तान च्या ट्रॅव्हल प्रदर्शनाचा समारोप ; आगामी हंगामाच्या सहलींचे नाशिकरांकडून बुकिंग

Jan 24, 2024

नाशिक – आगामी पर्यटनाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक (तान) तर्फे आयोजित तीन दिवसीय ट्रॅव्हल प्रदर्शनाचा समारोप झाला.. उन्हाळ्यातील पर्यटन स्थळे जसे हिमाचल, काश्मीर ,लद्दाख ,युरोप ,स्वित्झर्लंड यासाठी पर्यटकांची विशेष पसंती दिसली असून अयोध्या येथील राम मंदिर येथील सहलींबाबत देखील विशेष उत्सुकता दिसून आली . आगाऊ बुकिंग मुळे अनेक फायदे पण पर्यटकांना मिळत असल्याचे चित्र प्रदर्शनात जाणवले अशी माहिती तान चे अध्यक्ष सागर वाघचौरे यांनी दिली

गोविंद नगर येथील हॉटेल ट्रीट (मनोहर गार्डन) येथे आयोजित हे प्रदर्शन अनेक अर्थाने ट्रेंड सेटर दिसले.2002 मध्ये स्थापन झालेल्या ट्रॅव्हल एजंट असोसिएशन मधील सभासद असलेले ट्रॅव्हल एजंट हे पर्यटकांच्या विश्वासास पात्र ठरले आहेत .मधील काही काळात काही पोर्टलच्या फसव्या योजना तसेच नियमित व असोसिएशनचे सभासद नसलेल्या काही ट्रॅव्हल एजंट ने पर्यटकांची फसवणूक केली असल्याचे तक्रारी समोर आल्या होत्या .त्या पार्श्वभूमीवर नियमित ट्रॅव्हल एजंट असलेल्या तान सभासदांनी पर्यटकांची विश्वासार्हता मिळवली असल्याचे चित्र या प्रदर्शनानिमित्त दिसून आले असल्याचे देखील सागर वाघचौरे यांनी नमूद केले

नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी देश विदेशातील सहलींचे नियोजन तान सदस्य करत असून त्याच सोबत देश विदेशातून नाशिक व उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांना विविध सेवा देण्याचे काम देखील ट्रॅव्हल एजंट करत असतात.आगामी कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ची कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी तान देखील  प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष मनोज वासवानी, सचिव अरुण सूर्यवंशी, खजिनदार सचित लोणारी तसेच कमिटी सदस्य अमित चंडेल ,ईशान जोशी , अंबरीश मोरे ,प्रायोजक नोबेल टुरिझम चे सचिन भोळे व ट्रीट हॉटेल चे प्रशांत नायक यांनी सक्रिय सहभाग दिला .

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News