नाशिक- भारतात एकीकडे भरपुर पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पुराची स्थिती निर्माण होते. तर दुसरीकडे नळात पाणी नसल्याने नागरी वसत्यांमध्ये पाणी पुरवठ्याचे आव्हान निर्माण होत असते. ही परस्पर विरोधी परीस्थिती बदलाची असेल तर पाण्यावर अवलंबून असलेल्या विविध क्षेत्रांनी एकमेकांमध्ये समन्वय साधतांना पाण्याचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. योग्य व्यवस्थापनातूनच पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला.
इंडियन वर्क्स असोसिएशन (आयडब्ल्यूडब्ल्यूए) यांच्यातर्फे नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारातील महाराष्ट्र इनव्हॉयर्नमेंटल इंजिनिअरींग ट्रेनिंग ॲण्ड रिसर्च अकॅडमी (मित्रा) येथेआयोजित आंतरराष्ट्रीय परीषदेप्रसंगी सहभागी होत तज्ज्ञांनी चर्चा घडविली. नाशिक महानगरपालिका तसेच मित्रा यांच्या सहकार्याने होत असलेल्या या दोन दिवसीय परीषदेचे उद्घाटन शुक्रवारी (२४ नोव्हेंबर)पार पडले. या कार्यक्रमासयुटिलिटीचे संचालक डॉ.दयानंद पानसे, आयडब्ल्यूडब्ल्यूएचे अध्यक्ष श्री. सुभाष भुजबळ, मलेशिया येथील आयएनडीएएचचे सीईओ नरेंदरन मनीयम, इंटरनॅशनल वॉटर असोसिएशनचेनियोजित अध्यक्ष प्रा. हामांथा कसान, एआयआयएलएसजीचे डायरेक्टर जनरल व सचिव जयराज फाठक, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातील डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस, रिव्हर डेव्हलपमेंट ॲण्ड गंगारिजुइेंशन या विभागाचे आयुक्त अनुज कनवाल, श्रीलंका मंत्री महोदय जीवन थोंडमन, आयडब्ल्यूडब्ल्यूएचे संचालक डॉ.पराग सदगिर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री. अनुज कनवाल म्हणाले, सध्या भारतात उपलब्ध पाण्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास पुढील पन्नास वर्षांसाठी स्थानिक स्तरावरील पाण्याची मागणी पूर्ण करता येऊ शकते. भारतात पाण्याची कमतरतानसून, योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. पाणी हा नियोजनाचा विषय असून, प्रत्येक क्षेत्राने एकमेकांशी समन्वय साधला पाहिजे. जनशक्ती मंत्रालय पाण्याची बचतीसंदर्भात धोरणावर काम करतअसल्याचे त्यांनी नमूद केले.श्री. नरेंदरन मनीयम म्हणाले, पाण्याविषयीची आव्हाने खुप आहेत. पाणी प्रश्न सोपा नसून, सर्वांनी मिळून काम करणे काळाची गरज आहे.
प्रा. हामांथ कसान म्हणाले, गेल्या २२वर्षांपासून आफ्रिकेत पाण्याच्या प्रश्नावर काम करत आहे. त्यामुळे भविष्यात भारतावरील पाण्याचे संकट टाळायचे असेल तर आत्तापासून उपाययोजनावर भर देण्याची आवश्यकता आहे. जयराज फाठकम्हणाले, आंतराष्ट्रीय कार्यरत असलेली संघटना तसेच महानगरपालिका सोबत काम केल्यास सकारात्मक परीणाम दिसून येऊ शकतात. त्यांनी मुंबईसंदर्भात उदाहरणे देतांना कामकाजाच्या दिशेबाबतमार्गदर्शन केले.
या परीषदेच्या पहिल्या दिवशी विविध विषयांवर तज्ज्ञांनी आपले मते मांडली. तसेच चर्चा करतांना पाण्याच्या व्यवस्थापनावर विशेषता ग्लोबल साउथ याअंतर्गत मोडत असलेल्या देशांमध्ये आवश्यकउपाययोजनांबाबत चर्चा घडविण्यात आली. या परीषदेच्या दुसर्या दिवशी २५ नोव्हेंबरला तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.





