नाशिक (प्रतिनिधी) : उद्योगवर्धिनीतर्फे रविवार 15 सप्टेंबर 2019 रोजी अभियंता दिनाचे औचित्य साधून आर्टीफ़िशीयल इंटेलिजन्स,मशीन लर्नींग आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज या विषयावर सकाळी 9 ते दुपारी 1 वाजे दरम्यान रावसाहेब थोरात सभागृह,के.टी.एच.एम महाविद्यालय,गंगापूर रोड,नाशिक येथे कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती संचालक सुनील चांडक आणि प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ.ओमप्रकाश कुलकर्णी आणि तज्ञ गणेश अत्तरदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ,हिंदुस्थान अॅरोनॉटिक्स लिमिटेड(एच.ए.एल) आणि नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्प यांच्या सहकार्याने सदर कार्यशाळेचे आयोजन केले आहे.नाशिकमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय अंतराळ सोसायटीचे अध्यक्ष आणि इस्रोचे माजी ग्रुप संचालक डॉ.सुरेश नाईक, नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील, एच.ए.एल नाशिकचे मुख्य डिझायनर श्री.आर.व्ही हूलीराज,अतिरिक्त महाव्यवस्थापक (डिझाईन) श्री उत्तम सरावडे,सुप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ.ओमप्रकाश कुलकर्णी,या कोर्सचे एक्स्पर्ट श्री.गणेश अत्तरदे आणि नाशिक इन्क्यूबिटेरचे प्रवर्तक सुनील चांडक हे मार्गदर्शन करणार आहेत.
आधुनिक काळातील गॅझेट्स वापरातून निर्माण झालेल्या माहितीच्या आधारे घर, शेती, कार्यालय, कारखाने, आरोग्य, संसाधन इ. सगळ्यांचे स्मार्ट व्यवस्थापन करण्याचे तंत्र म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्ज आहे.या गॅझेट्समधील माहितीचे अॅनलिसीस करण्याचे तंत्र म्हणजे मशीन लर्निंग आहे.तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे असाधारण मानवी बुद्धीमत्ता आणि त्याचे आयाम संगणकाच्या सहाय्याने तपासणी करून कोणतेही असाधारण प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तर मिळू शकते.
या तिन्ही तंत्रांची अतिशय शास्त्रशुद्ध माहिती विविध उदाहरणाद्वारे श्रोत्यांना दिली जाणार आहे.विद्यार्थी,स्टार्ट अप्स आणि उद्योजकांना हे तंत्र आत्मसात करणे आवश्यक असून त्याद्वारेच अस्थित्व टिकावता येईल आणि विकास साधता येईल.
नाशिक स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने अनेक स्टार्टअप्सना चालना मिळू शकणार आहे.त्याबद्दल माहिती या कार्यशाळेत दिली जाईल.तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांचेकडील तंत्रज्ञान तसेच हिंदुस्थान अरोनॉटीक्स लिमिटेडला लागणाऱ्या सेवा याबाबतीत देखील यामध्ये मार्गदर्शन केले जाईल.या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे या तंत्रज्ञानामुळे अमेरिकेत झालेली आणि होऊ घातलेली क्रांती याबाबतीत सध्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये कार्यरत श्रीराम चांडक यांचे देखील मार्गदर्शन यात मिळणार आहे.आणि या तंत्रज्ञानाची माहिती आणि कौशल्य आत्मसात करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोर्सेसची माहिती या क्षेत्रातील तज्ञ श्री.गणेश अत्तरदे देणार आहेत.
विशेषतः सर्व प्रकारच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील संगणक क्षेत्रातील आणि सांखिकीय आणि भौतिक शास्त्रात पदवी घेणारे नाशिकमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या या कार्यशाळेचा फायदा विध्यार्थी,स्टार्टअप्स आणि उद्योजकांनी याचा फायदा घ्यावा. आणि नावनोंदणीसाठी उद्योगवर्धिनी,3 रा मजला,निर्माण इन्स्पायर बिल्डींग, कान्हेरेवाडी,जुन्या सी.बी.एस समोर,नाशिक संपर्क क्रमांक 7774054719 येथे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.आभार प्रदर्शन सौरभ केऱ्हाळकर यांनी केले.




