इसुझू मोटर्स इंडियाचे नाशिकमध्ये एक नवीन 3 एस डीलरशिपचे उद्घाटन

Sep 29, 2023

• ‘महाजन इसुझूची’ नाशिकमध्ये अधिकृत डीलरशिप म्हणून नियुक्ती
• कार मॉलमध्ये सोयीस्करपणे स्थित असलेल्या नवीन 3एस सुविधेचे उद्घाटन
• इसुझू युटिलिटी वाहनांची वाढती मागणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

नाशिक -इसुझू मोटर्स लिमिटेड जपान ची उपकंपनी, इसुझू मोटर्स इंडियाने आज महाराष्ट्रातील वाढणारे औद्योगिक आणि कृषी केंद्र नाशिकमध्ये महाजन इसुझू या नवीन 3एस (सेल्स, सर्व्हिस अँड स्पेअर्स) डीलरशिपचे उद्घाटन केले. 5,500 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेली, नवीन डीलरशिप मुंबई-आग्रा रोडवर, नाशिकमधील हॉटेल एक्स्प्रेसच्या पुढे सोयीस्करपणे स्थित आहे, ज्याद्वारे जागतिक दर्जाच्या इसुझू युटिलिटी वाहनांच्या श्रेणीमध्ये प्रवेश प्रदान केला जातो.

कंपनीने नवीन इसुझू डी-मॅक्स एस-कॅब झेड लाँच केली असून त्यासोबतच पहिल्या ग्राहकाला गाडीच्या चाव्या सुपूर्द करत या नवीन डिलरशिपमधून विक्रीची सुरुवात केली. नवीन डी-मॅक्स एस-कॅब झेड भारताच्या पिक-अप संस्कृतीला मूर्त रूप देते सोबतच स्मार्ट लुक, दणकट आणि टिकाऊ वर्कहॉर्स क्षमता, सुरक्षितता आणि प्रवासी वाहनांनसारखा आरामदायीपना देतो. 3एस डीलरशिप कर्मचाऱ्यांना इसुझू तज्ञांच्या देखरेखीखाली प्रशिक्षित केले गेले आहे आणि ते ग्राहकांना दर्जेदार ग्राहक अनुभव देतील.या डीलरशीपच्या समावेशासह, इसुझू मोटर्स इंडियाने मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर येथे आधीपासूनच कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील पाच ठिकाणी विक्री आणि सेवांची पोहोच वाढवली आहे.

श्री राजेश मित्तल, मॅनेजिंग डायरेक्टर, इसुझू मोटर्स इंडिया याप्रसंगी बोलताना म्हणाले, “आम्ही आमची उपस्थिती देशभरात सतत वाढवत आहोत आणि महाराष्ट्र हे इसुझू साठी भारतातील एक महत्वाची बाजारपेठ आहे, आम्हाला नाशिकमधील महाजन इसुझू एलएलपी सोबत भागीदारी करताना अत्यंत आनंद होत आहे. गेल्या काही वर्षांत, इसुझू समूहाने ‘मूल्य’ वितरीत करण्यात आणि बाजारात ‘ग्राहक आनंद’ सुनिश्चित करण्याचा विश्वास संपादन केला आहे तेही आपल्या एकंदर इसुझू कंपनीचे विचार आणि मूल्य जोपासत. ‘इसुझू’ या ब्रँडने मिळवलेल्या ओळखीमुळे आम्हाला राज्यात आमच्या उत्पादनांची प्रचंड क्षमता दिसत आहे. आम्ही नाशिकमध्येही यशस्वी प्रवासाची वाट पाहत आहोत आणि महाजन इसुझू यांना त्यांच्या प्रयत्नात सर्वोत्तम यश मिळो अशी शुभेच्छा देतो.”

श्री सचिन महाजन, मॅनेजिंग डायरेक्टर, महाजन इसुझू म्हणाले, “100 वर्षांची विश्वासार्हता आणि टिकाऊपणाचा वारसा असलेल्या इसुझू या ब्रँडसोबत भागीदारी करताना आम्ही अत्यंत आनंदी आणि उत्साही आहोत. आम्ही राज्यात आणि विशेषत: नाशिकमध्ये इसुझू वाहनांसाठी एक लक्षणीय आकर्षण पाहत आहोत, जे आम्हाला या प्रदेशातील विविध खरेदीदारांच्या गरजा पूर्ण करण्याची संधी देते. इसुझू वाहनांची श्रेणी आमच्या इतर ऑटोमोबाईल व्यवसायाला पूरक ठरेल आणि आम्ही या यशस्वी प्रवासासाठी उत्सुक आहोत. एक ग्रुप म्हणून, आम्ही अत्यंत ग्राहक केंद्रित आहोत आणि इनोव्हेटिव्ह विचार आणि नवीन उद्योग बेंचमार्क सेट करून ग्राहकांना आनंद मिळवून देण्याच्या सामान्य दृष्टीकोनाची जाणीव करून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”महाजन ग्रुप एका दशकाहून अधिक काळ ऑटोमोबाईल आणि वैविध्यपूर्ण व्यवसाय पोर्टफोलिओसह व्यवसायात आहे. त्यांचा यशाचा मंत्र ‘ग्राहक आणि कर्मचार्यांावर लक्ष केंद्रित करून इनोव्हेटिव्ह विचार करून आणि उद्योग मानके ठरवून सतत सुधारण्याच्या संस्कृतीला आकार देण्याच्या दृष्टीकोनातून प्रेरित आहे.’ त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि क्षेत्रातील ट्रेंड सेटर म्हणून सन्मानित आहेत .

 

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News