अपस्टॉक्सची ‘कट द किट किट’ मोहीम सुरू ; ग्राहकांना आता हुशारीने गुंतवणूक करता येईल

Mar 27, 2024

नाशिक : भारतातील सर्वात वेगाने वाढणारा आणि सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूक प्लॅटफॉर्म अपस्टॉक्सने आज ‘कट द किट किट, गेट इन द मार्केट’ या नाविन्यपूर्ण ब्रँड मोहिमेचे अनावरण केले. किरकोळ गुंतवणूकदारांना अतिरिक्त माहितीच्या त्रासातून बाहेर काढत योग्य गुंतवणूक करण्यासाठी मदत करणे हे अपस्टॉक्सचे उद्दिष्ट आहे.कंपनीने केलेल्या संशोधनानुसार, गुंतवणूकदारांना अनेकदा विक्रीची चुकीची पद्धत, भरपूर माहिती आणि इतर पर्यायांची उपलब्धता, तसेच तांत्रिक शब्द समजून घेणे यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो, हे अपस्टॉक्सला कळले आहे.

उदाहरणार्थ, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकदार अनेकदा आवश्यक जोखीम आणि खर्चाच्या मेट्रिक्सपेक्षा परताव्यांना प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे सगळ्याला एकच निकष या न्यायाने योग्य मूल्यांकन न करताच ते 1 कोटी रु. टर्म इन्शुरन्स योजनेची निवड करू शकतात. अशा पद्धतींमुळे चुकीचे निर्णय घेतले जातात, ज्यामुळे गुंतवणूकदारांमधील आत्मविश्वास कमी होतो. ही आव्हाने ओळखून, अपस्टॉक्सने आपल्या ग्राहकांसाठी हेवी लिफ्टिंग आणि क्लिष्ट व्यवहार हाताळण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कंपनीला मार्केटमधील ही “कट द किट-किट” (आवाज) कमी करायची आहे आणि ग्राहकांना त्यांच्यासाठी जे योग्य आहे त्यात गुंतवणूक करून अधिकाधिक आणि सुरक्षित निधी मिळवण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे.

हा संदेश गुंतवणुकदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी अपस्टॉक्सने “कट द किट किट, गेट इन द मार्केट” या संकल्पनेवर आधारित एक कॅम्पेन व्हिडिओ लॉन्च केला आहे. या व्हिडिओमध्ये, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा कलाकारांकडून उल्लेख होताच प्रेक्षकांकडून “किट किट” चा प्रतिसाद येतो. गुंतवणूक करू पाहणाऱ्या या गोंधळलेल्या नायकाची अपस्टॉक्सशी ओळख होईपर्यंत तो गोंधळलेलाच राहतो. अपस्टॉक्सबाबत कळताच त्याला टॉप -रेट म्युच्युअल फंडांची माहिती मिळते, जी त्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरते.पुढील काही आठवड्यांत आणखी दोन व्हिडिओ लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत योग्य माहितीसाठी लोक कसे संघर्ष करतात याचे चित्रण यात असेल. परंतु अपस्टॉक्स त्यांचा हा त्रास संपवून ग्राहकांना आवश्यक पण महत्त्वाची तेवढीच माहिती देत योग्य गुंतवणुकीचे मार्गदर्शन करतील.

या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी, अपस्टॉक्सच्या सह-संस्थापक कविता सुब्रमण्यम म्हणाल्या, “भारत हे परंपरेने गुंतवणूकदारांऐवजी बचतीला प्राधान्य देणाऱ्यांचे राष्ट्र आहे. गुंतवणुकीचे चुकीचे निर्णय घेतले जाण्यामागे स्पष्ट, सुलभ माहितीचा अभाव हा एक महत्त्वाचा अडथळा आहे. प्रत्येक भारतीयाला योग्य ज्ञान आणि साधनांसह सक्षम बनवणे, सर्व उत्पन्न गटातील प्रत्येक माणूस गुंतवणूक करू शकेल, अशा पद्धतीने अडचणी टाळून हुशारीने गुंतवणूक करण्यास सक्षम करणे, हे अपस्टॉक्सचे ध्येय आहे.”

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News