सेंट्रमच्या मल्टिव्हिटॅमिन आणि प्रोटीन पावडर्सच्या प्रसारासाठी काजल अगरवालची निवड

Dec 15, 2023

नाशिक : सेंट्रम या जगभरांतील पहिल्या क्रमांकाच्या मल्टिव्हिटॅमिन ब्रॅन्ड तर्फे आज व्यावसायिक आणि कलाकार असलेल्या काजल अगरवालची त्यांच्या भारतातील मल्टिव्हिटॅमिन आणि प्रोटीनपावडर्सच्या ब्रॅन्ड ॲम्बेसडर पदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. अनेक भारतीयांना त्यांच्या पोषणाशी संबंधित गरजांविषयी जागरुकतेचा अभाव आहे. खरे पाहता, १० पैकी ८ भारतीयांमध्ये मल्टिव्हिटॅमिन्सची कमतरता आढळते. काजल सोबतची सेंट्रमची ही मोहिमसमतोल आहारासह पोषणाची ही गरज पूर्ण करण्यासाठी मल्टिव्हिटॅमिन्स च्या आहारातील समोवशाच्या महत्त्वाला अधोरेखित करते. सेंट्रम च्या सहकार्याने काजलच्या बहुआयामी रोल्स च्या व्यवस्थापनातील अखंडपणा हा या मोहिमेत अधोरेखित केला जात आहे.
या भागीदारी विषयी आपला उत्साह व्यक्त करतांना काजल म्हणते “ एक कलाकार, व्यावसायिक आणि एक नवोदित माता म्हणून मी रोज १०० टक्के देऊन माझ्यासारख्या बहुआयामी जीवनाला आकार देतअसते, म्हणूनच तुमच्या शरीराला आरोग्यपूर्ण ठेवण्याची मोठी गरज असते. सेंट्रम सारख्या विश्वसनीय ब्रॅन्ड बरोबर त्यांच्या मल्टिव्हिटॅमिन प्रोटीन पावडर्स आणि गमीज रेंज साठी सहकार्य करतांना मी
खूपच उत्साही आहे. हे पाहणे खूपच हृदयद्रावक आहे की ब्रॅन्ड तर्फे महिलांची खरी काळजी घेतली जात आहे आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येत आहे. मला आशा आहे की भारतीय महिला त्यांच्या अंतर्गत आरोग्याची काळजी घेतील, जेणेकरुन त्यांचे बाह्य सौंदर्य अधिक खुलू शकेल.”
या सहकार्या विषयी बोलतांना, हेलिऑनच्या भारतीय उपखंडाच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुख अनुरिता चोप्रा यांनी सांगितले “ बहुआयामी जीवन ही नवीन जीवनशैली आहे, आणि आपण अनेक भुमिका यावेळी बजावत असतो, त्यासाठी आरोग्यपूर्ण राहणे आवश्यक असते. सेंट्रम कडून प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला रोज गरजेचे मल्टिव्हिटॅमिन्स रोजच्या आहारासह घेऊन बहुआयामी भुमिका अदा करण्यासाठी प्रोत्साहीत करत आहे. काजल, ही अनेकांसाठी प्रोत्साहन देणारी आहे आणि रोजच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी सुयोग्य अशी प्रोत्साहक आहे. आम्ही भारतीयांना केवळ मल्टीविटामिन्सचे महत्त्व समजावत नाही तर वर्तणुकीत बदल घडवून आणू अशी आशा करतो ज्यामुळे भारतीयांना आतून निरोगी आणि बाहेर चमक निर्माण होते. ”

एफसीबी इंटरफेसचे एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह डायरेक्टर अरिजित सेनगुप्ता यांनी सांगितले “ सेंट्रम विमेन ॲन्ड किड्स मल्टिव्हिटॅमिन तसेच प्रोटिन साठी काजल अगरवाल बरोबरची ही भागीदारी म्हणजे प्रामाणिकते साठी वचनबध्दतेचा पुरावा आहे. एक माता म्हणून काजल नेहमीच विविध प्रकारचे जीवन जगत आली असून तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांमध्ये समतोल साधला आहे. म्हणूनच
ती मल्टिव्हिटॅमिन्सचा समावेश रोजच्या डाएट मध्ये करुन आणि सेंट्रम ‍विमेन मल्टिव्हिटॅमिन ॲन्ड प्रोटीनचा उपयोग करते. सेंट्रम प्रसिध्द असलेल्या सहजतेसह ब्रॅन्डचे घोषवाक्य मोअर पावर फॉर यूमध्ये तिच्यामुळे शक्ती प्राप्त झाली आहे.”

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News