जावा येझदी आयकॉनिक ” जावा ३५० ” ब्लू नाशिकमध्ये लॉन्चपॅड

Feb 26, 2024

नाशिक : जावा येझदी मोटारसायकलने ‘जावा ३५० ब्लू’ या चमकदार नवीन रंगाच्या पर्यायासाठी नाशिकला लॉन्चपॅड म्हणून निवडले. ही व्हायब्रंट शेड आता प्रथमच डीलरशिपवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला महिंद्रा ब्लूज फेस्टिव्हलमध्ये या रंगाच्या यशस्वी प्रदार्पणानंतर हे दर्शन घडवले जात आहे आणि हे या गाडीच्या आगामी देशव्यापी उपलब्धतेचे संकेत आहेत.

रोमांचकपदार्पण जावा येझदीच्या २०२४ ची जोरदार सुरुवात असल्याचे जावा ३५० च्यालाँचिंग आणि त्यांच्या चालू असलेल्या देशव्यापी ‘मेगा सर्व्हिस कॅम्प’ उपक्रमाने दाखवून दिले आहे. कंपनीने याआधीच कोचीन, कालिकत आणि जयपूरमध्ये १००० पेक्षा जास्त २०१९-२०२० जावा मोटरसायकलींची सेवा दिली आहे, येत्या काही महिन्यांत हा कार्यक्रम आणखी भारतीय शहरांमध्ये विस्तारणार आहे. शिबिराचा एक भाग म्हणून, मालकांना सर्वसमावेशक वाहन आरोग्य तपासणी, निवडक भागांची मोफत बदली आणि संभाव्य वाढीव वॉरंटी मिळते.

जावा येझदी मोटरसायकलचे सीईओ श्री आशिष सिंग जोशी म्हणाले की, “नाशिक ही पश्चिम पट्ट्यातील वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे, येथे समृद्ध बाइकिंगची संस्कृती आहे. आमच्या नवीन जावा ३५० ब्लू चेप्रदर्शन करण्यासाठी आम्ही या सुंदर शहरात येण्यास उत्सुक आहोत, ज्याबद्दल मला खात्री आहे की, ते येथील सर्व जावा चाहत्यांना आकर्षित करतील. आमच्या मते जावा ब्लू रंगातील जावा ३५० च्याडिझाइन उत्तम प्रकारे दिसून येतो करतो. जावा ३५० च्यानुकत्याच सादरीकरणामुळे, आम्हाला आशा आहे की या भागात एक मजबूत कम्युनिटी निर्माण होईल.”

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News