अदिश्वर ऑटो राइड इंडियातर्फे नाशिकमध्ये ‘मोटो व्हॉल्ट’ सुपरबाइक शोरूमचे उद्घाटन

Sep 8, 2023

* मोटो व्हॉल्ट ही भारतातील एकमेव मल्टी- ब्रँड सुपरबाइक फ्रँचाईझी
*मोटो व्हॉल्टतर्फे जागतिक दर्जाच्या ब्रँड्ससह मोटो मोरिनी, झोंतेस आणि क्यूजे        मोटर उपलब्ध केली जाणार
* मोटो व्हॉल्ट शोरूमध्ये विविध प्रकारची वस्त्रप्रावरणे आणि अ‍ॅक्सेसरीजही मिळणार

नाशिक  – वाहतुकीची प्रीमियम साधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी अदिश्वर ऑटो राइड इंडिया प्रा. लि. (एएआरआय) या महावीर समूहातील कंपनीने मोटो व्हॉल्ट हे आपले अद्ययावत व्हेंचर नाशिकमध्ये लाँच केले. मोटो व्हॉल्ट ही मल्टी- ब्रँड सुपरबाइक फ्रँचाईझी आहे.

‘शिवांशी ऑटो वर्ल्ड’ बॅनरअंतर्गत हे अत्याधुनिक शोरूम शॉप क्रमांक ६ आणि ७, वाणी हाउस, वॉक्हार्ट हॉस्पिटलजवळ, नाशिक – ४२२०११ येथे वसलेले आहे. या शोरूममध्ये मोटो मोरिनी, झोतेंस तसेच नुकताच लाँच करण्यात आलेला क्यूज मोटर हा आंतरराष्ट्रीय ब्रँड अशा ब्रँड्सच्या सुपरबाइक्सची जागतिक श्रेणी उपलब्ध करण्यात आली आहे. या शोरूममध्ये सर्व प्रकारची विक्री सेवा, सुटे भाग उपलब्ध करून दिले जाणार असून त्याचबरोबर विविध प्रकारची वस्त्रप्रावरणे आणि अ‍ॅक्सेसरीजही मिळणार आहेत.

याप्रसंगी अदिश्वर ऑटो राइड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विकास झबख म्हणाले, ‘अदिश्वर ऑटो राइड इंडियामध्ये आम्ही ग्राहकांना त्याच्या पैशांचे चांगले मूल्य मिळवून देत त्यांच्याबरोबरचे नाते आणखी दृढ करण्यावर भर देत असतो. त्याचसाठी अशाप्रकारची एकमेव मल्टी- ब्रँड सुपरबाइक फ्रँचाईझी- मोटो व्हॉल्ट नाशिकमध्ये लाँच करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. या लाँचमुळे सर्वसमावेशक उत्पादने, विक्री आणि सेवा ग्राहकांना मिळवून देण्याची आमची बांधिलकी नव्याने अधोरेखित झाली आहे. भारतभरात मोटो व्हॉल्ट शोरूम्स लाँच करण्यामागे आम्ही सुपरबाइक प्रेमींना जगप्रसिद्ध ब्रँड्स आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे.’

नव्या डीलरशीपच्या लाँचविषयी मोटो व्होल्ट- नाशिकच्या डीलर प्रिन्सिपल सौ. श्रद्धा सुहास देशमुख म्हणाल्या, ‘मोटो व्हॉल्ट इंडियाशी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. मोटो व्होल्ट नाशिकमध्ये सर्व व्यावसायिकांना कंपनीच्या जागतिक मापदंडानुसार दर्जेदार ग्राहकसेवा पुरवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासह ग्राहकांना सफाईदार, प्रीमियम विक्री आणि सेवा अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे.’

मोटो व्हॉल्टने देशभरात वेगाने विस्तार करण्याचे ठरवले असून कंपनी सुपरबायकिंगबाबत पॅशनेट असलेल्या भागिदारांच्या शोधात आहे.

मोटो मोरिनी श्रेणीमध्ये ६५० सीसी श्रेणीच्या ४ मॉडेल्सचा समावेश असून त्यांची किंमत ६,८९,००० रुपयांपासून (एक्स शोरूम इंडिया) सुरू होते. त्यामध्ये सेममेझ्झो रेट्रो स्ट्रीट आणि स्क्रॅम्ब्लर तसेच एक्स- केप ६५० आणि एक्स केप ६५० एक्सचा समावेश आहे.

झोंतेस श्रेणी ३,१५,००० रुपयांपासून (एक्स शोरूम इंडिया) सुरू होते. त्यामध्ये ३५० सीसी विभागातील पाच मॉडेल्सचा समावेश आहे – ३५०आर, ३५०एक्स, जीके३५०, ३५०टी आणि ३५०टी एडीव्ही.

क्यूजे मोटरची श्रेणी १,९९,००० रुपयांपासून (एक्स शोरूम इंडिया) सुरू होते आणि त्यात २५० सीसी ते ४०० सीसी विभागातील ४ मॉडेल्सचा समावेश आहे – एसआरसी २५०, एसआरसी ५००, एसआरव्ही ३०० आणि एसआरके ४००.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News