नाशिक –टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड या भारतातील आघाडीच्या एनबीएफसीपैकी एका कंपनीने मॅजिकल दिवाली सीझन ६ च्या मेगा प्राइज विजेत्यांना ९ जानेवारी २०२४ या दिवशी टीव्हीएस ज्युपिटर प्रदान केली. मॅजिकल दिवाली सीझनदरम्यान ग्राहकोपयोगी कर्ज घेणाऱ्या एका ग्राहकाला हे बक्षीस मिळाले आहे. ग्राहक म्हणाले, ‘टीव्हीएस क्रेडिटने टीव्हीएस ज्युपिटर जिंकल्याचे कळवल्यानंतर माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता. हे खरंच अद्भुत आहे. मी अल्फा एनएक्स वितरकांकडून मोबाइल खरेदी केला आणि टीव्हीएस क्रेडिटची मॅजिकल दिवाळी स्पर्धा जिंकली. मी त्यांचा आभारी आहे.’
मॅजिकल दिवाळी हे टीव्हीएस क्रेडिटचे सर्वसमावेश मार्केटिंग कम्युनिकेशन अभियान असून यंदा त्याचा सहावा सीझन आहे. या सीझनअंतर्गत कर्जदार आणि ब्रँड प्रेमींना दुचाकी कर्ज, मोबाइल कर्ज, ग्राहकोपयोगी कर्ज, इन्स्टाकार्ड आणि वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. ही स्पर्धा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान सुरू होती व त्यादरम्यान सहभागींना २२ लाख रुपयांची दैनंदिन आणि भव्य बक्षिसे देण्यात आली. दैनंदिन बक्षिसांमध्ये स्पर्धेतील सहभागींना व्हाउचर्स, स्मार्टफोन्स आणि भव्य बक्षिसे उदा – टीव्हीएस ज्युपिटर, सुवर्ण नाणी, परदेशी सहल, प्री- लोडेड कार्ड्स आणि स्मार्ट टीव्हीएस मिळाली. ही स्पर्धा ३२,००० वितरकांकडे उपलब्ध करण्यात आली होती व त्यामध्ये ग्राहकोपयोगी वस्तू आणि दुचाकी ग्राहकांना समाविष्ट करण्यात आले होते. मॅजिकल दिवाली सीझन ६ स्पर्धेत ३६.७ दशलक्ष ऑनलाइन युजर्सना सहभागी करण्यात आले होते, तर १२,५०० पेक्षा जास्त ग्राहकांनी भाग घेत ती यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.




