पालघर मधील ५ गांवाना ऊर्जा उपाययोजनांसह सक्षम करण्‍यासाठी शाओमी इंडिया व युनायटेड वे इंडियाचा मदतीचा हात

May 31, 2023

*** १५०० हून अधिक व्‍यक्‍तींना विश्‍वसनीय, शुद्ध वीजपुरवठा करण्‍यासाठी सेंट्रलाइज्‍ड सोलार मायक्रो ग्रिडची स्‍थापना
*** महाराष्‍ट्रातील पालघर जिल्हयामधील पाच गावांतील नागरिकांना सोलार फोटोवोल्‍टाइक पायाभूत सुविधांचा वापर करत शुद्ध, विश्‍वसनीय वीजपुरवठा उपलब्‍ध

Nashik : शाओमी इंडिया या देशातील अग्रगण्‍य स्‍मार्टफोन व स्‍मार्ट टीव्‍ही ब्रॅण्‍डने आज महाराष्‍ट्राच्‍या पालघर जिल्‍हयामधील पाच गावांना आघाडीचे जागतिक परोपकारी नेटवर्क युनायटेड वे इंडियासोबत सहयोगाने शाश्‍वत ऊर्जा प्रभावीपणे उपलब्‍ध करून देत सक्षम करण्‍याच्‍या मनसुब्‍यासह त्‍यांच्‍या नवीन मिशनची घोषणा केली.
या सहयोगाचा या गावांना सोलार फोटोवोल्‍टाइम (सोलार पीव्‍ही) पायाभूत सुविधेच्‍या माध्‍यमातून विश्‍वसनीय, शाश्‍वत ऊर्जासह सुसज्‍ज करण्‍याचा प्रमुख उद्देश आहे. उपक्रमाचा गावांमध्‍ये शाश्‍वत सोलार ग्रिड सिस्‍टम स्‍थापित करत शुद्ध व नवीकरणीय ऊर्जेला चालना देण्‍याचा मनसुबा आहे, परिणामत: गावकऱ्यांसाठी सातत्‍याने विश्‍वसनीय वीजपुरवठा होईल आणि त्‍यांचा जीवनाचा दर्जा सुधारेल.

या सहयोगाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत शाओमी इंडियाचे अध्‍यक्ष श्री. मुरलीकृष्‍णन बी. म्‍हणाले, ” शाओमीमध्‍ये आम्‍ही सर्वांसाठी उज्‍ज्‍वल भविष्‍य निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करतो आणि आम्‍हाला या विश्‍वासाला प्रत्‍यक्षात आणण्‍याकरिता युनायटेड वे इंडियासोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो. आमचा सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रकल्‍प हरित ऊर्जेला चालना देण्‍याप्रती पाऊल आहे, जो शाश्‍वत असण्‍यासोबत पर्यावरणावरील परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करतो.
ते पुढे म्‍हणाले, ‘‘याव्‍यतिरिक्‍त आमचा नवीन उपक्रम ग्रामीण समुदायांना सक्षम करेल आणि विकासासाठी संधी निर्माण करेल. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही शाश्‍वत उपाययोजनांना चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, ज्‍यामुळे समाज व पर्यावरणाला फायदा होण्‍यासोबत पालघर जिल्‍ह्यामधील ऊर्जा कमतरता भरून काढण्‍यास मदत होईल.”

या सहयोगाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत युनायटेड वे इंडियाच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी जयंती शुक्‍ला म्‍हणाल्‍या, ” सोलार ऊर्जेसह गावांमध्‍ये वीजसुविधा देत ग्रामीण भारताच्‍या परिवर्तनाचा घरे, शिक्षण, आरोग्‍य, सामाजिक सुरक्षितता व उदरनिर्वाह संधींवर परिणाम होण्‍यासोबत गावकऱ्यांना स्‍वावलंबी बनण्‍याकरिता शाश्‍वतरित्‍या बदल करण्‍यास सक्षम करेल. आपल्‍या समुदायाचे ऋण फेडण्‍याची ही परिपूर्ण संधी आहे. आम्‍हाला आनंद होत आहे की, शाओमी एकीकृत समुदाय प्रभाव मॉडेलसंदर्भात काम करणाऱ्या या हस्‍तक्षेपांसह आत्‍मनिर्भर भारताप्रती या प्रवासामध्‍ये आम्‍हाला पाठिंबा देत आहे. यामुळे कार्बन उत्‍सर्जनाचे प्रमाण कमी होण्‍यासोबत पर्यावरण शुद्ध राहण्‍यास, तसेच ग्रामीण समुदायांची उन्‍नती करण्‍यास देखील मदत होईल.”

पालघरमधील, तसेच मुंबई व पुण्‍याच्‍या आसपासच्‍या जिल्‍ह्यांमधील १५० हून अधिक गावांसाठी अपु-या व अविश्‍वसनीय वीजपुरवठ्याची समस्‍या दीर्घकाळापासून आहे. या अत्‍यंत दुर्गम गावांना दररोज सतत ६ ते १० तास वीजपुरवठा खंडित होण्‍याचा सामना करावा लागतो. वीजपुरवठ्यामधील या कमतरतेचा निवासींसह मुलांच्‍या जीवनाच्या दर्जावर मोठा परिणाम झाला आहे, ज्‍यांना मुलभूत सुविधा देखील उपलब्‍ध नाहीत, ज्‍यामुळे आर्थिक विकासामध्‍ये अडथळा निर्माण झाला आहे.

विश्‍वसनीय व किफायतशीर वीजपुरवठा उपलब्‍ध करून देत हा हस्‍तक्षेप शून्य लाकूड/शून्य जीवाश्म इंधन स्वयंपाक, स्वच्छ पाणी, शाश्वत शेती आणि १५०० हून अधिक व्‍यक्‍तींसाठी निव्वळ-शून्य ऊर्जा समुदायाकडे नेणारी एसडीजी उद्दिष्टे पूर्ण करणे यांसारखे अनेक प्रयत्न सक्षम करेल.

या उपक्रमाचा जवळपास १५० घरांना हरित ऊर्जा प्रदान करण्‍याचा आणि मुलांना वाचन, लेखन व शिक्षणासाठी प्रकाश सुविधा, २४x७ तास शुद्ध पिण्‍याच्‍या पाण्‍याची उपलब्‍धता अशा दैनंदिन मुलभूत गरजांची तरतूद करण्‍याचा मनसुबा आहे. तसेच सोलार पायाभूत सुविधा उदरनिर्वाहाच्‍या क्रियाकलापांसाठी व उत्पन्न निर्मितीसाठी व्यासपीठ बनतील, ज्यामुळे सौर उर्जेवर चालणारे कोल्ड स्टोरेज, सोलार-पॉवर्ड टेलरिंग आणि इतर उत्पन्न मिळवणारे क्रियाकलाप सक्षम होतील.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News