नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नाशिक क्षेत्रीय कार्यालयातर्फे दिनांक 22.05.2026 नाशिक येथील प्राध्यापक डॉ. टी. ए. कुलकर्णी हॉल येथे ग्राहकांसाठी मेगा रिटेल क्रेडिट आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे श्री जय शंकर प्रसाद , उपमहाप्रबंधक, ग्राहक सेवा विभाग, केंद्रीय कार्यालय, उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या स्वागतपर भाषणात नाशिक क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रमुख यांनी उपस्थितांना बँकेच्या विविध रिटेल कर्ज योजनांची माहिती दिली. यामध्ये सेंट होम लोन, सेंट गृह लक्ष्मी, सेंट विद्यार्थी, सेंट पर्सनल लोन, सेंट गोल्ड लोन आदी योजनांचा समावेश होता. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बँकेने कर्ज मंजुरीसाठी सुलभ व जलद प्रक्रिया उपलब्ध करून दिली असून पात्र ग्राहकांना त्वरित कर्ज मंजुरी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी उपस्थित ग्राहकाना त्यांच्या सर्व प्रकारच्या बँकिंग गरजांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाची निवड करण्याचे आवाहन केले. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा व सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच महाराष्ट्र शासनाने सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शासकीय कार्यालयीन बँकिंग भागीदार म्हणून नियुक्ती केल्याची माहितीही त्यांनी दिली.
प्रमुख अतिथी यांनी आपल्या मनोगतात उपस्थितांना त्यांच्या सर्व प्रकारच्या रिटेल बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच स्वप्नातील घर व उच्च शिक्षणाची स्वप्ने साकार करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान बँकेमार्फत विविध रिटेल कर्ज योजनांअंतर्गत मंजुरी प्राप्त झालेल्या ग्राहकांना कर्ज मंजुरीपत्रे तसेच प्रतीकात्मक धनादेशांचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षेत्रातील विविध शाखांतील अधिकारी व कर्मचारी तसेच क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत देशभरातील 100 हून अधिक ठिकाणी हा मेगा रिटेल क्रेडिट आउटरिच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुणे झोनसाठी रुपये 445 कोटींचे रिटेल कर्ज वितरणाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते.
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित
ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...






