नाशिक-युरोपियन युनियन देशांतील डिप्लोमॅट्सच्या शिष्टमंडळाने 15 मार्च 2024 ला पेर्नोड रिकार्ड इंडिया नाशिक डिस्टिलरी येथे भेट दिली. हा उल्लेखनीय उपक्रम आजच्या गतिशील जागतिक परिस्थितीत आंतर-सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहयोगाचे सार अधोरेखित करतो. या भेटीमुळे पेर्नोड रिकार्ड इंडियाला भारतातील अल्को-बेव्ह क्षेत्र आणि नाशिकच्या वाईन निर्मितीच्या परंपरांबद्दल महत्वपूर्ण माहिती तर मिळतेच शिवाय परस्पर सहकार्य आणि गुंतवणुकीसाठी आशादायक संधीं ओळखण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून देखील काम करते. हा प्रयत्न आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनाशी सखोलपणे संरेखित आहे, जो शाश्वत विकास आणि समृद्धीसाठी स्वावलंबन आणि धोरणात्मक भागीदारी आणि सहकार्यावर भर देतो.

फोटोमध्ये (डावीकडून उजवीकडे) इंगेबोर्ग बायर,काउंसलर फूड अँड ऍग्रीकल्चर,जर्मन एम्बसी;लिओपोल्ड डायरेडर,ऑस्ट्रियन एम्बसी; मारियान डायरेडर,ऑस्ट्रियन एम्बसी;टी पिरिह,इकॉनॉमिक काउंसलर,स्लोव्हेनियन एम्बसी;मारिया फ्लॅडल,फर्स्ट काउंसलर ट्रेड अँड इकॉनॉमिक अफेअर्स, युरोपियन युनियनचे भारतातील शिष्टमंडळ; मोनिक ट्रान, ऍग्रीकल्चर काउंसलर, फ्रेंच एम्बसी; सिल्व्हिया, इकॉनॉमिक काउंसलर, फ्रेंच एम्बसी;मेइक जेगर, काउंसलर लेबर अँड सोशल अफेअर्स, जर्मन एम्बसी; व्हियानी मेयनियर, भारत आणि दक्षिण आशियासाठी ऍग्रोटेक आणि मार्केट एंट्री स्ट्रॅटेजीचे हेड, बिजनेस फ्रान्स;शिल्पा गुप्ता,हेड पब्लिक पॉलिसी, पेर्नोड रिकार्ड इंडिया; रुपाली हांडा, असिस्टंट मॅनेजर, कॉर्पोरेट अफेयर्स, पेर्नोड रिकार्ड इंडिया हे सर्व मान्यवर आहेत.




