पर्यावरणपूरक, इंधनविरहित ‘ऍटोम’ हि दुचाकी बाजारात प्रति किलोमीटर २५ पैसे खर्च

Sep 7, 2019

   

 नाशिक – वाढते प्रदूषण व घटते इंधनसाठे याचा विचार करून दुचाकी वाहन क्षेत्रात पर्यावरणपूरक, इंधनविरहित अशी ऍटोम या दुचाकीच्या नाशिकमधील वितरणाचा शुभारंभ हॉटेल गेटवे येथील एका कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमात लोगोचे अनावरण देखील करण्यात आले.  यावेळी कंपनीचे सीईओ प्रशांत पवार आणि बिझनेस डेव्हलपमेंट हेड निनाद देसले हे मान्यवर उपस्थित होते.

   याप्रसंगी अधिक माहिती देतांना कंपनीचे सीईओ प्रशांत पवार म्हणाले की, इलेक्ट्रिकदुचाकी हे वाहन क्षेत्रातील भविष्य असून इंधन बचत व प्रदूषणास आळा बसविण्यास याने मोठी मदत होणार आहे. ४५ मिनिटाच्या एका चार्ज मध्ये हि दुचाकी सुमारे १३५ किमी प्रवास करू शकते. गाडी सोबत दोन बॅटरी दिल्या असून बॅटरीस ५ वर्षाची गॅरंटी देण्यात येत आहे. या बतारीचे चार्जिंग करण्यासाठी शहरातील चाय टपरी व डॉमिनोज येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून घरातही हि बटरी चार्ज होऊ शकते. आगामी कालावधीत नाशिक मध्ये या वाहनांची निर्मिती होणार असून यामुळे नाशिक मध्ये नवी गुंतवणूक होऊन रोजगाराच्याही अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऍटोम हि दुचाकी ७ वेगवेगळ्या मॉडेल मध्ये उपलब्ध असून सुमारे ३१०० ग्राहकांनी याची आगाऊ नोंदणी केली आहे. हि दुचाकी खरेदी करण्यासाठी शासनाच्या सबसिडीचा हि लाभ मिळेल.  

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News