नाशिक(प्रतिनिधी): आगामी काळ हा कृत्रिम बुद्धीमत्ता, मशीन लर्निंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज यावरच अवलंबून असणार आहे.त्याबाबतीत ज्ञान आणि कौशल्य आत्मसात केले तरच भविष्यात नोकरी अथवा स्टार्टअप करता येऊ शकेल असे परखड मत आंतरराष्ट्रीय अंतराळ सोसायटीचे अध्यक्ष आणि इस्रोचे माजी गटअध्यक्ष सुरेश नाईक यांनी उद्योगवर्धिनी आयोजित या विषयावरील कार्यशाळेत व्यक्त केले.विडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्रोत्यांशी संवाद साधतांना मंगळ यान आणि चांद्रयान-२ मध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराची सविस्तर माहिती दिली.अंतराळ संशोधन क्षेत्रात या क्षेत्राचा प्रचंड वापर होऊ शकणार आहे.आणि त्यामध्ये मोठ्या संधी आहे असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी एच.ए.एल चे डिझाईन विभाग प्रमुख श्री.आर.व्ही.हूलीराज, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील, एच.ए.एल डिझाईन विभागाचे अतिरिक्त महाव्यवस्थापक उत्तम सलावडे,नाशिक माहिती तंत्रज्ञान सोसायटीचे अध्यक्ष अरविंद महापात्रा,आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.ओमप्रकाश कुलकर्णी,सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठाचे विद्यार्थी राम चांडक. सॅाफ्टट्रॅानिक्स चे संचालक आणि या कोर्सचे समन्वयक गणेश अत्तरदे आणि उद्योगवर्धिनीचे संचालक सुनील चांडक उपस्थित होते.दीप प्रज्वलन,सरस्वती पूजन आणि सर विश्वेशरचा यांच्या प्रतिमेस हार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.सुरुवातीस उद्योगवर्धीनीचे संचालक सुनील चांडक यांनी सर्वांचे स्वागत केले.आणि संस्थेच्या कार्याची माहिती दिली.नवनिर्माणासाठी नवनवीन ज्ञान आणि कौशल्य तरुणांपर्यंत पोहचवण्याचे काम उद्योगवर्धिनी करत असून स्टार्टअपसाठी इन्क्युबेटरची सेवा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक संशोधनाचा पाया कृत्रिम बुद्धीमत्ता असल्यामुळेच ह्या संदर्भात कार्यशाळा आणि नंतर सविस्तर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ,मेंटर आणि तंत्रज्ञान विकसक डॉ.ओमप्रकाश कुलकर्णी यांनी या तिन्ही गोष्टींच्या व्याप्तीबाबत सविस्तर माहिती दिली. शेती,रेल्वे, अंतराळ, उद्योग,पर्यटन इ.सर्व क्षेत्रात त्याची उपयोगिता उदाहरणासह त्यांनी पटवून दिले.हिंदीस्थान अॅरोनॅाटीक्सचे डिझाईन विभागाचे मुख्य अधिकारी आर.व्ही.हूलीराज आणि अतिरिक्त अभियंता उत्तम सलावडे यांनी विमानासह इतर उपकरण निर्मितीमध्ये या तंत्राचा वापर कसा केला जातो आणि भविष्यात कसा होऊ शकेल. याबाबत दुकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन केले.नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली आणि त्यात अभियंता आणि स्टार्टअप उपलब्ध विविध संधीबाबत मार्गदर्शन केले.तिन्ही तंत्र अवगत केल्यास नाशिकला स्मार्ट करण्यात मोठी भूमिका करता येईल असेही त्यांनी सांगितले. ट्रॅफिक,ट्रान्सपोर्ट,मालमत्ता व्यवस्थापनामध्ये मोठा वाटा असून हे कौशल्य नीटपणे शिकून घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.नाशिक आयटी असोशिएशनचे अध्यक्ष अरविंद महापात्रा यांनी नाशिकच्या १८० माहिती तंत्रज्ञान आधारित उद्योग असून त्यांनादेखील वरील तंत्राचे प्रशिक्षित तरुण-तरुणीची गरज असल्याचे नमूद केले.उद्योगवर्धीनीने काळाची गरज ओळखून ह्या प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.येणाऱ्या पुढील काळात कृत्रिम बुद्धीमत्ता मानवी बुद्धिमत्तेवर मात करणार असल्याचे त्यांनीसांगितले. सॅनफ्रान्सिस्कोविद्यापीठाचे विद्यार्थी श्रीराम चांडक यांनी अमेरिकासह प्रगत राष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रचंड वापर होत असून जीवन अतिशय सुसह्य झाल्याची त्यांनी अनेक उदाहरणे दिली.नोकरीच्या आणि स्टार्टअपसाठीच्या खूप मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.भारतीयांना यामध्ये खूप वाव असून अभियंत्यांनी नोकरीव्यतिरिक्त स्टार्टअपबाबतही विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमाचे समन्वयक या तंत्राचे तज्ञ गणेश अत्तरदे यांनी या कोर्सेस संदर्भात सविस्तर माहिती दिली.कृत्रिम बुद्धीमत्ता,इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि मशिन लर्निंग या तिन्ही तंत्राचे प्रत्येकी ३ महिने रोज सकाळी व संध्याकाळी आणि खास बाहेर गावच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार-रविवार बॅचेस असणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कोर्सेसचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रॅक्टिकल प्रश्नांवर आधारित प्रशिक्षण असणार असून २० सप्टेंबर पासून पहिली बॅच उद्योगवर्धिनीमध्ये सुरु होत असल्याचे त्यांनी सांगितले.शेवटी किरण चांडक यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून यासंदर्भात अधिक माहितीसाठी संस्थेच्या कान्हेरेवाडीतील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन केले.सूत्रसंचालन सोनाली आहेर यांनी केले.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दिंडोरीच्या खासदार सौ.भारती पवार ह्या प्रशिक्षणार्थी म्हणून पूर्ण वेळ हजार होत्या.या कार्यशाळेस ६५० विद्यार्थी शिक्षक आणि उद्योजकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल
Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...




