उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी मिरवणूक व घोषणा देण्यास प्रतिबंध

Sep 30, 2019

नाशिक, दि.30- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. सदर निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व निवडणुक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांचे प्रतिनिधी, हितचिंक यांनी नामनिर्देशन पत्र दाख करतेवेळी नाशिक जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वा’ वाजविणे किंवा गाणे म्हणणे, निवडणूक प्रचार करणेस, वाहनाच्या ताफ्यामध्ये 3 पेक्षा जास्त वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात आणण्यास तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात नामनिर्देशपत्र दाखल करण्यासाठी उमेदवारासह 5 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास जिल्हादंडाधिकारी, सूरज मांढरे यांनी नाशिक ग्रामीण जिल्ह्यात 7 ऑक्टोबर 2019 पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्रतिबंध घातले आहेत. सदर आदेशाचा भंग करण्याऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कारवाई केली जाईल.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News