मतदारांच्या सुविधेसाठी 5400 मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरीत

Sep 24, 2019

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी सुरु असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असलेली सुमारे पाच हजार चारशे मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना मतदानासाठी सहभाग घेणे सुलभ होईल.मुंबई,  मुंबई उपनगरे, ठाणे, नाशिक, पुणे यासारख्या महानगरांमध्ये जागेच्या मर्यादेमुळे लोकसभा निवडणुकीसाठी काही ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोईचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले असून जेथे लिफ्टची सुविधा आहे अशाच ठिकाणची मतदान केंद्रे पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.2014  च्या विधानसभा निवडणूक दरम्यान राज्यात 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. त्यात 5 हजार 325 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत 96 हजार 454 मतदान केंद्र आहेत. तेथे रॅम्प, व्हिल चेअर, पिण्याचे पाणी या आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येतील.भारत निवडणक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. यावर्षीच्या मतदार यादीमध्ये आतापर्यंत 3 लाख 60 हजार 885 दिव्यांग मतदार समाविष्ट आहेत. त्यांच्या सुलभतेसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हिलचेअर यांची सुविधा करण्यात येईल.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News