शरण संस्थेमार्फत PAW-SOME (पॉव-सम) पाळीव प्राण्यांसाठी खास शो से आयोजन, पाळीव प्राणी व पालकांमधील नाते बळकट करण्याचा छोटासा प्रयत्न

Oct 3, 2019

नाशिक : शरण ही एक प्राण्यांसाठी कार्य करणारी संस्था असून गेल्या 11 वर्षांपासून प्राण्याचं चांगले संवर्धन देखील करत आहे. पाळीव प्राणींच्या आरोग्य व आनंददायक भविष्यासाठी व त्यांचे संगोपन करणारे पालक यांचे नाते अधिक बळकट करण्यासाठी येत्या 5 ऑक्टोंबर 2019 रोजी एसएसके क्लब,पाथर्डी गाव, नाशिक येथे पॉवसम शो चे आयोजन केले आहे. यामध्ये खास करुन पाळीव कुत्रे व मांजर व त्यांचे मालक यांच्यातील नाते व कलागुण पाहण्याची संधी मिळणार असून या आनंदोत्सवाचा कार्यक्रम दुपारी 3 ते 7 वाजे पावेतो ठेवण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषद मध्ये श्रीमती.शेटटी यांनी दिली.या करमणूक कार्यक्रमात पेट बरोबर पालकांना सुध्दा विविध गेम खेळण्याची तसेच विविध अन्नपदार्थांची मेजवाणी लुटण्याची संधी मिळणार आहे. त्याच बरोबर पाळीव प्राणी यांच्या विविध विषयावर कार्यशाळा, हँड मोल्डस ,स्केच आर्टिस्ट ,पाळीव प्राण्यांचा सत्कार,आदि गोष्टींचा लाभ घेण्यासाठी आयोजनकांनी मोबाईल नं 9422292436 , 9326116115 संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

Breaking News