जावा येझ्दी मोटरसायकल्सतर्फे नाशिकमध्ये मेगा सर्व्हिस कॅम्पचे आयोजन

May 16, 2024

नाशिक : जावा येझ्दी मोटरसायकल्स आपला यशस्वी मेगा सर्व्हिस कॅम्प नाशिक, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. हा कॅम्प नाशिक येथे १७ मे आणि १८ मे रोजी होणार असून त्यादरम्यान २०१९- २०२० मॉडेल्सच्या जावा मोटरसायकल ग्राहकांना सेवा दिली जाणार आहे.हा सर्व्हिस कॅम्प महावीर व्हील्स – वर्कशॉप (एमए 838) – प्लॉट क्रमांक ३,४, सर्व्हिस क्रमांक 904/2/2/4, हॉटेल साई पॅलेस, मुंबई आग्रा हायवे, नाशिक, महाराष्ट्र ४२२००९ या ठिकाणी घेतला जाईल.या कॅम्पमध्ये २०१९- २०२० मॉडेल्सच्या जावा मोटरसायकल ग्राहकांना त्यांच्या गाडीची संपूर्ण तपासणी आणि निवडक भागांचे मोफत रिप्लेसमेंट करून मिळेल. आघाडीचे ओरिजनल इक्विपमेंट पुरवठादार या कॅम्पमध्ये सहभागी होऊन ग्राहकांची मदत करणार असून त्यात मोतुल, अमारॉन, सीएट टायर्स यांचा समावेश आहे. ग्राहकांना दीर्घकालीन सेवा देण्याच्या बांधिलकीतून जावा येझ्दी मोटरसायकल्सने मोटरसायकलच्या मूल्यांकनावरून मोफत वाढीव वॉरंटी देण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय एक्सचेंज मूल्य जाणून घेत अपग्रेडिंगमध्ये रस असलेल्या ग्राहकांसाठी ग्राहकांसाठी खास झोन तयार केला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यातील सर्व्हिस कॅम्पमध्ये ६२५० जावा मोटरसायकल्सचे सर्व्हिसिंग करण्यात आले असून जून अखेरपर्यंत १०,००० बाइक्स सर्व्हिसिंगचे ध्येय आहे. यापुढे जावातर्फे (दुसरा टप्पा) येत्या काही महिन्यांत देशभरातील विविध शहरांत कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे. पुढचे कॅम्प त्रिची, अनंतपूर, पाँडिचेरी, जबलपूर, गोवा आणि कोल्हापूर येथे घेतले जाणार आहेत. या उपक्रमातून ब्रँडची ग्राहक समाधानाला प्राधान्य देण्याची बांधिलकी आणि त्यांना ओनरशीपचा अनोखा अनुभव देण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे. जावा येझ्दी मोटरसायकल्सच्या ग्राहकांना त्यांच्या जवळच्या ब्रँड वितरकाकडे आपला स्लॉट राखून ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. आपल्या मोटरसायकलचे दर्जेदार सर्व्हिसिंग करण्याची व सर्वोच्च ग्राहक समाधान मिळवण्याची ही संधी चुकवू नये.

अजून बातम्या वाचा..

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे मेगा रिटेल क्रेडिट आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे मेगा रिटेल क्रेडिट आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नाशिक क्षेत्रीय कार्यालयातर्फे दिनांक...

read more
नाशिकमध्ये एसआयपी रजिस्ट्रेशन करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ, रजिस्ट्रेशन्सची आकडेवारी गुंतवणूकदारांची सावधगिरी दर्शवते

नाशिकमध्ये एसआयपी रजिस्ट्रेशन करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ, रजिस्ट्रेशन्सची आकडेवारी गुंतवणूकदारांची सावधगिरी दर्शवते

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : म्युच्युअल फंडच्या माध्यमातून दीर्घकाळात मोठी संपत्ती किंवा फंड उभा करू...

read more
Breaking News