महत्वाची – प्रा. यशवंत पाटील.
नाशिक दिनांक ६ सप्टेंबर :- भारतीय तत्वज्ञानाचे भाष्यकार, शिक्षण तज्ञ, आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात ” शिक्षक दिन ” म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त कालिका देवी मंदिर संस्थान आणि क्रीडा साधना संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नाशिकमधील ७८ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गेल्या चार दशकापासून शिक्षण क्षेत्रात योगदान असलेले यशवंत पाटील, अध्यात्माचा गाढा अभ्यास असलेले प्रवचनकार डॉ. उल्हास रत्नपारखी, नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील, खजिनदार सुभाष तळाजिया यांच्या हस्ते या गौरवार्थीना चषक आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या गौरवार्थीमध्ये प्रा. डॉ. कृष्णा शहाणे (बिटको कॉलेज), प्रा. डॉ. साहेबराव निकम ( बी वाय के ), डॉ. वर्षा भाबड (एम.व्ही. पी. संस्था), सुभाष भटू पाटील ( रामसेज, दिंडोरी), श्रीकृष्ण आवारे( म.न पा शाळा ), सौ. सविता देशमुख( सिन्नर), साहेबराव हेबाडे (व्ही, एन नाईक ), त्रिलोकसिंग चंदेल (कळवण), संजय पाटील , कुसुमा शेट्टी (सेन्ट फ्रान्सिस स्कूल) , अरुण पवार (मराठा हायस्कूल), शरद गाडे (भा.नगर) , जयश्री पानगव्हाणे-गाजरे) (गीताई वाघ कन्या शाळा) , रामअधार पांडे (के.एम.के.हायस्कूल, निफाड) , विनया मोरे (किशोर सूर्यवंशी स्कूल) ,संदीप पांडे, राजेश पाटील (अत्मामालिक स्कूल), श्रीमती दवे (किड्स स्कूल),रवींद्रनाथ जाधव (जि.प. शाळा मातोरी) , लिली मार्टिन (रायन इंनटर नॅशनल स्कूल) ,आर.डी.जाधव (देवगाव) , राजेंद्र शेळके (पी.ई. स्कूल), अदिती बनर्जी , मनिषा सावरखेडकर(ब्लुबेल स्कूल) , रामराव केदुजी बनकर (पिंपळगाव हायस्कूल), मोहन चकोर(माध्यमिक विद्या मंदिर) , संजय देसले(माध्य. विद्यालय सटाणा ), रमण जाधव(कै.ब.ल.जाधव विद्यालय ,शेलू), अण्णासाहेब काटे(माध्य. विद्यलाय, तांदुळवाडी ) मानसी बापट (शिशुविहार व बालक मंदिर), शुभांगी वांगीकर(विद्या प्रबोधिनी, रामभूमी), आर.के.बच्छाव (शाशकीय माध्य, आश्रम शाळा ), राजेंद्र पितृभक्त , रविंद्र कोठावदे (उन्नती माध्य.विद्या.पंचवटी) , प्रशांत गायकवाड(आदर्श विद्यालय), वैशाली आवळे(संत आंद्रिया शाळा) , मंगला पवार(सरस्वती विद्यालय), गोविंद वाघ(आर.बी.एच. विद्यालय),शोभा गायकवाड , सुनिल मांडवडे (अभिनव बालविकास मंदिर), कविता पवार (ब्रम्हा व्हॅली) , वसुधा जोशी(आदर्श अध्यापक विद्यालय), राजेश अमृतकर(नाशिक म.न.पा.शाळा ) , सुचिता कासार (सुकदेव विद्यामंदिर) , शरयू जाधव (म.न.पा.शाळा म्हसरूळ), वैशाली क्षीरसागर ,शालिनी बच्छाव , क्रांती बोराटे (सागरमल मोदी , विद्या मंदिर), उज्ज्वला बागुल , विजया मोगल , संध्या शिंदे (जनता विद्यालय) , संग्राम करंजकर(भगूर,), नारायण चव्हाण (बालविद्या मंदिर सी.बी.एस), सुरेखा बोरसे, विद्या ठाकरे (प्राथमिक विद्यालय , उंटवाडी), सुनिता सोनगिरे (कोठारी, शाळा नाशिक रोड) , संजय सोनार(सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालय ,उंटवाडी) , मिलिंद वाघमोडे ( माध्य. व उच्च माध्य. आश्रम शाळा,आसरबारी) सचिन पगार (माधवराव बोरस्ते हायस्कूल , लाखलगाव), सविता देशमुख (पाताळेश्वर माध्य विद्यलाय , पाडळी), संजय पाटील ( हिरे विद्यालय, सिडको), विठ्ठल जोगळेकर (रुंगठा हाय स्कुल ) राजाराम बगाड ( सटाणा ), एकनाथ निन्हाळी ( भा. नगर ) यांचा समावेश होता.
यावेळी बोलतांना प्रा. यशवंत पाटील यांनी सांगितले की समाजाच्या जडणघडणीत शिक्षकाची भूमिका सर्वात महत्वाची आहे. त्यांच्या शिक्षकांच्या योगदानामुळेच विदयार्थी घडतात आणि आपला समाज घडत आहे.असे सांगितले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी सांगितले की प्रत्येक नागरिकांच्या जडणघडणीत आणि प्रगतीमध्ये त्याच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे आपल्या गुरूचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे असे सांगितले. यावेळी डॉ. उल्हास रत्नपारखी यांनीही उपस्थित गौरवार्थीना संबोदीत केले.
या प्रमुख पाहुण्याचे स्वागत अण्णासाहेब पाटील आणि सुभाष तळाजीया यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद खरे आणि एकनाथ बिरारी यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता पाटील. नितीन हिंगमिरे, मनीषा काठे,राम पाटील, भरत पाटील, दीपिका पाटील, कांचन पाटील, एकनाथ बिरारी, मनोज म्हस्के आदिंनी परिश्रम घेतले.





