सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सन 2017-18 चे पुरस्कार जाहीर

Sep 6, 2019

मुंबई, दि. 6 : राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असलेल्या सहकारी संस्थांना सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकार निष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2017-18 चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकार निष्ठ या पुरस्कारासाठी अनुक्रमे रु. 1 लाख,रु. 51 हजार आणि रु. 25 हजार धनादेशाद्वारे देऊन या संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

सहकार महर्षी पुरस्कार : ज्ञानदिप को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. विक्रोळी, (पु.) मुंबई, ;

प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था

        सहकार भूषण पुरस्कारपुणे विभाग– अरुण विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्या. चंदूर, ता. हातकणंगले,  जि.कोल्हापूर  ; 

        कोकण विभाग– नाटे  विविध कार्यकारी  सहकारी सेवा  संस्था, मर्या. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी.

            सहकार निष्ठ-नाशिक विभाग– सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सह (वि.) सेवा संस्था मर्या. सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक ; नागपूर विभाग- नागभीड विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. नागभीड, जि. चंद्रपूर ; अमरावती विभाग- नेरपिंगळाई विविध कार्य. सेवा सह. संस्था मर्या. नेरपिंगळाई , ता. मोर्शी, जि. अमरावती.

नागरी पतसंस्थाग्रामीण बिगरशेती पतसंस्थापगारदार नोकरांच्या पतसंस्था

        सहकार भूषण पुरस्कार-कोकण विभाग– श्री निनाईदेवी सहकारी पतसंस्था मर्या. मस्जिद, मुंबई ; नाशिक विभाग- साईसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर ; पुणे विभाग- दि कोल्हापूर डिस्ट्रीक्ट पोलीस को – ऑप. क्रेडीट सोसायटी. लि. कोल्हापूर, पोलीस हेडक्वार्टर कोल्हापूर,ता. करवीर, जि. कोल्हापूर.

            सहकार निष्ठ-नागपूर विभाग-कोलमाईन्स वर्कर्स क्रेडीट को.ऑप. सोसायटी मर्या. सावनेर, पाटणसावंगी माईन, ता. सावनेर, जि. नागपूर ; औरंगाबाद विभाग-धनश्री बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आष्टी, ता. आष्टी,  जि. बीड; अमरावती विभाग-कल्पतरु कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. धामणगाव‍ रेल्वे,जि. अमरावती

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकामहाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक

        सहकार भूषण पुरस्कार-कोकण विभाग-रत्नागिरी  जिल्हा  मध्यवर्ती  सहकारी  बँक  लि. रत्नागिरी, सहकार भवन , जवाहर पथ, रत्नागिरी – 415 612.

            सहकार निष्ठ-नाशिक विभाग-दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को.ऑपरेटिव्ह बँक लि. अहमदनगर ; नागपूर विभाग- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर.

नागरी सहकारी बॅंका

        सहकार भूषण पुरस्कार-कोकण विभाग-बॅसिन कॅथॉलिक, को-ऑप. बँक लि. वसई, ता. वसई, जि. पालघर ; अमरावती विभाग- अभिनंदन अर्बन को.ऑप. बँक मर्या. अमरावती, जि. अमरावती.

        सहकार निष्ठ-नाशिक विभाग-पुणे विभाग-भगीनी निवेदिता सहकारी बँक मर्या. पुणे, प्रभात रोड , एरंडवणा, पुणे, ; औरंगाबाद विभाग-वैश्य नागरी सहकारी बॅक मर्या. परभणी, जि. परभणी.

सहकारी साखर कारखाने/ सहकारी सूत गिरण्या/ जिल्हा दूध संघ

        सहकार भूषण पुरस्कार-पुणे विभाग-दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लि. माळेगाव बु. (शिवनगर) ता. बारामती, जि. पुणे ; औरंगाबाद विभाग-विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्या. विलासनगर, ता. जि. लातुर.

            सहकार निष्ठ-नाशिक विभाग-सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. अमृतनगर, ता.संगमनेर, जि.अहमदनगर.

गृहनिर्माण सहकारी संस्था

        सहकार भूषण पुरस्कार-कोकण विभाग-नवमिलन को. ऑप. हौ. सोसा. लि. डोंबिवली पूर्व. जि. ठाणे; जलाराम पार्क हौसिंग सोसायटी लि. भांडुप (प.) मुंबई.

        सहकार निष्ठ-कोकण विभाग-दि विजयनगर को. ऑप. हौसिंग सोसायटी लि. अंधेरी (पू.), स्वामी नित्यानंद मार्ग,  मुंबई ; पुणे विभाग-सुविधा सहकारी गृहनिर्माण संस्था. मर्या. अशोकनगर, खेड, ता. जि. सातारा ; नागपूर विभाग-कुकडे ले आऊट (एल.आय.जी.) को. ऑप. हाऊसिंग सोसायटी, लि. नागपूर, ता. जि. नागपूर.

औद्योगिकहातमाग व यंत्रमागउपसा जलसिंचन व इतर संस्था

        सहकार निष्ठ-पुणे विभाग-श्री अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्था मर्या. व्हनाळी,साके -केनवडे- गोरंबे, ता. कागल, जि. कोल्हापूर ; कोकण विभाग-महामुंबई छत्री उत्पादक सहकारी केंद्र लि. मुंबई. महानगरपालिका बिल्डींग, कांजुरमार्ग (पु.) मुंबई.

फळेभाजीपालाखरेदी-विक्रीप्रक्रिया व ग्राहक संस्था

        सहकार भूषण पुरस्कार-पुणे विभाग-हातकणंगले तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. पेठवडगांव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर; नाशिक विभाग-प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक व प्रक्रीया खरेदी विक्री शेतकरी सहकारी संस्था मर्या. लोणी खुर्द, ता. राहता, जि. अहमदनगर.

        सहकार निष्ठ – कोकण विभाग-कळवा मध्यवर्ती  ग्राहक सहकारी संस्था मर्या. कळवा, स्टेशन रोड कळवा, जि. ठाणे ; नागपूर विभाग-चिमुर सहकार तांदूळ गिरणी समिती मर्या. चिमुर, ता. चिमुर जि. चंद्रपूर.

प्राथमिक दूध उत्पादककुक्कुटपालनमत्स्यपालन व पशुसंवर्धन संस्था

        सहकार भूषण पुरस्कार – पुणे विभाग-सहकार महर्षि हणमंतराव दि पवार सहकारी कुक्कुटपालन सोसायटी लि. फलटण, ता. फलटण, जि. सातारा; कोकण विभाग-महाराष्ट्र राज्य मच्छ‍िमार सहकारी संघ मर्या. मुंबई , मांडवी कोळीवाडा,मस्जिद बंदर (प.) मुंबई; नाशिक विभाग-सिध्देश्वर सहकारी दुध उत्पादक व्यावसायिक संस्था मर्या. अकोले, ता. अकोले, जि. अहमदनगर.

        सहकार निष्ठ-अमरावती विभाग-अमृतधारा दुध उत्पादक सहकारी संस्था मर्या. खरबडी, ता. मातोळा, जि. बुलढाणा ; औरंगाबाद विभाग-गोकुळ दुध व्यावसायिक सहकारी संस्था मर्या. खाखरे बोरगांव, ता.जि. बीड.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News