आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स अहवालातून सादर झाले भारताचे न्यू हेल्थ नॉर्मल

Mar 15, 2023

 नाशिक : महत्त्वपूर्ण बिगर बँक वित्तीय सेवा महामंडळ असलेल्या आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (ABCL) ची आरोग्य विमा उपकंपनी आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (ABHICL) ने द न्यू हेल्थ नॉर्मल अहवालाचे अनावरण केले. भारतातील आरोग्य परिसंस्थेतील एक प्रमुख कंपनी म्हणून आरोग्याच्या दृष्टीकोनातून ग्राहकांच्या वर्तनातील महत्त्वाचे बदल ओळखण्यासाठी डिझाइन केलेले हे सर्वेक्षण ABHICL ने हाती घेतले. हे संशोधन भारतभरात १९ प्रमुख शहरांमध्ये ६६०० प्रतिसादकांसह राबविण्यात आले. 

कोविड-१९ सोबत आलेल्या अनिश्चितता आणि चिंतेच्या वाढीमुळे मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. अहवालात असे दिसून आले आहे की तीनपैकी दोन उत्तरदात्यांना अधिक खर्च आणि समाजाची धारणा यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याविषयी बोलण्यासाठी तज्ञाशी संपर्क साधण्यात अजूनही संकोच वाटतो. तर ८९% प्रतिसादकर्त्यांना असे वाटते की त्यांच्या आरोग्य विम्यामध्ये मानसिक आरोग्य सल्लामसलत समाविष्ट केली पाहिजे. त्यामुळे मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याची नितांत गरज आहे. ‘न्यू नॉर्मल’ मधील मानसिक आरोग्य समस्यांचे प्रमाण आजवर कधीही एवढे मोठे नव्हते त्यामुळे विमा क्षेत्र आता सक्रियपणे कृतिशील होत आहे. 

संशोधनाच्या निष्कर्षांवर बोलताना आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मयंक बथवाल म्हणाले, “साथीच्या रोगामुळे ‘न्यू हेल्थ नॉर्मल’ मध्ये लोकांना आरोग्य-केंद्रित जीवनशैलीचे महत्त्व समजले आहे आणि ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने या निरोगी जीवनशैलीला समर्थन देणारे मार्ग ते सक्रियपणे शोधत आहेत. याचा त्यांच्या वर्तनावरही अनेक मार्गांनी परिणाम झाला आहे. जसे की ते वापरत असलेले तंत्रज्ञान, ते त्यांच्या आहाराचे किती बारकाईने निरीक्षण करतात, ते नियमितपणे व्यायाम करतात का इत्यादी. तथापि, नेहमीप्रमाणे नवीन सवय अंगीकारणे हे बहुतेकांसाठी एक आव्हान असते आणि लोकांना त्यांच्या आरोग्याच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि प्रोत्साहित करणे ही काळाची गरज आहे.”

 सर्वेक्षणाचे निष्कर्ष पुढे व्यायामाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन डीकोड करण्याचा प्रयत्न करतात. असे दिसून येत आहे की आमच्या निम्म्याहून अधिक प्रतिसादकर्त्यांनी (५०%) ऑनलाइन फिटनेस व्हिडिओ शोधले आणि पाहिले तर ६९% प्रतिसादकर्ते त्यांची आरोग्याशी संबंधित आकडेवारी तपासण्यासाठी आणि त्यांनी उद्दिष्ट ठेवलेली पावले चालून होत आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी वेअरेबल वापरतात. तथापि, प्रत्येक तीनपैकी जवळजवळ एक प्रतिसादक (३२%) कबूल करतो की ते वजन आणि रक्तदाब यासारख्या आरोग्य आकडेवारीची नियमितपणे तपासणी करत नाहीत. आणखी एक विशेष गोष्ट लक्ष वेधून घेणारी होती. ती म्हणजे आर्थिक दृष्ट्‍या सज्जतेकडे लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. साथीच्या रोगाने लोकांमधील विशेषत: वैद्यकीय निकडीच्या बाबतीत आर्थिक तत्परतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलला आहे.

गेल्या काही वर्षांत आरोग्य विम्याबाबत जागरूकता वाढली आहे आणि प्रत्येक सरत्या वर्षाबरोबर  अधिक लोक आरोग्य विम्यात गुंतवणूक करत आहेत. सुमारे ५२% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की त्यांनी गरज किती याचा अंदाज लावला आहे आणि अशा आपत्कालीन परिस्थितींसाठी नियोजन केले आहे. तर ७८.५% भारतीयांना असे ठामपणे वाटते की त्यांच्या कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चाचा विमा देणारा नियोक्ता ते सक्रियपणे शोधत आहेत. 

“एक ब्रँड म्हणून आम्ही आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्समध्ये, ‘हेल्थ फर्स्ट’ या संकल्पनेवर विश्वास ठेवतो. आम्हांला आमची ऑफर त्याच कल्पनेशी सुसंगत ठेवायची आहे कारण आम्ही सतत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समर्थित नवनवीन उत्पादनांच्या नाविन्यपूर्णतेत आणि डिझाइनमध्ये गुंतवणूक करत असतो. आमच्या ग्राहकांना निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याबाबत जागरुक राहण्यासाठी चालना देणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे श्री. मयंक बथवाल म्हणाले.

कोविड-१९ साथीच्या आजाराने ग्राहकांच्या आचारणातील जवळपास सर्वच पैलूंमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. ABHI न्यू हेल्थ नॉर्मल अहवाल भारतीय लोकांच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातून स्पष्ट वर्तन बदल दर्शवितो. ग्राहक त्यांच्या एकूण आरोग्याबद्दल आणि आर्थिक आणीबाणीसाठी अधिक तयार, सजग आहेत.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News