अनन्या शिंदे ठरली माईल्ड स्टोन मिस ग्लोबल इंटरनॅशनल

Oct 5, 2019

नाशिक– माईलस्टोन पेजेन्टस् द्वारे आयोजित करण्यात आलेल्या “मिस अँड  मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल २०१९” या सौंदर्य स्पर्धेचा अंतिम सोहळा दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी नुकताच मनिला, फिलीपाईन्स येथे पार पडला.
“माईलस्टोन मिस इंडिया इंटर निल २०१९” अनन्या शिंदे या नाशिकमधील फार्मसीच्या विद्यार्थिनी असन त्यांनी या स्पर्धेत पिक पटकावला व त्याचबरोबर “स्टाईल दिवा” या किताबाच्या देखील मानकरी ठरल्या.या स्पर्धेत एकूण ४७ स्पर्धक व ३८ देश सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने भारतासहित बुल्गेरिया, नेदरलॅण्ड,बोटस्वान. अमेरिका, ऑस्ट्रेलिया. साऊथ अफ्रिका, मलेशिया, फिलीपीन्स, युक्रेन, सिंगापुर, बांगलादेश, ब्रिटन,फ्रान्स व जर्मनी हे देश सहभागी झाले होते.स्पर्धेचे परिक्षण “मिसेस युनिव्हर्स, फिलिपाईन्स मशिलो व्हिलानोव्हा, “मिसक्लासिक डायमंड युके स्टॅसी डार्लिंग्टन, “मिसेस सिंगापोर इंटरनॅशनल″ लिंदा मॅरॉफ, “मिसेस युनायटेड नेशन पर्सनलिटी इंडिया”, डॉ. प्रिती सोलंकी, जेसिका एरिबल व माईलस्टोन पेजेन्टस् चे डायरेक्टर मॅक मलिक यांनी केले.
नुकत्याच नाशिक मधील निखिल मुळे प्रॉडक्शनने आयोजित केलेल्या “कराओके प्रिमिअर लिग” या नविनगीत गायन स्पर्धेच्या पहिल्या सीझनच्या “बॅण्ड अम्बेसेडर” म्हणून देखील अनन्या यांची नियुक्ती झालेली आहे.
या संदर्भात नाशिकच्या सेव्हन कॉन्टिनेंटस् इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या इव्हेंट मॅनेजर दिक्षा पिसोळकर व कंपनीचे फाऊंडर श्री. नंदकिशोर शेवाळे यांनी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. या प्रसंगी अनन्या शिंदे व त्यांचे मेंटॉर श्री. नंदकिशोर शेवाळे (यांच्या समवेत अनन्याच्या आई श्रीमती मृदुला शिंदे) यांनी फिलीपाईन्स् येथे झालेल्या स्पर्धेबद्दल माहिती दिली.

अजून बातम्या वाचा..

Breaking News