ओला इलेक्ट्रिकची ‘डिसेंबर टू रिमेंबर’ मोहिम ; एस१ एक्स प्लसची किंमत केवळ रुपये ८९,९९९ वर

Dec 14, 2023

नाशिक : ओला इलेक्ट्रिकने एन्डआयसीइएज मिशनला आणखी गती देण्यासाठी ‘डिसेंबर टू रिमेंबर’ मोहिमेची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत, सर्व नवीन एस१ एक्स प्लस आता २०,००० रुपये सवलतीसह उपलब्ध आहेत, ज्यामुळे एस१ एक्स प्लसची किंमत केवळ रुपये ८९,९९९ वर आणली आहे.यामुळे एस१ एक्स प्लस सर्वात स्वस्त टू व्हिलर ईवी स्कूटर ठरेल,ज्यामुळे बाजारात ही स्कुटर लवकरच लोकप्रिय होईल. एस१ एक्स प्लसची डिलिव्हरी देशभरात आधीच सुरु झाली आहे आणि ह्या स्कुटरला अभूतपूर्व मागणी दिसून आली आहे

एस१ एक्स प्लस उच्च दर्जाची कामगिरी, प्रगत तंत्रज्ञान वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या किमतीत उत्तम राइड गुणवत्ता देते. ही स्कुटर ३ केडब्ल्यूएच बॅटरीसह येते आणि १५१ किमीची प्रमाणित श्रेणी देते. ६ केडब्ल्यू मोटरचे पॉवर असलेली, एस१ एक्स प्लस ३.३ सेकंदात ०-४० केएमपीएच ला स्पर्श करते आणि ९० केएमपीएच चा टॉप स्पीड आहे.

ओलाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अंशुल खंडेलवाल म्हणाले, ओला इलेक्ट्रिकने नोव्हेंबर महिन्यात ३० हजार युनिट्सच्या विक्रमी विक्रीसह एक नवीन उद्योग बेंचमार्क स्थापित केला आहे. आज आम्ही आमच्या नवीन एस१ एक्स प्लस ला मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेला आणखी गती देण्यासाठी आणि ईवी च्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, सर्वात मोठा अडथळा दूर करत आहोत. आघाडीच्या आयसीइ स्कूटरच्या समतुल्य किंमतीसह, आम्हाला खात्री आहे की एस१ एक्स प्लस #एन्डआयसीइएज साठी तयार आहे. आमच्या स्कुटरच्या विस्तृत श्रेणीसह त्यांच्या आकर्षक किंमतीमुळे ग्राहकांना आता आयसीइ उत्पादन खरेदी करण्यास कोणताही अडथळा नसेल, अशी माझी खात्री आहे.

फायनान्स ऑफर : – खरेदीदार निवडक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआयवर ५००० रुपयांपर्यन्त सवलत मिळवू शकतात तर फायनान्स ऑफर मध्ये शून्य डाउन पेमेंट, शून्य-प्रक्रिया शुल्क आणि ६.९९ टक्के इतके कमी व्याजदर यासारख्या इतर ऑफर चा समावेश आहे.

ओलाने अलीकडेच आपला एस१ पोर्टफोलिओ पाच स्कूटरपर्यंत वाढवला आहे. १,४७,४९९ ची किंमत, एस १ प्रो (सेकंड जनरेशन) ही कंपनीची फ्लॅगशिप स्कूटर आहे तर एस१ एअर १,१९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ओला ने आपले आयसीइ-किलर उत्पादन, एस१ एक्स हे तीन प्रकारांमध्ये सादर केले आहे. एस१ एक्स प्लस, एस१ एक्स (३केडब्ल्यूएच), आणि एस१ एक्स (२केडब्ल्यूएच) विविध प्राधान्यांसह रायडर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारात आणले गेले आहे. एस१ एक्स (३ केडब्ल्यूएच) आणि एस१ एक्स (२केडब्ल्यूएच) साठी रिझर्वेशन विंडो फक्त ९९९ रुपयांमध्ये खुली आहे. एस१ एक्स (३केडब्ल्यूएच) आणि एस१ एक्स (२ केडब्ल्यूएच) स्कूटर अनुक्रमे ९९,९९९ रुपये आणि ८९,९९९ रुपयांच्या प्रास्ताविक किंमतीत उपलब्ध आहे.

अजून बातम्या वाचा..

मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

Nashik : मराठा समाजातील उद्योजकांच्या सक्षमीकरण, नेटवर्किंग व व्यावसायिक विकासासाठी संपूर्ण...

read more
प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचे हस्ते संपन्न

प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचे हस्ते संपन्न

नाशिक : प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांच्या - "मविप्र चे शिल्पकार ॲड.बाबुराव ठाकरे" या २४ व्या...

read more
आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – घोषणा ; इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी  ₹250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती जाहीर!

आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – घोषणा ; इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती जाहीर!

नाशिक : मागील १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत आलेल्या आकाश...

read more
क्रोमाच्या फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदाच्या गणेश चतुर्थीला ६०% पर्यंतची मोठी बचत

क्रोमाच्या फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदाच्या गणेश चतुर्थीला ६०% पर्यंतची मोठी बचत

घरी आणा पार्टी स्पीकर्सवर ६०% पर्यंत सूट,  व्हॅल्यू स्मार्टफोन्स खरेदी करा ३०,००० पेक्षा कमी...

read more
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या 5 व्या मेडिकल स्टोरचे उद्घाटन

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या 5 व्या मेडिकल स्टोरचे उद्घाटन

नाशिक : मुंबई आणि पुण्यातील विश्वसनीय फार्मसी चेन, झेनो हेल्थने आज नाशिकमध्ये त्यांच्या 5 व्या...

read more
Breaking News