‘इंडियन प्लंबिंग प्रोफेशनल लीग’ प्रश्नमंजूषा स्पर्धा संकल्प असोसिएट ठरले विजेते

Sep 16, 2019

नाशिक : प्रतिनिधी – बांधकाम क्षेत्राशी निगडीत वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक व अभियंते यांच्यासाठी अभिनव अशा ‘इंडियन प्लंबिंग प्रोफेशनल लीग’ प्रश्नमंजूषा स्पर्धेत नाशिक विभागातून  संकल्प असोसिएटचे  ऐश्वर्या रामन आणि चारुदत्त महाजन हे दोघे विजेते ठरले आहे. इंडियन प्लंबिंग असोसिएशन  च्या   नाशिक  शाखेेद्वारे   याचे    आयोजन करण्यात आले होते.  

बांधकाम क्षेत्राशी निगडीत वास्तू विशारद, बांधकाम व्यावसायिक, अभियंता, प्रोजेक्ट सल्लागार, प्लंबिंग  सल्लागार आदी व्यवसायिकांमध्ये सुयोग्य प्लंबिंगविषयी जनजागृती व्हावी, प्लंबिंग क्षेत्रातील बदलांची आणि नव्या तंत्रज्ञानाची त्यांना माहिती व्हावी याकरीता इंडियन प्लंबिंग असोसिएशनकडून कार्यशाळेचे आयोजन करण्यात  येते. यात शेवटच्या टप्प्यात अनोखी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. या प्रोफेशनल लीगमध्ये नाशिकमधील फेरीत सुमारे २२ संघ सहभागी झाले. यातील उत्कृष्ट अशा तीन संघामध्ये अंतिम  प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक संघात दोन सदस्य होते. सहभागी संघांना  लीग दरम्यान विविध विषयांवर तज्ज्ञांद्वारे प्लंबिंग तंत्रज्ञान व आधुनिक प्लंबिंग कोडस व स्टॅण्डर्स, पाणी बचतीची उपकरणे, सांडपाण्याचे नियोजन, रेनवॉटर हार्वेस्टिंग, पाणीप्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी श्रीजी ग्रुप, श्रीनाथ कन्स्ट्रक्शन आणि  संकल्प असोसिएटचे संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने झाला. यावेळी  विजय सानप, नाशिक महानगर पालिकेचे इंजिनिअर नितीन वंजारी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर अतिशय खुमासदार शैलीत इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलिंद शेटे यांनी प्रश्न विचारले. कार्यक्रमाला  बीएआय नाशिक शाखेचे  अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेचे सचिव दिनेश क्षीरसागर, जितेंद्र कोतवाल, कैलास पाटील, चिन्मय देशपांडे, रवी जाधव, अविनाश महालपुरे, प्रदीप आबड, सुधीर अवलगावकर आदी सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News