शेतमालाची वृध्दी करण्यासाठी GWX100 ठरते फायदेशीर

Apr 26, 2023

काय आहे वेकूलच्या outgrow गॅझेटचे फायदे ?
पिक पातळीचे विश्लेषण, सिंचनाबद़दल सूचना, सूक्ष्म-पातळीवर हवामान सूचना, रोगाचा अंदाज,रोगाचा शोध,माती परीक्षण.
पाणी आणि हवामान हे दोन अत्यंत महत्वाचे घटक आहेत जे पिकांच्या उत्पादनावर प्रभाव करतात. अनियमित पाऊस,तापमानातील बदल आणि रोगांच्या प्रसारातील बदलामुळे हंगामाचे नुकसान होते आणि उत्पादनात घट होते. GWX100 म्हणजे एक iot,सॅटेलाईअ आणि एआय सक्षम असलेले स्मार्ट शेती व्यवस्थापनाचे साधन आहे जे शेतक-यांना अचूक सक्रिय आणि प्रतिबंधक निर्णय घेण्यास मदत करते.

नाशिक : भारतातील अग्रगण्‍य अन्‍न व कृषी-तंत्रज्ञान उद्योग वेकूलचा एआय-संचालित ‘फिजिटल’ शेतकरी सहभाग उपक्रम आऊटग्रोने आज नाशिकमध्‍ये आयओटी-सक्षम एआय-पॉवर्ड डिवाईस GWX100 लॉन्‍च केले. हे सेन्‍सर-आधारित डिवाईस सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांना मदत करून शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण ठरवण्यास मदत करते, तसेच सिंचनासाठी योग्य वेळ देखील सांगते.GWX100 हवामान, मातीचा प्रकार, मुळांची खोली आणि वापरलेल्या सिंचन प्रणालीचे विश्लेषण करते, आवश्यक असलेल्या पाण्याच्या इष्टतम प्रमाणाचा अंदाज लावण्यासाठी तसेच रीअल-टाइम सॅटेलाइट डेटाद्वारे आजाराचा अंदाज लावण्यात मदत करते. भारतात डिझाइन, विकसित आणि उत्पादित केलेल्‍या तंत्रज्ञानाचा उत्पादन खर्च कमी करण्यासोबतच पीक उत्पादनात २० ते ३० टक्‍के वाढ करण्याचा मनसुबा आहे.

याप्रसंगी बोलताना फार्मर एंगेजमेंट अॅण्‍ड आऊटग्रोचे प्रमुख श्री. सेंधिल कुमार एन. म्‍हणाले, ” सिंचन प्रणालीमध्ये कार्यक्षमता आणण्यासाठी आम्ही GWX100 लॉन्‍च केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा अपव्यय कमी करण्यास मदत होईल. सिंचन वेळापत्रकाच्या अभावामुळे जवळपास ६० टक्‍के सिंचन पाणी वाया जाते. देशातील बहुतेक शेतकरी त्यांच्या पिकांसाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याचे प्रमाण
ओळखण्यासाठी संघर्ष करतात; केव्हा आणि किती सिंचन करावे हे त्यांना माहीत नाही कारण त्यांच्याकडे शेतीबाबत विशिष्ट माहिती नाही. यामुळे पीक उत्पादकता वाढते आणि उत्पन्नावर परिणाम होतो. देशातील ९२ टक्‍के भूजलाचा वापर फक्‍त शेतीसाठी केला जात असल्याने त्याचा एकूणच भूजल पातळीवरही परिणाम होतो. यासंदर्भात आऊटग्रोमध्‍ये आमच्या टीमने ‘कमी थेंबासह अधिक पीक’ घेण्याच्या
उद्देशाने विद्यमान समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचा महसूल वाढवण्यास मदत करण्यासोबत देशातील सिंचन पायाभूत सुविधांचे नियोजन करण्‍याचा मनसुबा आहे.आमच्या प्रायोगिक चाचणीच्या यशामुळे आम्ही १०० शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात उपयोजित डिवाईसद्वारे मदत करण्यामध्‍ये यशस्‍वी ठरलो आहोत, तसेच आम्ही येत्या काही महिन्यांत GWX100 १००० हून अधिक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.”

याबाबत आऊटग्रोच्‍या डिजिटल सर्विसेसचे श्री. के. ए. गोपालकृष्‍णन म्‍हणाले, ” GWX100 हे शेतकऱ्यांच्‍या त्रासाबाबत जाणून घेण्‍यासाठी १६० हून अधिक शेतकऱ्यांसोबत आम्‍ही केलेल्‍या संवादांमधून निर्माण करण्‍यात आले आहे. यशस्वी वणि कार्यक्षम सिंचनामध्ये पाण्याच्या चांगल्या प्रतिधारणेसाठी स्थलाकृतिक वैशिष्ट्यांसह विविध प्रकारांचा समावेश होतो, जसे सिंचनाचे पाणी मुळांमध्ये वाहून जाण्यापासूनरोखण्यासाठी मुळांच्या सखोलतेबाबत माहिती, वेगवेगळ्या पिकांच्या वाढीच्या अवस्थेवर आधारित दैनंदिन पाण्याची गरज समजून घेणे आणि हवामान परिस्थिती. GWX100 हे अनोखे डिवाईस आहे, जे शेतकरी समुदायाच्‍या जलस्रोत व्यवस्थापन समस्या सोडवण्यासाठी वर नमूद केलेल्या मुद्द्यांचा विचार करते.”
इंग्रजी आणि तामिळ, तेलगू, कन्नड, मराठी व हिंदी या ५ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या GWX अॅपद्वारे शेतकरी त्यांच्या संबंधित स्थानिक भाषेत डिजिटली ट्रॅक करू शकतात, तसेच माहिती मिळवू शकतात. या नवोपक्रमाद्वारे आऊटग्रोचा कृषी क्षेत्रात, विशेषत: संसाधन व्यवस्थापनाकडे कार्यक्षमता वाढवण्याचा मनसुबा आहे आणि नजीकच्या भविष्यात २० हून अधिक पिकांपर्यंत डिवाईसचे प्रमाण वाढवण्याची योजना आखत आहे.

अजून बातम्या वाचा..

मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

Nashik : मराठा समाजातील उद्योजकांच्या सक्षमीकरण, नेटवर्किंग व व्यावसायिक विकासासाठी संपूर्ण...

read more
प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचे हस्ते संपन्न

प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचे हस्ते संपन्न

नाशिक : प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांच्या - "मविप्र चे शिल्पकार ॲड.बाबुराव ठाकरे" या २४ व्या...

read more
आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – घोषणा ; इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी  ₹250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती जाहीर!

आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – घोषणा ; इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती जाहीर!

नाशिक : मागील १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत आलेल्या आकाश...

read more
क्रोमाच्या फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदाच्या गणेश चतुर्थीला ६०% पर्यंतची मोठी बचत

क्रोमाच्या फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदाच्या गणेश चतुर्थीला ६०% पर्यंतची मोठी बचत

घरी आणा पार्टी स्पीकर्सवर ६०% पर्यंत सूट,  व्हॅल्यू स्मार्टफोन्स खरेदी करा ३०,००० पेक्षा कमी...

read more
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या 5 व्या मेडिकल स्टोरचे उद्घाटन

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या 5 व्या मेडिकल स्टोरचे उद्घाटन

नाशिक : मुंबई आणि पुण्यातील विश्वसनीय फार्मसी चेन, झेनो हेल्थने आज नाशिकमध्ये त्यांच्या 5 व्या...

read more
Breaking News