. होंडा सिटीच्या नव्या गाडीत 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आणि सीव्हीटीसह 1.5 लिटर – VETC पेट्रोल इंजिन मिळू शकते. या व्यतिरिक्त 1.5 लिटर एटकिंसन सायकल DOHC I-VETC पेट्रोल इंजिनला स्ट्रॉग हायब्रिड तंत्रज्ञानासह सादर केलं आहे. आणि पॉवर ट्रान्समिशनसाठी यात e-CVT पर्याय असेल.

पेट्रोल कार मध्ये पण होंडा सेन्सिंग ६ फीचर्स देण्यात आले आहेत:-
१) कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टम (CMBS)
२) अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल
३) रोड डिपार्चर मिटिगेशन सिस्टम
४) लेन कीप असिस्ट सिस्टम (LKAS)
५) लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन सिस्टम (नवीन)
६) ऑटो हाय- बीम

सदर गाडी हि प्लॅटिनम व्हाईट पर्ल, ऑब्सिडीण ब्लू पर्ल, गोल्डन ब्राउन मेटॅलिक, लुनार सिल्वर मेटॅलिक, रेडियनट रेड मेटॅलिक, मेटेओरॉईड ग्रे मेटॅलिक कलर मध्ये उपलब्ध आहे आणि 3 इअर्स अनलिमिटेड वॉरंटी सुद्धा आहे

.
गाडी ची टेस्ट ड्राईव्ह आणि बुकिंग साठी ऋषभ होंडा कार/ क्रिश ऑटो व्हील्स प्रा. लिमिटेड येथे अवश्य भेट दया. संपर्क – ०२५३-६६४३३३३

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News