भारत हा देश युवकांचा देश म्हणून संबोधला जात असून, सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून कृषी क्षेत्रास ओळखले जाते. मोठ्या प्रमाणात युवा हा शेती व त्यांच्याशी निगडीत उद्योगामध्ये सहभागी होत असतो. शेती व्यवसाय हा सर्वाधिक जोखमीचा म्हणून बघितला जात असून, या व्यवसायातून युवा वर्ग मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहे. परंतु, त्यातील एक वर्ग असा आहे कि तो या क्षेत्रातील विविध समस्यांना सामोरे जाऊन आपल्या प्रयोगशीलतेने त्यावर मात करीत आहे. अशा युवकांचा सन्मान आणि त्यांच्या कार्याचा गौराव ‘कृषीथॉन’ या भारतातातील अग्रगण्य प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असतो.
सन २०१९ च्या कृषीथॉन युवा सन्मानाचे नामांकन सुरू झाले असून, कृषी व कृषीशी निगडित क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातील निवडक लोकांना हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. ‘प्रयोगशील युवा शेतकरी’ (पुरुष गट), ‘प्रयोगशील युवा शेतकरी’ (महिला गट), ‘प्रयोगशील युवा कृषी उद्योजक’ व ‘प्रयोगशील युवा संशोधक’ अशा चार गटांत तर कृषी क्षेत्रातील शासकीय कर्मचारींसाठी ‘कृषी विस्तार कार्य सन्मान’ हे पुरस्कार १४ व्या ‘कृषीथॉन’ आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात २१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान वितरित केले जाणार आहेत.
कृषीथॉन युवा सन्मान पुरस्कारांच्या अधिक माहितीसाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन,मिडीया हाऊस, वृंदावन लॉन्स समोर, आनंदी नगर, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक – ४२२०१३ या पत्त्यावर किंवा krishi.nashik@gmail.com किंवा भरत निकम यांना – ७७२००३०१४८ या क्रमांकावर संपर्क साधावा.



