डेंगी शॉक सिन्ड्रोम च्या उपचारासाठी सजगता आवश्यक – डॉ.भरत त्रिवेदी

Sep 15, 2023

नाशिक – दोन दशकांपासून ठाण मांडून बसलेल्या डेंगी या आजारामध्ये ‘डेंगी शॉक सिन्ड्रोम’ ही गंभीर अवस्था मानली जाते. या अवस्थेतील रुग्णांवर मृत्युची टांगती तलवार असू शकते. त्यामुळे ही अवस्था वेळीच ओळखून आयसीयू, व्हेन्टीटिलेटर व अन्य सुविधा उपलब्ध असेलल्या रुग्णालयात तातडीने उपचार झाल्यास मृत्यू टाळता येतील.
या पार्श्वभूमीवर थेट गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंतच्या सर्व डॉक्टरांनी सजग होणे आणि डेंगीच्या अशा रुग्णांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यासाठीच डॉक्टरांना गरजेनुसार प्रशिक्षण देता येऊ शकते. ती काळाची गरज आहे, असे स्पष्ट मत सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स नाशिक चे वरिष्ठ चेस्ट फिजिशीयन & पल्मोनोलोजिस्ट डॉ. भरत त्रिवेदी यांनी व्यक्त केले.
 ‘डेंगी शॉक’ची अवस्था ओळखणे हाच तरणोपाय असल्याचे नमूद करून डॉ भरत त्रिवेदी म्हणाले की शहरासह इतर भागात मागच्या दीड ते दोन दान दशकांपासून डेंगी दिसून येत आहे आणि आज तर संपूर्ण देशात डेंगीने ठाण मांडल्यासारखी स्थिती आहे. तसेच पूर्वी केवळ पावसाळ्यात दिसणारा डेंगी आजही पावसाळ्यातच सर्वाधिक प्रमाणात दिसत असला तरी आता तो इतर ऋतुंमध्येही सर्रास दिसतो. मुळात स्वच्छ पाण्यापासून निर्मिती होणाऱ्या एडिस इजिप्ती या प्रकारच्या मादी डासाच्या दंशामुळे होणाऱ्या या आजाराच्या केवळ १० ते १५ टक्के केसेस गंभीर असतात आणि ‘डेंगी शॉक सिन्ड्रोम’ मुळे डेंगीचा रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. तेवढ्याच रुग्णांना आयसीयू, व्हेंटिलेटर व इतर सोयी सुविधांची गरज असते. तसेच ‘डेंगी शॉक सिन्ड्रोम’ या गंभीर अवस्थेसह श्वसनविकाराच्या गुंतागुंतीमुळेच (एआरडीएस) डेंगीच्या रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यासाठीच ‘डेंगी शॉक’ ची अवस्था नेमकेपणाने व लवकरात लवकर ओळखणे सर्वांत महत्वाचे ठरते. अशा ‘डेंगी शॉक’ व एआरडीएस’च्या रुग्णांना तातडीने योग्य उपचार मिळाले तर हे रुग्ण नक्कीच वाचू शकतात असेही त्यांनी नमूद केले.
त्यासाठी खालील पावले उचलणे गरजेचे आहे
 अशा रुग्णांना व्हेंटिलेटरसह आयसीयुची सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करुन तात्काळ उपचार सुरू करणे अत्यावश्यक ठरते. अर्थात, डेंगीला कोणत्याही वेगळ्या किंवा स्वतंत्र उपचारांची गरज नसते, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. त्याचवेळी डेंगीवर कोणतीही थेट औषधे नाहीत व डेंगीच्या उपचारांमध्ये प्रतिजैविकांचाही कोणताच ‘रोल’ नाही. खरे तर या रुग्णांच्या शरीरामध्ये पाण्याचे योग्य प्रमाण राखणे (हायड्रेशन) तसेच इतर गुंतागुंत होणार नाही, याची काळजी घेणे ,गरजेनुसार व्हेंटिलेटरचा रुग्णाला आधार देणे व रुग्णाचे योग्य मॉनिटरिंग करणे आवश्यक असते.
 ‘डेंगी शॉक ची लक्षणे सामान्य नागरिक ओळखू शकतात का ? –
 ‘शॉक’ची लक्षणे सामान्य नागरिक नक्कीच ओळखू शकतात. जोरजोरात श्वास घेणे, गुंगीत असंबद्ध बडबडणे, शुद्ध हरपणे किंवा अर्धवट शुद्धीत असणे, लघवी अतिशय कमी होणे, हात-पाय थंड पडणे अशी काही ‘डेंगी शॉक’ ची स्पष्ट लक्षणे असतात. अशी कोणतीही लक्षणे असल्यास संबंधित रुग्णाला तज्ज्ञाकडे घेऊन जाणे व तज्ज्ञानेही गरजेनुसार तातडीने पावले उचलणे गरजेचे असते. ‘आयजीजी- आयजीएम टेस्ट ने या आजाराची खात्री पटू शकते. त्याचवेळी आजाराच्या सुरुवातीच्या टप्यात हिमोग्राममध्येही डेंगीची कल्पना येऊ शकते…
 प्लेटलेट देणे किती गरजेचे असते ? पपई, किवी यासारख्या फळांनी प्लेटलेट वाढतात का ?
डेंगीच्या फार कमी रुग्णांना प्लेटलेट देण्याची गरज पडते. डेंगीमुळे प्लेटलेट कमी होणे अगदी सामान्य आहे; परंतु कमी झालेल्या प्लेटलेटसुद्धा नैसर्गिकरित्या वाढतात. जेव्हा रुग्णाच्या प्लेटलेट २० हजारांपर्यंत घटतात व रक्तस्त्राव सुरू होतो, तेव्हा आणि तेव्हाच प्लेटलेट देण्याची गरज पडू शकते. हे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेही आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट केले आहे. त्याचवेळी पपई, किवी किंवा इतर कोणत्याही फळांनी प्लेटलेट वाढत नाहीत. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News