Nashik : मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये विकासाच्या संधी आता मर्यादित झालेल्या आहेत. सर्व सुविधांनीयुक्त असे नाशिक भविष्यात राज्यातील विकासाचा केंद्र ठरु शकते. येथील बांधकाम क्षेत्र, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांना भविष्यात भरपूर वाव असू शकतो, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
प्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ नाशिक (प्राण) या संस्थेच्या वतीने कॉलेजरोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहात गुरुवारी (दि.७ डिसेंबर) आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी दीपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स तसेच दि ॲव्हेन्यु बिल्डर ॲण्ड डेव्हलपर, एचडीएफसी बँक, अर्बन साईट्स व नयनतारा प्रेसिडेन्सी, मेक ॲडव्हरटायझिंग यांचे सहकार्य लाभले.
‘प्राण’चे अध्यक्ष विक्रांत आव्हान यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. व प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली. दरवर्षी ७/१२ ला संस्थेतर्फे साजरा केल्या जाणाऱ्या दिनविशेषाची माहिती त्यांनी उपस्थितांना करुन दिली. तसेच यापुढेही सदस्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे जाहीर केले.

कार्यक्रमात सहभागी होतांना एनएमआरडीए मेट्रोपोलिटीयन कमिशनर सतिशकुमार खडके म्हणाले, नाशिकच्या लोकसंख्येत वाढ होत असून, वाढत्या शहरीकरणाला तसेच इतर महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी पायाभूत सुविधांची जलदगतीने उभारणी होते आहे. लवकरच पाच नवीन टीपी प्रकल्प सुरु होत आहेत. रस्ते बांधणीदेखील सुरु आहे. निरंजन शहा व क्रेडाई चे सह सचिव रिशिकेश कोते यांनीही मार्गदर्शन केले व Moderator महणून सांगल्यांशी सावंद साधला.
श्री. वर्हाडे यांनी पर्यटन, शिक्षण व आयटी क्षेत्रातील विकासाच्या संधींबाबत भाष्य केले. तर जितूभाई ठक्कर यांनी क्वालीटी सिटी या चळवळीविषयीची माहिती दिली. गृहप्रकल्प, शहर विस्तारीकरण यासह कौशल्ये, शिक्षण, स्वच्छता अशा विविध विषयांवर काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक स्तरावर झपाट्याने वाढ होणार्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश असल्याचे सांगतांना आव्हानांची माहिती त्यांनी दिली.
डॉ. संजय रुनवाल यांनीही मार्गदर्शन केले. नाशिकची वेगळी वैशिष्ट्ये असून, इतर शहरांशी तुलना न करता हे वैविध्य जपले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आगामी २०२७ मधील कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली.
दीपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे दीपक चंदे यांनी नाशिकमध्ये सनदिका का असावी, याबाबत भाष्य केले. मोठी रुग्णालये, महाविद्यालय, शाळा, गुन्हेगारीचे मर्यादित प्रमाण, मालमत्तांचे वाजवी दर, चांगल्या पायाभूत सुविधा आदींमुळे नाशिक ही सर्वांची पसंती असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले, नाशिकमध्ये रास्त दरांमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे येथे एज्युकेशन हब होण्याच्या संधी आहेत. शहरवासीयांची जीवनशैली उंचावत असून, सर्वसुविधांनीयुक्त सनदिकांना, व्यावसायिक संकुलांना मागणी आहे. ग्राहक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात संवाद घडविण्यासाठी कल्सल्टंटची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
नरेडकोचे (Secretary) सचिव सुनिल Gavade यांनी बांधकाम, पायाभुत क्षेत्रातील विस्ताराबाबतची माहिती दिली. समृद्धी महामार्गामुळे विकासाला गती प्राप्त होणार असल्याचे नमूद केले. निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी नाशिकच्या औद्योगिक विस्ताराचा आढावा घेतला. शहरासह जिल्ह्याच्या भागात औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग उभारणी घेत असून, स्टार्टअपसाठीदेखील नाशिक महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.
एआयडब्ल्यूपीएचे जगदीश होळकर यांनी वाईनरी उद्योगाचा शहराच्या विकासातील वाटा याविषयी माहिती दिली. पर्यटनासाठी वाईन उद्योग पुरक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. इस्पॅलियर स्कूलचे संचालक सचिन जोशी यांनी काळाचे बदलते स्वरुप व भविष्यातील नोकरीच्या बदलत्या संधी यांविषयी माहिती दिली. ॲव्हेन्यु बिल्डर्सचे मुकूंद साबू यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये वाढलेल्या बांधकाम क्षेत्राविषयीचा आढावा घेतला.
विनझित टेक्नॉलॉजीचे अभिजित जुनागडे यांनी आयटी क्षेत्राच्या व्याप्तीची माहिती दिली. विविध संघटनांद्वारे आयटी क्षेत्रातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न होत असल्याचे सांगून यामुळे शहराच्या अर्थकारणाला चालना मिळणार असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘प्राण’चे सचिव नितीन कोतकर यांनी सर्वांचे आभार मानले.ह्या कार्यक्रमात प्राण चे उपधक्ष्य प्रदीप रणधीर,तसेच कैलास कदम,राज तलरेजा,डी.जे धामणे,राजेंद्र कोतकर,नितीन जांगडा ,अमित वाघ,श्रीरंग भदाणे ,यश शाह,मनीष शहा,क्षितीज दंडगावाल,गिरीश विजन,रवी सूर्यवंशी,प्रकाश कठपाल,श्रीकांत पाटेकर यांनी कार्यक्रम यशवी करण्या साठी परिश्रम घेतले, कार्यक्रमात प्राण संस्थेचे सभासद व इतर रियल इस्टेट शी संबंधित मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते






