इंडिगोरीच आणि इंटरग्लोब फाऊन्डेशन आयोजित ‘ माय सिटी माय हेरिटेज’ वॉकचे आयोजन ; नाशिकचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिकचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न

Nov 7, 2023

नाशिक : इंडिगोरीच या इंडिगोच्या सीएसआर उपक्रम आणि इंटरग्लोब फाऊन्डेशन या इंटरग्लोग एन्टरप्रायझेसच्या सामाजिक उपक्रमा तर्फे ५ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथे त्यांच्या चौथ्या हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. हा वॉक म्हणजे ‘माय सिटी माय हेरिटेज’ मोहिमेचा एक भाग असून या माध्यमातून भारतातील विविध शहरांमधील परंपरा आणि संस्कृतीची माहिती लोकांना मिळावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मंचाच्या माध्यमातून देशातील मूर्त आणि अमूर्त अशा परंपराची लोकांना ओळख होण्यासाठी विविध चर्चा आणि जोडण्यांसाठी प्रयत्न केले जातात. ‘माय सिटी माय हेरिटेज’ची सुरुवात नोव्हेंबर २०२२ मध्ये करण्यात आली आणि अशा प्रकारच्या वॉक्सचे आयोजन यापूर्वी प्रयागराज, भुवनेश्वर आणि शिलाँग येथे करण्यात आले होते.

नाशिकचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या ‘माय सिटी माय हेरिटेज’ मोहिमेचे नाशिक मध्ये आयोजन करण्यात आले होते. या हेरिटेज वॉकचे नेतृत्व प्रसिध्द कन्झर्व्हेशन आर्किटेक्ट श्रीमती अमृता उपलेकर यांनी केले होते व त्यांनी शहरातील महत्त्वपूर्ण ठिकाणांची अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिली. या वॉकच्या मार्गामध्ये काळाराम मंदीर, गोरे राम मंदीर, नारोशंकराचे मंदीर, गोदावरी घाट, राम कुंड, दुतोंड्या मारुती, गंगा गोदावरी मंदीर, कल्पेश्वर मंदीर, अहिल्या राम मंदीर, सरकारवाडा येथून होऊन वॉकचा शेवट हा सुंदरनारायण मंदीरात करण्यात आला. या उपक्रमाला स्थानिक लोकांसह, सरकारी अधिकारी आणि इंडिगो व इंटरग्लोब फाऊन्डेशनच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

यावेळी बोलतांना इंडिगोचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पीटर एल्बर्स यांनी सांगितले “ ‘माय सिटी माय हेरिटेज’ मोहिमेच्या माध्यमातून नाशिकच्या वारसास्थळांचा आढावा आणि संरक्षणासाठी योगदान देण्याचा इंडिगो ला अभिमान आहे. यामुळे केवळ पर्यटनाला चालना तर मिळेलच पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वाधिक भेट ‍दिल्या जाणार्‍या नाशिकच्या इतिहासाची आणि संस्कृतीची माहिती लोकांना देणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे. नाशिक हून तीन शहरांना थेट जोडलेले असल्यामुळे आम्ही समाजाला सहकार्य करुन आमच्या अतुलनीय नेटवर्कच्या माध्यमातून लोक आणि स्थळांना जोडत आहोत.”

इंटरग्लोब फाऊन्डेशन च्या चेअरपर्सन रोहिणी भाटीया यांनी सांगितले “ इंटरग्लोब फाऊन्डेशन मध्ये आम्ही सांस्कृतिक वारसास्थळांचे रक्षण करणे ही गरज ओळखून ती जबाबदारी ओळखली आहे. ‘माय सिटी माय हेरिटेज’ बरोबर जोडलेले असणे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असून आता आम्ही सुंदर आणि सांस्कृतिक दृष्ट्या श्रीमंत अशा शहरात आलो आहोत. या सुंदर अशा शहरामध्ये अनेक ऐतिहासिक आणि परंपरागत अशी महत्त्वाची ठिकाणे असून या मोहिमेमुळे ती पाहण्याची आणि त्यांचा प्रसार करण्याची संधी आंम्हाला मिळाली. या हेरिटेज वॉक्सच्या माध्यमातू आम्ही नेहमीच महत्वपूर्ण संभाषण करुन भागीदारीच्या माध्यमातून भारतातील श्रीमंत असा वारसा हा स्थानिक समुदायात पोहोचवण्यात यशस्वी होत असून आम्ही यासाठी वचनबध्द आहोत.”

नाशिक मधील एक आघाडीची एअरलाईन ऑपरेटर म्हणून इंडिगो ने नेहमीच शहरासाठी एक सक्षम जोडणी दिली असून यामुळे राज्यासह राज्याबाहेरील उपलब्धताही वाढली आहे. नाशिक मध्ये काम सुरु केल्या पासून एअरलाईन कडून गोवा, अहमदाबाद आणि नागपूर साठी थेट सेवा दिली जाते.

हेरिटेज वॉक व्यतिरिक्त इंडिगोरीच ने नेहमीच महाराष्ट्रातील नाशिक मध्ये विविध सीएसआर उपक्रम हाती घेतले आहेत. या कार्यक्रमांचे आयोजन हे अफार्म या पुण्यातील संस्थेच्या भागीदारीतून करण्यात येतात. संस्थे तर्फे महाराष्ट्र प्रबोधन सेवामंडळ (एमपीएसएम) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनबल डेव्हलपमेंट (एनआयएसडी) ला सहकार्य केले जाते. २०१८ पासून या उपक्रमामुळे १२ हजार ग्रामीण महिलांना शाश्वत कृषी आणि व्यवसाय विकासात योगदान दिले जाते. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात चार जिल्ह्यांचा समावेश आहे (पुणे, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे). इंडिगोरीच आता येत्या काही महिन्यांत दुसर्‍या टप्प्याची सुरुवात करण्याची तयारी करत आहे.

इंटरग्लोब फाऊन्डेशन आणि इंडिगोरीच या दोघांनी वैयक्तिकरित्या विविध प्रकल्प पुढे नेऊन भारतातील वारशांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यावर भर दिला आहे. इंटरग्लोब फाऊन्डेशनच्या काही कामांमध्ये दिल्लीतील अब्दुर रहीम खान ए खन्नान यांच्या समाधीचे सांस्कृतिक पुनरुज्जीवन व जतन करणे, दहा शहरातील मॅपिंग आणि कागदपत्रे तपासणे, आणि राजस्थानातील देलवाडा येथील इंद्र कुंड नामक पायर्‍यांच्या विहीरीचे जतन करणे यांचा समावेश आहे. नुकतेच इंटरग्लोब फाऊन्डेशन कडून इंटरग्लोब हेरिटेज फेलोशिपची सुरुवात करुन विविध स्तरांवरील सार्वजनिक कागदपत्रे आणि संशोधन करुन भारतातील संस्कृतीचा अभ्यास करत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला आहे. इंडिगोरीच ने सुध्दा हैद्राबाद येथील कुतुबशाही हेरिटेज पार्क मधील मुहम्मद कुतूब शहा च्या समाधीचे पुनरुज्जीवन करुन मध्यप्रदेशातील लालबाग पॅलेसच्या अंतर्गत सजावटीचे काम पूर्ण केले आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
Breaking News