नासिक : विनर्स चरिटेबल ट्रस्ट आणि इंडियन इंटरेप्रेन्यूर्स नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या विनर्स इंडिया टूरचा दिमाखदार उदघाटन सोहळा नुकताच नाशिक येथील नासिक क्लब येथे पार पडला. देशभरात एक लाख उद्योजक विकासाचे उद्दिष्ट ठेवून विनर्स चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंडियन इंटरेप्रेन्यूर्स नेटवर्क यांनी या टूरचे सम्पूर्ण देशभरात विविध राज्यांतर्गत आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील विविध 12 जिल्ह्यामध्ये विभागीय स्तरावर या टूर चे आयोजन करण्यात येत असून नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या या टूरचे उदघाटन समारंभास प्रथमच एकाच व्यासपीठावर नाशिक येथील नामवंत उद्योग संस्थांचे प्रतिनिधी, व्यावसायिक, प्रथितयश उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनर्स चॅरिटेबल ट्रस्टचे श्री शशीकांत खामकर , श्री संतोष मंडलेचा,अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अग्रीकल्चर, श्री शशिकांत जाधव, अध्यक्ष नाशिक इंडस्ट्रीज अँड मनुफक्चर्स असोसीएशन, निमा,श्री अरविंद म्हापत्रा,अध्यक्ष नाशिक इन्फर्मेशन टेक्नॉलॉजि असोसीएशन, नीता, श्री जयेश खाडे, सल्लागार जागतिक व्यापार केन्द्र नवी मुंबई, श्री संदीप सोनवणे उपाध्यक्ष, नाशिक बिजनेस असोसिएशन, श्री व्हीनस वाणी अध्यक्ष, नाशिक मॅनेजमेंट असोसिएशन, प्रथितयश उद्योजक आणि अनंत फायनान्सचे सी एम डी श्री अनंत धुरी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री इंगित दवे, विनर्स चॅरिटेबल ट्रस्टचे गजेंद्र जुईकर, इंडियन इंटरेप्रेन्यूर्स नेटवर्कचे संस्थापक महादेव माने, दादासो घारे, श्रीराम पाटील, नाशिक जिल्हा समनव्यक श्री विधेयमान मुसळे, इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अग्रीकल्चर अध्यक्ष श्री संतोष मंडलेचा यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील जडणघडण कशी झाली याविषयी विविध आठवणींना उजाळा दिला. तसेच मराठी उद्योजक व्यावसायिक यांनी स्वतःचा व्यावसायिक उत्कर्ष साधण्यासाठी नेहमीच संघटित असणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच नाशिक इन्फर्मेशन टेक्नॉलॉजिचे अध्यक्ष अरविंद म्हापत्रा यांनी देखील आपल्या उद्योजकीय प्रवासातील जडणघडणीना उजाळा दिला तर आपल्या कुटुंबात कोणत्याही प्रकारची व्यावसायिक अथवा उद्योजकीय पार्श्वभूमी नसताना देखील केवळ कौटुंबिक जबाबदारी पेलत स्वतःच्या उद्योग व्यवसायाची उभारणी केली असे सांगितले. आपल्या उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक उद्योजकाने सामाजिक जाणिवेचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी निमा चे अध्यक्ष श्री शशिकांत जाधव यांना त्यांचे उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल मान्यवरांचे हस्ते नाशिक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना श्री शशिकांत जाधव यांनी पुरस्काराप्रति नाशिककरांचे आभार मानले तसेच विनर्स इंडिया तुरला शुभेच्छा देताना श्री शशीकांत खामकर सरांच्या माध्यमातून अनेक संस्कारक्षम पिढया घडल्या असून यापुढील काळात त्यांच्याकडून उद्योजकीय पिढ्या घडविल्या जातील असे सांगून देशभरात एक लाख उद्योजकांचा विकास या संकल्पनेस मूर्त स्वरूप देण्याचे अनुषणगाने निमा या उद्योजकीय संघटनेच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . विनर्स इंडिया टूर च्या माध्यमातून जिल्ह्यांतर्गत लघु, मध्यम उद्योजक, तसेच स्टार्ट अप आणि व्यावसायिकांना एकमेकांशी सम्पर्क साधण्यासाठी नेटवर्किंग च्या संधी, व्यावसायिक भागीदारीकरिता पोषक वातावरण, सहयोग, प्रेरणा, आणि व्यवसाय वृद्धी याकरिता विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येत असून याचे द्वितीय पर्व दि 26 सप्टेंवर रोजी नवी मुबई येथील साहित्य संघ मंदिर सभागृह येथे सम्पन्न होणार असल्याचे इंडियन इंटरेप्रेन्यूर्स नेटवर्कचे संस्थापक महादेव माने यांनी सांगितले. धन्यवाद आपला स्नेहाणकीत महादेव माने 9594891311 8689847464
ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल
Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...





