Nashik : शांतता, प्रसन्नता आणि भरपूर निवांतपणा अशा सर्व गोष्टी ज्यावेळी घरात असतात त्यावेळी तिथे राहणाऱ्या लोकांसाठी खचितच जीवन आनंददायी असू शकते. मिंका रिव्हरडेल हा असाच एक ‘गेटेड व्हिला’ प्रकल्प आहे. नाशिकच्या निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक परिसरात शांततेत जीवनाचा आनंद हवाहवासा वाटणाऱ्या लोकांसाठी खास आणि उत्कृष्ट असा हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
आलिशान आणि प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी घरे बांधण्याच्या व्यवसायातील सर्वात विश्वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अपर्णा ग्रुपने सर्वात असाच एक पसंतीचा टुमदार निवासी प्रकल्प बांधला आहे. नाशिकच्या गंगापूर रोडवर सर्व सुख सुविधांनी युक्त असलेला मिंका रिव्हरडेल हा हिरवागार निसर्ग, नदी किनारा आणि सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेला एक आधुनिक गेटेड व्हिला प्रकल्प आहे असे वर्ण करता येईल.
भारताच्या वाईन कॅपिटलच्या सानिध्यात आणि नयनरम्य गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या मिंका रिव्हरडेल मध्ये कल्पनेच्यापलीकडील आलिशान आणि अत्याधुनिक सुविधांबरोबरच येथे राहणाऱ्या प्रत्येकाला जीवन जगण्याचा एक अतुलनीय आनंद मिळेल अशा प्रकारे या व्हिलांची सुंदर रचना करण्यात आली आहे. गंमत म्हणजे जपानी भाषेत मिंका म्हणजे ‘लोकांचे घर’. नेमकी हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन आलिशान , सुखकर आणि निवांत जीवनाचा अनुभव देईल अशाप्रकारे प्रत्येक गोष्टी बारकाईने लक्षत घेऊन केल्यामुळे मिंका रिव्हरडेलमध्ये तशा परिपूर्ण रचनेची अनुभूती मिळते.
या व्हिलांची बांधणी इतकी उत्कृष्ट्पणे केली आहे की त्याची वास्तुशास्त्रीय रचना आणि सौंदर्य बघून तुम्ही हरखून जाल. प्रशस्त अंतर्गत भाग, उंच छत आणि नैसर्गिक प्रकाशाला खुणावणाऱ्या प्रशस्त खिडक्या आणि सभोवतालचा विहंगम नजारा हे मिंका रिव्हरडेल गेटेड व्हिला प्रकल्पाचे एक वैशिष्ट्य आहे. सौरऊर्जेच्या वापरापासून ते पाण्याचा पुनर्वापर करण्यापर्यंत नैसर्गिक शाश्वत गोष्टींना यथे सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. कारण येथे राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशांची उन्नती, आरोग्य आणि कल्याण लक्षात घेऊनच वास्तूशास्त्राच्या दृष्टीने परिपूर्ण असा हा प्रकल्प आणि व्हिलाची रचना करण्यात आली आहे.
प्रीमियम गेटेड व्हिला प्रकल्प ५.८ एकर जमिनीवर पसरलेला असून प्रत्येक बहुमजली व्हिला प्रशस्त ४.५ बीएचकेची आहे. दोन डझनपेक्षा जास्त आलिशान सुविधांनी सुसज्ज असलेल्या व्हिलांसाठी त्रिस्तरीय २४X ७ सुरक्षा, १६ फुटांपर्यंत संरक्षण स्तरावरील कंपाऊंड वॉल, भव्य मुख्य प्रवेशद्वार,व्यायामशाळा, योग आणि ध्यानधारणा क्षेत्र, बच्चे कंपनीसाठी क्रीडांगण , खुले ॲम्फीथिएटर , एकेरी अंतर्गत रस्ते,लँडस्केप गार्डन एरिया, इन्फिनिटी स्विमिंग पूल, मल्टीपर्पज हॉल, मल्टिपर्पज स्पोर्ट्स कोर्ट, , इनडोअर गेम रूम, प्रोजेक्ट ऑफिस, लिली पॉन्ड, फायर पिट, बँक्वेट, शॉवर एरिया आणि चेंजिंग रूम, कॅबना सिटिंग, पार्टी लॉन, एसटीपी प्लांट, आरडब्ल्यूटी प्लांट, गेस्ट पार्किंग आणि बऱ्याच सुविधा येथे उपलब्ध आहेत.
मिंका रिव्हरडेल प्रीमियम प्रोजेक्टच्या जगात पाऊल ठेवताच या प्रीमियम गेटेड व्हिलाचे कालातीत आकर्षण बघून तुमचे हृदय आनंदाने उचंबळून येईल. आपले जीवन परिपूर्णतेने जगताना आणि तेही निसर्गाच्या कुशीत जगताना फक्त आराम करण्यासाठी, स्वतःला टवटवीत करण्यासाठी आणि आठवणींची गुंफण विणण्याचे हे एक अद्भुत ठिकाण आहे.
हे शहराच्या व्यस्त जीवनाच्या गजबजाटापासून दूर वसलेले आहे.पण प्रीमियम गेटेड व्हिलामध्ये डब्ल्यूएचआयएस ( विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल ), फ्रावाशी, पोद्दार इंटरनॅशनल, जेआयटी इंजिनिअरिंग कॉलेज, मोतीवाला होमिओपॅथी कॉलेज, वायसीएमओयू युनिव्हर्सिटी, मेट आर्किटेक्चरल कॉलेज, ओकवुड्स इंटरनॅशनल यासारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था येथे आहेत. श्रीगुरुजी मुत्ती-स्पेशालिटी हॉस्पिटल, मोतीवाला हॉस्पिटल आणि इतर मोठी हॉस्पिटल्सही जवळ आहेत. क्रोमा , बिगबाजार , डीमार्ट , झुडीओ सारखी शॉपिंग सेंटर्स देखील सहज पोहचता येईल अशा अंतरावर आहेत. पीव्हीआर, सुला , ,एमटीडीसी बोट क्लब, फोर्ट्स फॉर ट्रेक सारखी मनोरंजन केंद्रे देखील हाकेच्या अंतरावर आहेत. प्रीमियम प्रकल्प बालाजी मंदिर, सोमेश्वर मंदिर आणि नवशा गणपती मंदिर यांसारख्या अनेक धार्मिक स्थळांच्या सानिध्यात असून हा भाग गेटेड व्हिला प्रकल्पाच्या काही किलोमीटरच्या परिघात आहे.
अपर्णा ग्रुपच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी बोलताना कंपनीचे अध्यक्ष प्रतिक मलकन म्हणाले, “सुंदर व्हिला बांधण्यामागील हेतू असा की , नाशिकमध्ये जे श्रीमंत लोक लक्झरी राहणीमानाच्या शोधात असून त्यांना गेटेड कम्युनिटीच्या बाहेर सध्या फक्त अपार्टमेंट किंवा सिंगल पर्याय आहेत. म्हणून, आम्ही एक व्हिला कम्युनिटी तयार करण्याचा विचार केला. यामध्ये सर्व आधुनिक सुविधांसह मर्यादित घरे आहेत आणि काही लोकांना ज्या प्रकारची लक्झरी हवी आहे ती देण्यासाठी खूप उबेर प्रीमियम व्हिला आहेत. आमच्याकडे उभ्या उंच इमारती बांधण्याचा पर्याय होता, जो आता नाशिकमध्ये देखील एक कल बनला आहे. पण आम्ही इतर मार्गाने जाऊन या सुंदर व्हिला विकसित करण्याचा निर्णय घेतला”.
विशेष म्हणजे अपर्णा ग्रुपचा प्रमुख प्रकल्प असलेल्या मिंका रिव्हरडेलच्या पहिल्या टप्प्यात एकूण ३८ आलिशान व्हिलनची समावेश आहे असून प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू हणार आहे. मिंका रिव्हरडेल आपल्या सर्व आलिशान सुख सुविधा आणि आगळ्यावेगळ्या जीवनशैलीसह तुम्हा सर्वांना नाशिकच्या नैसर्गिक परिसरात आधुनिक आणि आनंदी जीवन जगत असताना स्वतःचे घर घेण्यास आणि अविस्मरणीय आठवणी निर्माण करण्यासाठी आमंत्रित करत आहे.
अपर्णा ग्रुप बद्दल:
अपर्णा ग्रुप गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ रिअल इस्टेट व्यवसायात आहे आणि आत्तापर्यंत २.५ दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त लक्झरी लिव्हिंग विकसित केले आहे. अपर्णा ग्रुप टोयोटा डीलरशिप आणि लेक्सस कार सारख्या इतर जीवनशैली व्यवसायांसाठी देखील ओळखला जातो. समूह लुसो डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचा कस्टमायझेशन व्यवसाय देखील चालवते. विशेष म्हणजे, हा समूह कार सर्व्हिसिंग व्यवसायात देखील कार्यरत आहे, जो डीवायडी नावाचा ग्राहक ब्रँड चालवतो.सर्व प्रकारच्या कारच्या सर्व्हिसिंग या समूहाची विशेषता आहे. अपर्णा समूह हा ७५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसह उत्तम वारसा आणि मूल्ये असलेला एक विश्वासार्ह ब्रँड आहे आणि त्याने गेल्या काही वर्षांत १ दशलक्ष आनंदी ग्राहकांना सेवा दिली आहे.






