दिवाळीच्या सुट़टीमध्‍ये पर्यटनासाठी केरळ सज्ज !

Oct 3, 2019

चॅम्पियन्स बोट लीगच्या (सीबीएल) मान्सून टुरिझमचा मुख्य चालना स्रोत ठरणार

नाशिक : आपल्या आकर्षक बॅकवॉटर्समध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स बोट लीगच्या (सीबीएल) पहिल्या मोसमाला सुरुवात करण्यासाठी व ओणमचा सण जवळच आला असताना तो साजरा करण्यासाठी केरळ सज्ज होत आहे. या मोसमात मोठ्या प्रमाणात प्रवासी येतील अशी आम्हाला आशा आहे. सीबीएल स्पर्धेची सुरुवात गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून झाली आहे, जी नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत सुरु राहील. आयपीएलच्या फॉरमॅटला अनुसरून तयार करण्यात आलेली ही स्पर्धा या वर्षीच्या मान्सून टुरिझमचा मुख्य चालना स्रोत ठरणार आहे.
केरळमधील सर्पिलाकार बोटींच्या विखुरलेल्या शर्यतींचा व्यावसायिक आविष्कार असलेल्या सीबीएल स्पर्धेने जलक्रीडा क्षेत्रातील वातावरणच बदलून टाकले आहे. या बोट लीगने खेळाडूंना सकारात्मक पद्धतीने व्यावसायिक बनवले आहे. बक्षिसांची रक्कम ५.९ कोटी रुपये असलेल्या सीबीएल भारतातील सर्व क्रीडा प्रकारांतील चौथ्या क्रमांकाची स्पर्धा झाली आहे, त्यामुळे राज्यातील जुनी परंपरा असलेल्या बोटींच्या शर्यतींमध्ये प्रचंड मोठा लक्षणीय बदल झाला आहे.
दर आठवड्याला केरळमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला केरळातील बॅकवॉटर्समध्ये एक ‘चॅम्पियन्स बोट लीग’ पाहण्याची संधी मिळते. या स्पर्धेचा समारोप २३ नोव्हेंबरला कोल्लम येथे राष्ट्रपती पारितोषिक बोट शर्यतीने होणार आहे, ज्याआधीच्या आठवड्यांमध्ये १२ शर्यती पार पडणार आहेत. हा पर्यटकांसाठी जागतिक दर्जाचा अनुभव असेल.
तिकिट घेऊन पाहता येणाऱ्या सीबीएल सर्पिलाकार बोट शर्यतींचे वेळापत्रक खालीलप्रमाणे: ७ सप्टेंबर (थाझातंगडी, कोट्टायम), १४ सप्टेंबर (करुवट्टा, अलाप्पुझ्हा), २८ सप्टेंबर (पिरावोम, एर्नाकुलम), ५ ऑक्टोबर (मरिन ड्राइव्ह, कोची), १२ ऑक्टोबर (कोट्टापुरम, थ्रिसूर), १९ ऑक्टोबर (पोन्नानि, मलाप्पुरम), २६ ऑक्टोबर (कैनाकारी, अलाप्पुझ्हा), २ नोव्हेंबर (पुलिंकुन्नु, अलाप्पुझ्हा), ९ नोव्हेंबर (कायमकुलम, अलाप्पुझ्हा), १६ नोव्हेंबर (कल्लडा, कोल्लम), आणि २३ नोव्हेंबर (राष्ट्रपती चषक बोट शर्यत, कोल्लम).
देशांतर्गत पर्यटकांच्या प्रवासात झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेऊन केरळ टुरिझम आता नव्या आक्रमक मार्केटिंग अभियानासह सज्ज झाले आहे. ज्याअंतर्गत देशातील दहा शहरांमध्ये पार्टनरशीप मीट्स घेतल्या जाणार असून, त्यामध्ये केरळच्या पारंपरिक कला प्रकारांचे तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे.पटणा, लखनौ, इंदोर आणि भोपाळमध्ये यावर्षी जुलै २०१९मध्ये, पुण्यात ऑगस्ट २०१९मध्ये आणि राजकोट,अहमदाबाद व सुरतमध्ये सप्टेंबर महिन्यात आणि या महिन्‍याच्‍या सुरूवातीला मुंबईमध्‍ये लक्षणीय
सहभागानंतर केरळ टुरिझमचे अधिकारी आता नाशिकमध्‍ये दाखल होण्‍यासाठी उत्‍सुक आहेत. यामध्‍ये या वर्षातील पार्टनरशिप मीट्सची सिरीज दिसण्‍यात येईल.केरळचे पर्यटनमंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन म्हणाले, ”पर्यटनसोबतच ओणमचा सण येत असल्यामुळे आम्ही या मीट झालेल्या पर्यटन व्यावसायिकांना केरळच्या पर्यटन उद्योगातील ५० महत्त्वाच्या कंपन्यांशी व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आमच्या सीबीएल स्पर्धेचा प्रत्येक शो पाहण्यासाठी या सर्व शहरांतून ६०-७० प्रेक्षक येतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.’’
पार्टनरशीप मीटमध्ये ३० मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम, केरळातील विविध कलांचा समावेश असलेले दृश्य कथाकथन यांचा समावेश असतो, जेणेकरून देवभूमी अशी ओळख असलेल्या केरळच्या खेड्यांतील जीवन आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडते.२०१९ च्या पहिल्या तिमाहीत केरळमध्ये आलेल्या देशांतर्गत पर्यटकांची संख्या ४१,९०,४६८ इतकी होती, गेल्या वर्षी २०१८ मध्ये याच काळातील ही संख्या ३८,७७,७१२ एवढी होती, ज्यामध्ये ८.०७ टक्के वाढ झाली आहे.पर्यटन सचिव राणी जॉर्ज म्हणाल्या, ”देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत झालेल्या वाढीतून हे स्पष्ट होत आहे की, राज्यातील पर्यटनातील तूट जानेवारी २०१९ पासून भरून निघाली आहे. विशेषत: एर्नाकुलम, अलाप्पुझ्हा आणि इडुक्की या तीन जिल्ह्यांतील देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येला तिथे गेल्यावर्षी आलेल्या पूराचा फटका बसला होता. पण या आकडेवारीमुळे केरळचे पर्यटन पुन्हा मार्गावर आल्याचेच दिसत आहे. हे राज्य केवळ वारसा-समृद्धच नसून जादूई पण आहे, याची अनुभूती भारतभरातील पर्यटकांना येईल. त्याचबरोबर ओणमच्या वेळी जेव्हा ते केरळमध्ये येतील तेव्हा त्यांना इथल्या आदरातीथ्याने ते भारावून जातील.’’
जॉर्ज म्हणाल्या, ”उच्चभ्रू पर्यटक, बॅकपॅकर्स, साहसी प्रवासी, इतिहासप्रेमी किंवा मधुचंद्रासाठी येणारी जोडपी सगळ्यांसाठीच केरळ हे एक आत्मानंद देणारे प्रवासी ठिकाण आहे अशी प्रतिमा उभी करणे हे आमचे मिशन आहे.’’
पर्यटन संचालक पी. बाला किरण म्हणाले, ”केरळने आकर्षक उत्पादने व अनुभवांची एक नवी श्रेणी आपल्या सेवेत वाढवली आहे, जी देशांतर्गत प्रवाशांसाठी टेलरमेड प्रकारातील आहे आणि ३६५ दिवस केरळमध्ये येण्यासाठी पर्यटकांना प्रोत्साहन देणारी आहे.”
ते पुढे म्‍हणाले, ”रामायणातील जटायू पक्षाचे २०० फूट लांब, १५० फूट विस्तीर्ण आणि ७० फूट उंच एवढे मोठे शिल्प असलेले जटायू अर्थ सेंटर हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. हे शिल्प हे जगातील सर्वांत मोठे कार्यान्वित पक्षी शिल्प आहे. इथे सहज जाता येते, कारण ते दक्षिण केरळच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या प्रेक्षणीय स्थळापासून फार जवळ आहे.’’
दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे भारतातील पहिलंवहिलं जैवविविधता संग्रहालय, जे तिरुअनंतपुरमच्या बाहेरच्या बाजूलाच आहे. हे संग्रहालय हे एकेकाळी एक बोट हाऊस होते, जे आता राज्यातील पहिलंवहिलं सायन्स-ऑन-स्फिअर सिस्टीम (एसओएस) झाले आहे.
मुझिरिस हेरिटेज प्रोजेक्ट जिथे गतकालातील इतिहास पर्यटकांसमोर उभा ठाकतो. हा भारतातील सर्वांत मोठा वारसा संवर्धन प्रकल्प आहे. अरब, रोमन, इजिप्तशियनांसाठी ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिलेल्या बंदराचे अवशेष आजही संवर्धन करून ठेवले आहेत. ते ती २५ संग्रहालये पाहता येऊ शकतात. दुसरे ऐतिहासिक ठिकाण म्हणजे २००० वर्षांपूर्वीच्या सागरी मार्गांनी होणाऱ्या मसाल्याच्या व्यापाराची माहिती देणारे स्पाईस रूट प्रोजेक्ट. ज्यामध्ये ३० देशांतील सांस्कृतिक व पाककृतींबद्दल माहिती घेता येऊ शकते.
बाला कृष्णन म्हणाले, ”कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यामुळे केरळ हे चार आंतररष्ट्रीय विमानतळे असलेले भारतातील एकमेव राज्य झाले आहे. स्वादिष्ट पाककृतींचे माहेरघर, किल्ले आणि लोककथांची भूमी असलेल्या या ठिकाणी मलबार इथे झालेल्या या विमानतळाच्या सीमांना कूर्ग, कोईमतूर आणि म्हैसूर ही शहरे जवळ आहेत. त्यामुळे हे ठिकाण हे दक्षिण भारताचे नवे पर्यटन गेटवे झाले आहे. कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांतील कमी प्रसिद्ध असलेल्या वलियापराम्बा बॅकवॉटर्स, कुप्पम आणि रानीपुरम यासारख्या ठिकाणांबरोबरच उत्तर केरळातील बेकल आणि वायनाडसारख्या सुप्रसिद्ध ठिकाणांनाही या विमानतळाचा फायदा होणार आहे.”
पर्यटन व्यवसाय शाश्वत करण्यासाठी केरळने आपल्या नव्या पर्यटन धोरणात पीपरचा समावेश केला आहे. पीपर म्हणजे पीपल्स पार्टिसिपेशन फॉर पार्टिसिपेटरी प्लॅनिंग अँड एम्पॉवरमेंट थ्रू रिस्पॉन्सिबल टुरिझम. याचा अर्थ असा की, जबाबदार पर्यटनाच्या बळकटी व नियोजनासाठी सामान्य लोकांचा सहभाग करून घेणे. त्या धोरणाचा मुख्य उद्देश अजूनही अपरिचित असलेली ठिकाणी शोधून ती स्थानिकांच्या प्रत्यक्ष सहभागातून शाश्वत पद्धतीने विकसित करणे हा आहे.
देशभरातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बैठका, इन्सेंटिव्हज, परिषदा आणि प्रदर्शने (माईस) आयोजित करण्यासही केरळ उत्सुक आहे. भारतातील विविध स्थळेही आंतरराष्ट्रीय परिषदा व प्रदर्शनांसाठीची योग्य स्थळे आहेत याची जाहिरात करण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने इंडियन कन्व्हेन्शन प्रमोशन ब्युरोची (आयसीपीबी) स्थापना केली आहे. केरळच्या पर्यटन विभागाने आयसीपीबीच्या सहाय्याने माईसच्या भागीदारांची एक राष्ट्रीय परिषद ऑगस्ट महिन्यात कोचीमध्ये आयोजित केली होती. ज्यामुळे देशाच्या एमआयसीईच्या नकाशावर केरळला स्वत:चे स्थान निर्माण करता आले.
अधिक माहिती केरळ पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. www.keralatourism.org किंवा कृपया इथे पत्र पाठवा- contact@keralatourismmarketing.org

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News